Realme ने भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. लो बजेट मध्ये मोबाईल फोन घेऊन येणाऱ्या या कंपनीने यावेळी फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आपली दावेदारी सादर केली आहे आणि रियलमी एक्स7 सीरीज भारतात सादर केली आहे. सीरीज अंतगर्त Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत जे 5G ला सपोर्ट करतात. लार्ज डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि शानदार कॅमेऱ्यासह फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी या सीरीजला ताकदवान बनवते.
डिस्प्ले
रियलमीने आपली एक्स7 सीरीज पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केली आहे. Realme X7 मध्ये 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे तर Realme X7 Pro स्मार्टफोन इतक्याच पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. रियलमी एक्स7 ची स्क्रीन 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच एक्स7 प्रो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह लॉन्च केला गेला आहे. दोन्ही फोन्स मध्ये डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे.
प्रोसेसिंग
Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च झाले आहेत जे रियलमी युआयसह काम करतात. प्रोसेसिंगसाठी रियलमी एक्स7 मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. तसेच रियलमी एक्स7 प्रो 2.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम फेब्रिकेशनवरच काम करणाऱ्या मीडियाटेक डायमनसिटी 1000+ चिपसेटवर लॉन्च केला गेला आहे. हे दोन्ही चिपसेट 5G ला सपोर्ट करतात. ग्राफिक्ससाठी Realme X7 मध्ये माली-जी57 जीपीयू आणि Realme X7 Pro मध्ये माली-जी77 जीपीयू देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल
रॅम व स्टोरेज
रियलमी एक्स7 5जी भारतीय बाजारात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच रियलमी एक्स7 प्रो 5जी 8 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी
Realme X7 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी एक्स7 स्मार्टफोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो.
Realme X7 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर पंच-होल मध्ये एफ/2.5 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
पावर बॅकअपसाठी Realme X7 स्मार्टफोन मध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. तर दुसरीकडे Realme X7 Pro स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीवर लॉन्च केला गेला आहे जी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे दोन्ही स्मार्टफोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतात.
किंमत
Realme X7 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. याची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर 12 फेब्रुवारीपासून असेल. Realme X7 Pro च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 29,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे. या फोनची विक्री 10 फेब्रुवारीला फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर केली जाईल.
रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ