Realme V11 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 05 Feb 2021 11:59:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme ने केली कमाल, लॉन्च केला 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन, यात आहे 4GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/realme-v11-5g-phone-launched-dimensity-700-soc-5000mah-battery-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/realme-v11-5g-phone-launched-dimensity-700-soc-5000mah-battery-4gb-ram/#respond Fri, 05 Feb 2021 11:59:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9907 Realme V11 लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो रियलमी युआयसह चालतो.

The post Realme ने केली कमाल, लॉन्च केला 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन, यात आहे 4GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत नवीन स्मार्टफोन Realme V11 सादर केला आहे. हा कंपनीचा अफॉर्डेबल 5G फोन आहे जो मिडबजेट मध्ये आला आहे. इंडियन करंसीनुसार रियलमी वी11 ची किंमत फक्त 13,500 रुपयांच्या आसपास आहे. रियलमीने हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात आणला आहे जो येत्या काही दिवसांत इतर मार्केट्स मध्ये एंट्री घेऊ शकतो. कमी किंमत आणि 5जी सपोर्ट सोबतच हा फोन मीडियाटेक डायमनसिटी 700 चिपसेट आणि 5,000एमएएच बॅटरी सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

Realme V11

रियलमी वी11 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. रियलमी वी11 चा आकार 8.4एमएम आणि वजन 186ग्राम आहे.

हे देखील वाचा : Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत

Realme V11 लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो रियलमी युआयसह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला मीडियाटेकचा डायमनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. हा चिपसेट डुअल मोड 5G (SA/NSA) वर चालतो. चीनी मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह लॉन्च झाला आहे.

फोटोग्राफीसाठी Realme V11 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅशसह एफ/2.2 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल

Realme V11 डुअल सिम फोन आहे जो 5जी सह 4जी एलटीईला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रियलमी वी11 चीन मध्ये 1199 युआन मध्ये लॉन्च झाला आहे, हि किंमत भारतीय करंसीनुसार 13,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post Realme ने केली कमाल, लॉन्च केला 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन, यात आहे 4GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-v11-5g-phone-launched-dimensity-700-soc-5000mah-battery-4gb-ram/feed/ 0