Poco ने आज भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये यावर्षीचा पहिला फोन Poco M3 लॉन्च केला आहे. M-सीरीज मध्ये सादर करण्यात आलेला हा फोन पोको एम2 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून बजेट कॅटेगरी मध्ये आला आहे. शानदार फीचर्स आणि कमी किंमतीनंतर पण भारतात या फोनचा प्रवास सोप्पं असणार नाही. फोनची डिजाइन, किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनला Realme 7i कडून निश्चितपणे टक्कर मिळणार आहे. दोन्ही फोन मध्ये काही साम्य पण आहेत, त्यामुळे आम्ही या दोन्ही फोन्सची तुलना केली आहे. हि तुलना फोनचा लुक, फीचर्स आणि प्राइस यांच्या आधारावर करण्यात आली आहे. या तुलनेमुळे तुम्हाला कोणता फोन बेस्ट आहे हे ठरवणे सोप्पे जाईल.
लुक व डिजाइन
पोको एम3 मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि Realme 7i पंच-होल असलेली फ्रंट डिजाइन आहे. तर, दोन्ही फोनची स्क्रीन तिन्ही बाजूनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट दिसतो. फोन्सच्या लोवर पॅनलवर 3.5एमएम जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल पण आहे. पोको एम3 मध्ये मागे डुअल टोन फिनश आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. दुसरीकडे रियलमी 7आयच्या बॅक पॅनलवर चौकोनी रियर कॅमेरा सेटअप आहे.
डिस्प्ले
पोको एम3 मध्ये 19.5: 9 आस्पेक्ट रेशियो आणि 90.34 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह 6.53-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) 60हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, रियलमी 7आय मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेट (1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन) असलेला 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. त्याचबरोबर दोन्ही फोन मध्ये कोर्निंग ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Nokia घेऊन येत आहे लो बजेट असलेला नवीन फ्लिप फोन Nokia 2720, चीनी कंपन्यांची करेल का सुट्टी?
हार्डवेयर
Poco M3 आणि Realme 7i स्मार्टफोन अँड्रॉइड 10 वर काम करतात. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे. रॅमच्या बाबतीत दोन्ही फोन्स वेगळे आहेत. पोको एम3 मध्ये 6जीबी रॅमसह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज आहे. तर, रियलमी 7आय मध्ये 4जीबी रॅमसह 64जीबी आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.
कॅमेरा
पोको एम3 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात एफ/1.79 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, एफ/2.4 मॅक्रो लेंस असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी एफ/2.05 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
दुसरीकडे रियलमी 7i च्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W सेंसर आहे. सेल्फीसाठी हँडसेट मध्ये एफ/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेंसर आहे.
हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 6.82 इंच असलेला हा स्वस्त स्मार्टफोन 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च, किंमत असेल 8,000 पेक्षा कमी
बॅटरी
दोन्ही फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. पण, पावर बॅकअपसाठी बॅटरीज वेगवेगळ्या आहेत. पोकोच्या फोन मध्ये 6000एमएएचची बॅटरी आहे. तर रियलमीच्या फोन मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केले जाऊ शकतात.
कनेक्टिविटी व सिक्योरिटी
दोन्ही फोन डुअल सिम स्मार्टफोन आहेत जे 4जी वोएलटीईला सपोर्ट करतात. 3.5एमएम जॅक, वायफाय, ब्लूटूथ व जीपीएस सोबतच इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण या फोन मध्ये मिळतील. सिक्योरिटीसाठीसाठी पोको एम3 च्या पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आहे तर रियलमी 7आयच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.
किंमत
Poco M3 च्या 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेजची किंमत 11,999 रुपये आहे. फोनची विक्री Flipkart च्या माध्यमातून 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. तर, Realme 7i च्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आणि 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.