जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी

अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि Apple आपल्या फोल्डेबल iPhone वर काम करत आहे. अलीकडेच रिपोर्ट्स आले होते कि कंपनी Samsung Galazy Z Flip सारख्या clamshell डिजाइन असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. ऍप्पलने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. लेटेस्ट रिपोर्टनुसार ऍप्पलचा फोल्डेबल iPhone stylus सपोर्टसह येऊ शकतो. परंतु अजून समजले नाही कि कंपनी stylus म्हणून Apple Pencil देईल कि एक नवीन stylus सादर करेल.

याआधी समोर आलेल्या Cupertino च्या रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि ब्रँड एका Ceramic Sheild ग्लासचा वापर करेल, जी फोल्ड किंवा अन-फोल्ड झाल्यावर स्क्रीनला केमिकली ठीक करेल. तसेच, नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि फोन साल 2023 पर्यंत लॉन्च होईल. लेट लॉन्च झाल्यामुळे फोल्डेबल फोनमधील पार्ट्सची किंमत कमी होईल आणि डिवाइस कमी किंमतीत लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : फक्त अर्ध्या किंमतीत मिळेल Zee5 Premium चे 1 वर्षाचे सब्सक्रिप्शन, अश्याप्रकारे मिळवा ऑफरचा फायदा

खासियत काय असेल

ऍप्पलचा हा स्मार्टफोन 7.3-inch पासून 7.6-inch दरम्यान स्क्रीन साइजसह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये OLED पॅनल असेल. रिपोर्ट्सनुसार ऍप्पलचा फोल्डेबल स्मार्टफोन इतर ब्रँड्सच्या तुलनेत स्वस्त असेल, पण या डिवाइसचा लॉन्च उशिरा होऊ शकतो.

iPhone 13 सीरीज मध्ये असतील 4 मॉडेल

तुम्हाला सांगू इच्छितो कि काही दिवसांपूर्वी टेक अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी माहिती दिली होती कि यावर्षी आयफोन 13 सीरीज मध्ये iPhone 13 Mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max सारखे स्मार्टफोन्स लॉन्च होतील, ज्यांच्या डिजाइन्स आणि स्पेसिफिकेशन्स खूप खास असतील.

हे देखील वाचा : जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेल्या Vivo S9 5G चे फुल स्पेसिफिकेशन्स झाले लीक, लवकरच करेल एंट्री

EverythingApplePro आणि टिप्सटर Max Weinbach यांनी अलीकडेच सादर केलेल्या रिपोर्ट मध्ये अशी माहिती समोर आली होती कि iPhone मॉडेल्स मध्ये iPad Pro प्रमाणे 120 हर्ट्ज प्रोमोशन डिस्प्ले असू शकतो. तर, EverythingApplePro यूट्यूब चॅनेलने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात आगामी iPhone 13 सीरीजची हि नवीन माहिती टिप्सटर Max Weinbach च्या हवाल्याने शेयर केली गेली आहे.

डिजाइनबाबत व्हिडीओ मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple यावर्षी कमी बदल करेल. व्हिडीओ मध्ये सर्वात मोठी खासियत ज्याचा उल्लेख केला गेला आहे, हा ऑलवेज-ऑन डिस्प्ले आहे. डिटेल्सनुसार, ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचर स्क्रीनवर टाइम आणि बॅटरी आयकॉन दाखवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here