Realme Narzo - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 18 Feb 2021 11:31:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-series-launch-date-india-24-february-twitter-madhav-seth/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-series-launch-date-india-24-february-twitter-madhav-seth/#respond Thu, 18 Feb 2021 11:31:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10077 XDA Developers ला दिलेल्या आपल्या इंटरव्यू मध्ये Realme चे CEO Madhav Sheth यांनी माहिती दिली आहे कि Narzo 30 सीरीजचा एक फोन MediaTek Dimensity 800U सह येईल आणि हा 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करेल.

The post 24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme Narzo 30 सीरीज अनेक दिवस टीज केल्यानंतर आज अखेरीस कंपनीने अधिकृतपणे या सीरीजच्या इंडिया लॉन्च डेटची घोषणा केली आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे कि रियलमी नारजो 30 प्रो 5जी आणि रियलमी नारजो 30 स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला सादर केला जाईल. विशेष म्हणजे लॉन्च डेटची घोषणा करण्याआधी कंपनीने नारजो 30 प्रो 5जी ची झलक दाखवली होती त्याचबरोबर कँपेनचा खुलासा पण केला होता. या कँपेन अंतगर्त काही लोकांना हा स्मार्टफोन लॉन्चच्या आधी वापरण्याची संधी मिळेल.

येतील दोन मॉडेल

बोलले जात आहे कि Realme Narzo 20 सीरीज प्रमाणे या सीरीज मध्ये पण तीन स्मार्टफोन असतील, जे Realme Narzo 30, Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A स्मार्टफोन असू शकतात. पण, Realme India चे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक जिफ पोस्ट केली आहे, ज्यात फक्त Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A ची नावे दिसत आहेत.

हे देखील वाचा : जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी

लॉन्चची वेळ

कंपनी हि नवीन नारजो सीरीज वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून सादर करेल जो 24 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. तुम्ही हा इवेंट कंपनीच्या ऑफिशियल सोशल मीडिया चॅनेल जसे कि यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर लाइव बघू शकता.

चिपसेटचा झाला खुलासा

अलीकडेच XDA Developers ला दिलेल्या आपल्या इंटरव्यू मध्ये Realme चे CEO Madhav Sheth यांनी माहिती दिली आहे कि Narzo 30 सीरीजचा एक फोन MediaTek Dimensity 800U सह येईल आणि हा 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करेल. यावरून स्पष्ट झाले आहे कि हा चिपसेट नारजो 30 प्रो मध्ये असेल कारण या सीरीज मध्ये 5G फोन Narzo 30 Pro असतील.

हे देखील वाचा : Moto E7i Power वेबसाइटवर झाला लिस्ट, लवकरच करेल बाजारात एंट्री

डिजाइन

अलीकडेच माधव सेठ यांनी केलेला ट्विट पाहता फोटो मध्ये दिसणारा स्मार्टफोन पण नारजो 30 प्रो असल्याचे बोलले जात आहे. स्मार्टफोनची डिजाइन पाहता फोन मध्ये आयताकृती कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह मिळेल. तसेच Narzo ची ब्रँडिंग फोनच्या मागे देण्यात आली आहे.

रिटेल पोस्टर पण झाला लीक

एका टिप्सटरने ट्विट करून रियलमी नारजोचा एक रिटेल पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टर नुसार Narzo 30 Pro मध्ये MediaTek Dimensity 800U SoC दिला जाईल जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच सांगण्यात आले आहे कि Narzo 30 Pro मध्ये 120Hz डिस्प्ले दिला जाईल. आम्हाला आशा आहे कि फोन मध्ये एलसीडी पॅनलचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, डिवाइस मध्ये फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नरवर पंच होल असेल. तसेच, डिवाइस मध्ये मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल असेल.

स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी एक रियलमी फोन मॉडेल नंबर RMX3161 सह चीनी सर्टिफिकेशन साइट TENAA वर लिस्ट केला गेला होता. तेव्हा सांगण्यात आले होते कि हा Realme Narzo 30 Pro फोन असेल. बोलले जात आहे कि फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोनचे डायमेंशन 162.5 x 74.8 x 8.8एमएम दाखवण्यात आले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे तसेच फोनमध्ये रियलमी युआय देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,880एमएएचची बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे.

The post 24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-series-launch-date-india-24-february-twitter-madhav-seth/feed/ 0
Realme Narzo 20 सीरीजची झाली घोषणा, शानदार फीचर्स सह लवकरच करेल धमाकेदार एंट्री https://www.91mobiles.com/marathi/realme-teases-narzo-20-series-realme-watch-s-pro-in-ifa-2020-berlin-event/ https://www.91mobiles.com/marathi/realme-teases-narzo-20-series-realme-watch-s-pro-in-ifa-2020-berlin-event/#respond Mon, 07 Sep 2020 11:56:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8016 सीरीज मध्ये Realme Narzo 20 आणि Realme Narzo 20 Pro स्मार्टफोन सादर करण्यासाठी कंपनी तयारी करत आहे.

The post Realme Narzo 20 सीरीजची झाली घोषणा, शानदार फीचर्स सह लवकरच करेल धमाकेदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर्मनीची राजधानी बर्लिन मध्ये आयोजित IFA 2020 टेक शो मध्ये पहिल्यांदाच Realme ने सहभाग घेतला आणि आपल्या अनेक नवीन अपकमिंग प्रोडक्ट्सची घोषणा केली. रियलमीने या इवेंट मध्ये दुसऱ्या प्रोडक्ट्स सोबतच Realme Narzo 20 सीरीज स्मार्टफोनची पण घोषणा केली आहे. नार्जो 20 सीरीज बाबत अनेक दिवसांपासून माहिती व लीक बातम्या समोर येत होत्या. तसेच कंपनीने या नवीन सीरीजची घोषणा करत म्हटले आहे कि येत्या काही महिन्यांत हि सादर केली जाईल. रियलमीच्या या इस लेटेस्ट सीरीज सह स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच आणि TWS इयरफोन्सची पण घोषणा करण्यात आली आहे.

लवकरच लॉन्च होईल Realme 20 सीरीज

इवेंट मध्ये सादर केल्या गेलेल्या या नवीन प्रॉडक्ट्स बाबत कंपनीने खूप कमी माहिती दिली आहे. Realme Narzo 20 बद्दल बोलायचे तर हि यावर्षी मे मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Realme Narzo 10 सीरीजची फॉलोअप सिरीज असेल. गेल्या महिन्यात एका टिप्सटरने पण दावा केला होता कि रियलमीच्या नवीन नार्जो 20 सीरीज मध्ये Realme Narzo 20 आणि Realme Narzo 20 Pro स्मार्टफोन सादर करण्यासाठी कंपनी तयारी करत आहे.पण फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बाबत लीक मध्ये कोणताही खुलासा नाही झाला.

रियलमी वॉच एस प्रो

IFA 2020 मध्ये रियलमीने आपल्या स्मार्टफोन सोबतच आगामी स्मार्टवॉच रियलमी वॉच एस प्रो ची पण घोषणा केली आहे. आईएफए 2020 मध्ये आयोजित इवेंट मध्ये कंपनीने सांगितले आहे कि हा वॉच यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो. Realme Watch S Pro मध्ये एक गोलाकृती डायल आणि एमोलेड डिस्प्ले असेल.

रियलमी 55-इंच स्मार्ट टीव्ही

रियलमीने घोषणा केली आहे कि ते आपला टीव्ही पोर्टफोलियो वाढवत लवकरच 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च करतील. याआधी पण रियलमी द्वारे 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च केली जाणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. जून मध्ये रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले होते कि कंपनी लवकरच फ्लॅगशिप 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही सादर करेल. सध्या कंपनी कडे 32 इंच आणि 43 इंचाचे स्मार्ट टीव्ही आहेत.

या प्रोडक्ट्सची पण झाली घोषणा

टीव्ही, वॉच आणि स्मार्टफोन व्यतिरिक्त कंपनीने आईएफए 2020 मध्ये रियलमी स्मार्ट कॅम 360, रियलमी स्मार्ट बल्ब आणि इतर स्मार्ट AIoT प्रॉडक्ट्स पण सादर केले गेले, जे लवकरच सादर केले जातील. किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्ससाठी आपल्याला या प्रोडक्ट्सच्या लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post Realme Narzo 20 सीरीजची झाली घोषणा, शानदार फीचर्स सह लवकरच करेल धमाकेदार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-teases-narzo-20-series-realme-watch-s-pro-in-ifa-2020-berlin-event/feed/ 0
5000 mAh बॅटरी आणि क्वाड कॅमेऱ्यासह Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात 26 मार्चला होतील लॉन्च, Poco साठी खतरा https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10-narzo-10-alaunching-on-26-march-india-4-rear-camera-5000-mah-batterysale-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10-narzo-10-alaunching-on-26-march-india-4-rear-camera-5000-mah-batterysale-price-specification/#respond Fri, 20 Mar 2020 13:47:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6851 रियलमी इंडियाने ट्विट करून अशी माहिती दिली आहे कि येत्या 26 मार्चला Realme Narzo सीरीज भारतात लॉन्च केली जाईल.

The post 5000 mAh बॅटरी आणि क्वाड कॅमेऱ्यासह Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात 26 मार्चला होतील लॉन्च, Poco साठी खतरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन कंपनी रिअलमी 26 मार्चला भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरीज लॉन्च करणार आहे. कंपनीने आपल्या नवीन सीरीजचा टीजर विडियो ट्विटर वर गुरुवारी पोस्ट केला होता. Realme च्या या नवीन सीरीजचे नाव Narzo असेल, जिच्यात Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोन लॉन्च केले जातील. या सीरीजच्या जोरावर रियलमी भारतात पोकोला टक्कर देण्याचा प्रयत्न करेल. तसेच कंपनीने आपल्या वेबसाइट वर या सीरीज मधील फोन्सच्या काही फीचर्सचा खुलासा केला आहे.

रियलमी इंडियाने ट्विट करून अशी माहिती दिली आहे कि येत्या 26 मार्चला Realme Narzo सीरीज भारतात लॉन्च केली जाईल. कंपनी आपल्या ऑफिशियल साइट वर ऑनलाइन इवेंटचे आयोजन करून दुपारी 12:30 वाजता Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोन सादर करेल.

Narzo सीरीजच्या आधी कंपनीने आपल्या Pro, X, U आणि C सीरीज सादर केलाय आहेत. कंपनीच्या वेबसाइट वर Narzo 10 आणि Narzo 10A स्मार्टफोनची झलक दिसली आहे, ज्यात एक ट्रिपल रियर कॅमेरा आणि एक क्वाड कॅमेऱ्यासह दिसत आहे.

कंपनीच्या वेबसाइट नुसार Narzo 10 मध्ये क्वाड कॅमेरा सपोर्ट असेल. तर Narzo 10A मध्ये कंपनी ट्रिपल कॅमेरा देऊ शकते. या दोन्ही फोन्स मध्ये 5000 mAh ची बॅटरी क्विक चार्ज सपोर्ट सह येईल. तसेच कंपनी या फोन्स मध्ये असा प्रोसेसर घेऊन येणार जो भारतात पहिल्यांदा येईल आणि एक गेमिंग प्रोसेसर असेल. वेबसाइट वर प्रोसेसरच्या नावाचा खुलासा झालेला नाही.

डिजाइन बद्दल बोलायचे तर कंपनी Narzo 10 आणि Narzo 10 A यूनिक आणि बोल्ड डिजाईन सह सादर करेल. दोन्ही फोन्सच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटण आणि डावीकडे पावर ऑन-ऑफ बटण दिला जाईल. हे दोन्ही फोन्स नॉच डिस्प्ले सह सादर केले जातील. कंपनीने नॉच डिस्प्ले सह कोणत्याही फोनच्या नावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे कदाचित नारजो 10 पंच होल आणि नारजो 10ए वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. फोन्सच्या डिस्प्ले बद्दल कंपनीने माहिती दिली आहे कि यात 6.5-इंचाचा मोठा डिस्प्ले असेल, ज्याचा स्क्रीन-टू बॉडी रेश्यो 89.8 टक्के असेल.

The post 5000 mAh बॅटरी आणि क्वाड कॅमेऱ्यासह Realme Narzo 10 आणि Narzo 10A भारतात 26 मार्चला होतील लॉन्च, Poco साठी खतरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-10-narzo-10-alaunching-on-26-march-india-4-rear-camera-5000-mah-batterysale-price-specification/feed/ 0
Exclusive: Redmi आणि Poco ला टक्कर देण्यास येत आहे Realme ची नवीन स्मार्टफोन सीरीज Narzo https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-new-youth-smartphone-series-take-poco-redmi-exclusive-news/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-new-youth-smartphone-series-take-poco-redmi-exclusive-news/#respond Thu, 19 Mar 2020 12:56:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6836 Realme Narzo स्मार्टफोन सीरीजच्या माध्यमातून कंपनी तरुणांना टारगेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते.

The post Exclusive: Redmi आणि Poco ला टक्कर देण्यास येत आहे Realme ची नवीन स्मार्टफोन सीरीज Narzo first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme भारतात यावर्षी सुरवातीपासूनच स्मार्टफोन पोर्टफोलियोचा विस्तार करत आहे. कंपनीने अलीकडेच Realme 6 सीरीज सादर केली होती. तसेच रियलमी फिटनेस बॅंड पण लॉन्च केला होता. आता कंपनीने ऑफिशियल ट्विटर हँडल वर एक नवीन ट्विट केला आहे. या ट्विट मध्ये एक शॉर्ट वीडियो ट्रेलर रिलीज केला गेला आहे. यात नारजो (Narzo) टीज केले गेले आहे. या वीडियो वरून सांगणे कठीण आहे कि कंपनी कोणता डिवाइस लॉन्च करेल. पण 91 मोबाईल्सला इंडस्ट्री सोर्स कडून माहिती मिळाली आहे कि कंपनी नवीन स्मार्टफोन सीरीज सादर करणार आहे.

Narzo सीरीजच्या आधी कंपनीने आपली Pro, X, U आणि C सीरीज सादर केल्या आहेत. लवकरच इंडिया मध्ये Narzo सीरीजचे स्मार्टफोन्स सादर केले जातील. कंपनी या सीरीजच्या फोन्सच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी ब्रँड जसे कि पोको आणि रेडमीला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आम्हाला या डिवाइसचा प्रमोशनल पोस्टर मिळाला आहे.

प्रमोशनल पोस्टर

Realme Narzo स्मार्टफोन सीरीजच्या माध्यमातून कंपनी तरुणांना टारगेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. कंपनीने प्रमोशनल पोस्टर मध्ये फंकी आणि फ्लॅशी लाइटचा वापर केला आहे. पोस्टर मध्ये “Gen Z” शब्दचा विप्र केला गेला आहे जो कि यूथ-सेंट्रिक स्मार्टफोन सीरीजकडे इशारा करत आहे.

सोर्स कडून मिळालेल्या माहिती नुसार कंपनी Narzo ब्रँड मध्ये दोन वेरिएंट्स सादर करू शकते. पण अजूनही आम्हाला फोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल कोणतिही माहिती मिळाली नाही.

The post Exclusive: Redmi आणि Poco ला टक्कर देण्यास येत आहे Realme ची नवीन स्मार्टफोन सीरीज Narzo first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-new-youth-smartphone-series-take-poco-redmi-exclusive-news/feed/ 0