Realme Narzo 20 सीरीजची झाली घोषणा, शानदार फीचर्स सह लवकरच करेल धमाकेदार एंट्री

जर्मनीची राजधानी बर्लिन मध्ये आयोजित IFA 2020 टेक शो मध्ये पहिल्यांदाच Realme ने सहभाग घेतला आणि आपल्या अनेक नवीन अपकमिंग प्रोडक्ट्सची घोषणा केली. रियलमीने या इवेंट मध्ये दुसऱ्या प्रोडक्ट्स सोबतच Realme Narzo 20 सीरीज स्मार्टफोनची पण घोषणा केली आहे. नार्जो 20 सीरीज बाबत अनेक दिवसांपासून माहिती व लीक बातम्या समोर येत होत्या. तसेच कंपनीने या नवीन सीरीजची घोषणा करत म्हटले आहे कि येत्या काही महिन्यांत हि सादर केली जाईल. रियलमीच्या या इस लेटेस्ट सीरीज सह स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉच आणि TWS इयरफोन्सची पण घोषणा करण्यात आली आहे.

लवकरच लॉन्च होईल Realme 20 सीरीज

इवेंट मध्ये सादर केल्या गेलेल्या या नवीन प्रॉडक्ट्स बाबत कंपनीने खूप कमी माहिती दिली आहे. Realme Narzo 20 बद्दल बोलायचे तर हि यावर्षी मे मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Realme Narzo 10 सीरीजची फॉलोअप सिरीज असेल. गेल्या महिन्यात एका टिप्सटरने पण दावा केला होता कि रियलमीच्या नवीन नार्जो 20 सीरीज मध्ये Realme Narzo 20 आणि Realme Narzo 20 Pro स्मार्टफोन सादर करण्यासाठी कंपनी तयारी करत आहे.पण फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बाबत लीक मध्ये कोणताही खुलासा नाही झाला.

रियलमी वॉच एस प्रो

IFA 2020 मध्ये रियलमीने आपल्या स्मार्टफोन सोबतच आगामी स्मार्टवॉच रियलमी वॉच एस प्रो ची पण घोषणा केली आहे. आईएफए 2020 मध्ये आयोजित इवेंट मध्ये कंपनीने सांगितले आहे कि हा वॉच यावर्षी लॉन्च केला जाऊ शकतो. Realme Watch S Pro मध्ये एक गोलाकृती डायल आणि एमोलेड डिस्प्ले असेल.

रियलमी 55-इंच स्मार्ट टीव्ही

रियलमीने घोषणा केली आहे कि ते आपला टीव्ही पोर्टफोलियो वाढवत लवकरच 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च करतील. याआधी पण रियलमी द्वारे 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही लॉन्च केली जाणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. जून मध्ये रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले होते कि कंपनी लवकरच फ्लॅगशिप 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही सादर करेल. सध्या कंपनी कडे 32 इंच आणि 43 इंचाचे स्मार्ट टीव्ही आहेत.

या प्रोडक्ट्सची पण झाली घोषणा

टीव्ही, वॉच आणि स्मार्टफोन व्यतिरिक्त कंपनीने आईएफए 2020 मध्ये रियलमी स्मार्ट कॅम 360, रियलमी स्मार्ट बल्ब आणि इतर स्मार्ट AIoT प्रॉडक्ट्स पण सादर केले गेले, जे लवकरच सादर केले जातील. किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्ससाठी आपल्याला या प्रोडक्ट्सच्या लॉन्चची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here