Realme X2 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Apr 2020 13:23:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X3 SuperZoom Edition सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, 12 जीबी रॅम आणि पावरफुल कॅमेऱ्यासह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-edition-listed-on-nbtc-specs-price-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-edition-listed-on-nbtc-specs-price-leaked/#respond Thu, 09 Apr 2020 13:23:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7051 लीक्सनुसार Realme X3 SuperZoom Edition कंपनीचा पावरफुल स्मार्टफोन तर असेल पण रियलमी हा फोन 5जी फोन म्हणून लॉन्च करणार नाही.

The post Realme X3 SuperZoom Edition सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, 12 जीबी रॅम आणि पावरफुल कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी आपल्या नवीन 5G फोन वर काम करत आहे आणि हा Realme X60 नावाने बाजारात येईल. लीक मध्ये सांगण्यात आले होते कि या फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा आणि हाई रिफ्रेश रेट असलेला पंच-होल एमोलेड डिस्प्ले मिळेल. कंपनीने आतापर्यंत रियलमी एक्स60 बाबत कोणतीही माहिती दिली नाही पण Realme X60 5G च्या आधी आता रियलमी एक्स सीरीजचा अजून एक स्मार्टफोन रियलमी एक्स3 समोर आला आहे ज्याचे नाव Realme X3 SuperZoom Edition असल्याचे बोलले जात आहे.

Realme X3 SuperZoom Edition ची माहिती एमएसपीच्या माध्यमातून समोर आली आहे. वेबसाइटचा दावा आहे कि रियलमीचा एक आगामी स्मार्टफोन थाईलँडच्या सर्टिफिकेशन्स साइट एनबीटीसी वर दिसला आहे. वेबसाइट वर हा फोन RMX2086 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे आणि मीडिया रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन Realme X3 SuperZoom Edition नावाने बाजारात येईल. नावावरून समजते कि हा फोन रियलमी एक्स2 चा अपग्रेडेड वर्जन असेल आणि चांगल्या झूम क्वॉलिटी लेंस सह लॉन्च केला जाऊ शकतो.

लीक्सनुसार Realme X3 SuperZoom Edition कंपनीचा पावरफुल स्मार्टफोन तर असेल पण रियलमी हा फोन 5जी फोन म्हणून लॉन्च करणार नाही. हा फोन एक 4जी फोनच असेल जो दमदार स्पेसिफिकेशन्स सह येईल. चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचच्या आधारावर सांगण्यात आले आहे कि हा रियलमी एक्स3 फोन को12 जीबी रॅम वर लॉन्च केला जाऊ शकतो. गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे तसेच सिंगल-कोर मध्ये या फोनला 788 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये या फोनला 2624 स्कोर मिळाला आहे.

Realme X2 Pro

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असेलल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी सुपर एमोलेड फ्लूइड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा आस्पेक्ट रेशियो 20:9, रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि सॅम्पलिंग रेट 135 हर्ट्ज आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी Realme X2 Pro मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित कलरओएस 6.1 वर लॉन्च झाला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट वर चालतो.

Realme X2 Pro स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 64MP GW1 प्राइमरी सेंसर, 13MP टेलीफोटो लेंस सोबत 20x हाइब्रिड जूम सपॉर्ट, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस सह 115-डिग्री फिल्ड ऑफ व्यू आहे जो 2.5mm मॅक्रो शॉट्स घेऊ शकतो. तसेच हा फोन 4K 60fps वीडियो आणि 960fps स्लो-मोशन रेकॉर्ड करू शकतो. वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी Realme X2 Pro मध्ये 50 वॉट सुपर वूक फ्लॅश चार्ज सपोर्ट वाली 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Realme X3 SuperZoom Edition सर्टिफिकेशन्स साइट वर झाला लिस्ट, 12 जीबी रॅम आणि पावरफुल कॅमेऱ्यासह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x3-superzoom-edition-listed-on-nbtc-specs-price-leaked/feed/ 0
Realme X2 Pro चा सर्वात स्वस्त 6 जीबी रॅम वेरिएंट झाला सेल साठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-pro-6gb-ram-64gb-storage-variant-sale-start-in-india-price-rs-27999/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-pro-6gb-ram-64gb-storage-variant-sale-start-in-india-price-rs-27999/#respond Thu, 02 Jan 2020 13:06:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6170 आता हा नवीन आणि स्वस्त वेरिएंट भारतात सेल साठी उपलब्ध झाला आहे.

The post Realme X2 Pro चा सर्वात स्वस्त 6 जीबी रॅम वेरिएंट झाला सेल साठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्यावर्षी भारतात आपल्या ‘रियलमी एक्स’ सीरीज अंतर्गत 4 स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये Realme X, Realme X2, Realme X2 Pro आणि Realme XT स्मार्टफोनचा समावेश आहे. गेल्याच महिन्यात रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले होते कि ब्रँडचे हिट स्मार्टफोन Realme X2 Pro चा अजून एक नवीन वेरिएंट कंपनी लॉन्च केला करेल ज्यात 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. आता हा नवीन आणि स्वस्त वेरिएंट भारतात सेल साठी उपलब्ध झाला आहे.

Realme X2 Pro च्या नवीन वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा वेरिएंट इंडियन मार्केट मध्ये 27,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. रियलमी एक्स2 प्रो चा हा नवीन वेरिएंट ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट वर हा फोन वेरिएंट लूनार व्हाइट, कंक्रीट, रेड ब्रिक आणि नेप्च्यून ब्लू कलर मध्ये विकला जात आहे. तसेच फ्लिपकार्ट व्यतिरिक्त हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून पण विकत घेता येईल.

Realme X2 Pro चे वेरिएंट्स पाहता हा फोन भारतात आधी दोन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होता. फोनच्या सर्वात छोटे वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 29,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच Realme X2 Pro चा दुसरा व सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा वेरिएंट 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme X2 Pro

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असेलल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी सुपर एमोलेड फ्लूइड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा आस्पेक्ट रेशियो 20:9, रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि सॅम्पलिंग रेट 135 हर्ट्ज आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी Realme X2 Pro मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित कलरओएस 6.1 वर लॉन्च झाला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट वर चालतो.

Realme X2 Pro स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 64MP GW1 प्राइमरी सेंसर, 13MP टेलीफोटो लेंस सोबत 20x हाइब्रिड जूम सपॉर्ट, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस सह 115-डिग्री फिल्ड ऑफ व्यू आहे जो 2.5mm मॅक्रो शॉट्स घेऊ शकतो. तसेच हा फोन 4K 60fps वीडियो आणि 960fps स्लो-मोशन रेकॉर्ड करू शकतो. वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी Realme X2 Pro मध्ये 50 वॉट सुपर वूक फ्लॅश चार्ज सपोर्ट वाली 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Realme X2 Pro चा सर्वात स्वस्त 6 जीबी रॅम वेरिएंट झाला सेल साठी उपलब्ध, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-pro-6gb-ram-64gb-storage-variant-sale-start-in-india-price-rs-27999/feed/ 0
Realme X2 भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 4000mAh बॅटरी, 32MP सेल्फी आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launched-in-india-with-snapdragon-730g-32mp-selfie-64mp-isocell-bright-gw1-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launched-in-india-with-snapdragon-730g-32mp-selfie-64mp-isocell-bright-gw1-price-sale/#respond Tue, 17 Dec 2019 12:20:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6060 Realme X2 16,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 20 डिसेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

The post Realme X2 भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 4000mAh बॅटरी, 32MP सेल्फी आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने सप्टेंबर महिन्यात सांगितले होते कि कंपनी साल 2019 च्या शेवटी भारतीय बाजारात एक असा स्मार्टफोन लॉन्च करेल जो 64 मेगापिक्सल सेंसर असलेल्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल आणि क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालेल. हा स्मार्टफोन Realme XT 730G नावाने लॉन्च केला जाईल. आज हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत रियलमीने आपला डिवाईस Realme X2 नावाने अधिकृतपणे लॉन्च केला आहे. Realme X2 16,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 20 डिसेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X2 लुक व डिजाईन

रियलमी एक्स2 कंपनीने 3डी ग्लॉस डिजाईन सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme ने याला ‘ड्यूड्रॉप नॉच’ चे नाव दिले आहे. Realme X2 कंपनीने ग्लॉस बॅक पॅनल वर सादर केला जो प्रीमियम दिसतो. Realme X2 च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जो वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे.

या कॅमेरा सेटअप मध्ये चारही सेंसर एकाच रिंग मध्ये आहेत तसेच सर्वात वरील कॅमेरा सेंसरला पिवळ्या रंगाची आउट लाईन आहे. या सेंसरच्या खाली 64MP लिहिण्यात आले आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला Realme ची ब्रॅंडिंग देण्यात आली आहे. Realme X2 च्या साईड पॅनल वर पावर बटन व वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आहे.

कॅमेरा डिटेल

Realme X2 मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन असलेली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे फ्लॅश लाईट सह देण्यात आले आहेत. Realme X2 च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Realme X2 एफ/2.25 अपर्चर असलली 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि त्याच अपर्चरची 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme X2 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme X2 स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme X2 91.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीन मध्ये रियलमीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तर Realme X2 च्या सुरक्षेसाठी फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme X2 एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.1 वर सादर केला गेला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज़ क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 618 जीपीयू देण्यात आला आहे. भारतीय बाजारात Realme X2 तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 4 जीबी रॅम, 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमचा समावेश आहे.

Realme X2 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. Realme X2 मध्ये पावर बॅकअप साठी VOOC flash charge 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 30W फास्ट चार्जिंग असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट ने चार्ज करता येईल. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 30 मिनिटांत 67 टक्के चार्ज होऊ शकतो.

वेरिएंट्स आणि किंमत

Realme X2 येत्या 20 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल जिथे हा फोन पर्ल ग्रीन, पर्ल ब्लू आणि पर्ल व्हाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध असेल. Realme X2 चे वेरिएंट्स आणि किंमत पाहता:

4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 18,999 रुपये

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 19,999 रुपये

The post Realme X2 भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 4000mAh बॅटरी, 32MP सेल्फी आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launched-in-india-with-snapdragon-730g-32mp-selfie-64mp-isocell-bright-gw1-price-sale/feed/ 0
Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/#respond Wed, 11 Dec 2019 09:40:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6034 काही अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे Realme X2 आणि Realme XT एकमेकांपेक्षा खूप वेगळे ठरतात

The post Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 17 डिसेंबरला भारतीय बाजारात आपला नवीन डिवाईस Realme X2 लॉन्च करेल. हा स्मार्टफोन सप्टेंबर मध्ये लॉन्च झालेल्या Realme XT चा अपग्रेडेड वर्जन असेल ज्याची माहिती कंपनीने दोन महिन्यांपूर्वी दिली होती. तेव्हा कंपनीने या फोनचे नाव Realme XT 730G सांगितले होते जो आता Realme X2 नावाने टीज केला जात आहे. Realme XT स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेला पहिला रियलमी फोन होता जो 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. तसेच Realme X2 स्मार्टफोन पण 64MP कॅमेऱ्यासह येईल या दोन्ही स्मार्टफोनचा लुक हुबेहूब असेल, पण काही अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे Realme X2 आणि Realme XT एकमेकांपेक्षा खूप वेगळे ठरतात. पुढे तुम्हाला समजेल कि का आणि किती वेळगेल आहेत हे दोन्ही स्मार्टफोन.

प्रोसेसर

Realme XT स्मार्टफोन कंपनीने भारतात एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला होता जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआईई चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Realme XT मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आणि सोबत गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पण आहे. पण Realme X2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल जो 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या प्रोसेसर वर चालेल.

बॅटरी

Realme XT कंपनीने 4,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. Realme XT 20वॉट चार्जरला सपोर्ट करतो जो यूएसबी टाईप-सी ने चार्ज केला जाऊ शकतो. तसेच Realme X2 मध्ये पण 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल पण हा फोन रियलमी 30वॉट VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च करेल. म्हणजे Realme X2 स्मार्टफोन Realme XT च्या तुलनेत जास्त वेगाने चार्ज होईल.

रॅम व स्टोरेज

Realme XT भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. त्याचबरोबर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तर Realme X2 संबंधित जी माहिती समोर आली आहे त्यानुसार रियलमी या स्मार्टफोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देईल. तर Realme XT 730G च्या इतर वेरिएंट्स मध्ये पण जास्त स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा सेग्मेंट

Realme X2 चा कॅमेरा सेग्मेंट Realme XT सारखा असेल. या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशनची अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येते. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वरच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme X2 मध्ये पण हा कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल.

17 डिसेंबरला Realme X2 स्मार्टफोन सोबत Realme एयरपॉड पण भारतीय बाजारात येतील. ये एयरपॉड ब्रँडचे पहिले ट्रू वायरलेस ईयरफोन असतील. तसेच Realme X2 बद्दल बोलायचे तर आशा आहे कि हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 17,000 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मिळू शकतो. Realme X2 बद्दल अशी अशा व्यक्त केली जात आहे कि हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64जीबी/128 जीबी मेमरी वेरिएंट सह पण लॉन्च केला जाऊ शकतो. Realme X2 च्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा 17 डिसेंबरला होईल.

The post Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/feed/ 0
Realme XT 730G 20 डिसेंबरच्या आधी होईल लॉन्च, किंमत असेल 17000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-730g-india-launch-before-20-december-price-17000-4gb-ram-64gb-storage-30w-vooc-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-730g-india-launch-before-20-december-price-17000-4gb-ram-64gb-storage-30w-vooc-4000mah-battery/#respond Thu, 05 Dec 2019 15:05:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5985 Realme XT 730G बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64जीबी/128 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह पण लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Realme XT 730G 20 डिसेंबरच्या आधी होईल लॉन्च, किंमत असेल 17000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने भारतात ब्रँडचा पहिला 64MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT लॉन्च करताना म्हटले होते कि कंपनी डिसेंबर महिन्यात या फोनचा अपग्रेडेड वर्जन पण आणेल ज्यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल. कंपनीने अजून या स्मार्टफोनची लॉन्च डेट नाही सांगितली पण फोनचे स्पेसिफिकेशन्स काय असतील हि माहिती आधीपासून ऑफिशियल आहे. आता Realme च्या घोषणेआधी 91 मोबाईल्सला बातमी मिळाली आहे कि Realme XT 730G स्मार्टफोन भारतात 20 डिसेंबर आधीच लॉन्च केला जाईल आणि या स्मार्टफोनची किंमत 17,000 रुपयांच्या असपास असेल.

91 मोबाईल्सला मिळालेल्या एक्सक्लूसिव माहितीनुसार Realme XT 730G स्मार्टफोन 20 डिसेंबरच्या आधी भारतीय बाजारात येईल. या फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. तसेच आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार Realme XT 730G ची बेस किंमत 17,000 रुपयांच्या आसपास असेल. या मॉडेलची मुख्य यूएसपी फोन मधील क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट असेल.

Realme XT 730G बद्दल बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64जीबी/128 जीबी मेमरी आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज सह पण लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे Realme XT 730G स्मार्टफोन सोबत Realme कंपनी ‘एयरपॉड’ पण भारतात लॉन्च करेल. हे एयरपॉड ब्रँडचे पहिले ट्रू वायरलेस ईयरफोन असतील. तर बाजारात Realme एयरपॉड येलो ह्यू सह ब्लॅक आणि वाईट कलर मध्ये लॉन्च केले जाऊ शकतात.

Realme XT कॅमेरा

Realme XT मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन असलेल्या अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चार करता येतात. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वर 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme XT 730G मध्ये पण हा कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल.

Realme XT स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme XT 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड ड्यूड्रॉप नॉचला सपोर्ट करतो. हा फोन ग्लॉस बॉडी वर बनलेला आहे ज्याच्या सुरक्षेसाठी कंपनीने Realme XT च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची कोटिंग केली आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 सह आला आहे. ज्यात प्रोसेसिंग साठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 712 एआई चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 616 जीपीयू देण्यात आला आहे.

Realme XT डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी व फोन अनलॉकिंग साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. Realme XT 730G मध्ये पावर बॅकअप साठी 30W VOOC फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी यूएसबी टाईप-सी ने चार्ज करता येईल.

The post Realme XT 730G 20 डिसेंबरच्या आधी होईल लॉन्च, किंमत असेल 17000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-xt-730g-india-launch-before-20-december-price-17000-4gb-ram-64gb-storage-30w-vooc-4000mah-battery/feed/ 0
Realme घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन सीरीज जी विकली जाईल फक्त ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर https://www.91mobiles.com/marathi/realme-offline-retail-centric-smartphone-series-launching-in-india-first-quarter-2020-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/realme-offline-retail-centric-smartphone-series-launching-in-india-first-quarter-2020-india-launch/#respond Fri, 22 Nov 2019 13:52:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5853 या सीरीजचे स्मार्टफोन्स खासकरून रिटेल स्टोर्स व मोबाईल दुकानांसाठी बनवले जातील.

The post Realme घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन सीरीज जी विकली जाईल फक्त ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने त्या दिवशी भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक साथ दोन नवीन स्मार्टफोन Realme X2 Pro आणि Realme 5s लॉन्च केले आहेत. Realme X2 Pro फ्लॅगशिप फोन आहे तर Realme 5s कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे. हे दोन्ही फोन येत्या काही दिवसांत सेल साठी उपलब्ध होतील आणि हे कंपनीच्या वेबसाइट सोबत ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येतील. विशेष म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हिट स्मार्टफोन्स फ्लॅश सेल अंतर्गत विकले जातात ज्यामुळे फोन आउट ऑफ स्टॉक होण्याची वेळ येते. पण आता Realme च्या बॅनर वरून अशी बातमी समोर आली आहे जी Realme फॅन्सना आनंद देऊ शकते. Realme बद्दल बोलले जात आहे कि हि कंपनी एका अश्या खास सीरीज वर काम करत आहे जी भारतात फक्त ऑफलाईन बाजारातच विकली जाईल. Realme संबंधित हि बातमी न्यूज एजेंसी पीटीआई कडून आली आहे. पीटीआई ने सांगितले आहे कि Realme ‘ऑफलाईन सेंट्रिक स्मार्टफोन सीरीज’ वर काम करत आहे आणि या सीरीजचे स्मार्टफोन्स खासकरून रिटेल स्टोर्स व मोबाईल दुकानांसाठी बनवले जातील.

2020 च्या पहिल्या तिमाहीत होईल लॉन्च

बातमी नुसार भारतीय स्मार्टफोन मध्ये आपली पकड अजून मजबूत करण्याच्या उद्देशाने Realme हि सीरीज मार्केट मध्ये आणेल. हि सीरीज ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर रिटेल स्टोर्स मध्ये विकली जाईल. Realme च्या या सीरीजचे नाव काय असेल आणि सीरीज अंतर्गत किती स्मार्टफोन येतील हे समजले नाही पण रिपोर्टनुसार रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ कबुली दिली आहे कि Realme offline retail-centric smartphone series पुढच्यावर्षी म्हणजे 2020 च्या पहिल्या तिमाहीत येईल.

माधव सेठ यांनी जीएफके डेटाच्या आधारावर सांगितले आहे कि Realme ने आता भारतीय ऑफलाईन बाजाराच्या 3 ते 5 टक्के मार्केट शेअर वर कब्जा केला आहे. पण कंपनीचे ध्येय आगामी काळात ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर मिळून इंडियन स्मार्टफोन मार्केटच्या 30 ते 35 टक्के मार्केट शेअर वर राज्य करण्याचे आहे. माधव सेठ यांच्या नुसार हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ऑफलाईन बाजारात पकड मजबूत करणे गरजेचे आहे. आणि कंपनी लवकरच ही पकड मजबूत करण्यासाठी आपली नवीन ‘ऑफलाईन सीरीज’ भारतात आणत आहे.

Realme 5s

ब्रँडच्या लेटेस्ट Realme 5s बद्दल बोलायचे तर हा फोन ने दोन वेरिएंट्स मध्ये आला. 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट कंपनीने 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तर फोनचा 4 जीबी + 128 जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Realme 5s येत्या को 29 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन क्रिस्टल रेड, क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल पर्पल कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X2 Pro

कंपनीचा हा फ्लॅगशिप फोन पण दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,99 रुपये आहे. दोन्ही वेरिएंट व्हाइट आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये येतात. तर Realme X2 Pro चा मास्टर एडिशन कंपनीने 12जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मध्ये सादर केला आहे, ज्याची किंमत 34,999 रुपये आहे. Realme X2 Pro चा सेल कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर 26 नोव्हेंबरला होईल.

The post Realme घेऊन येत आहे नवीन स्मार्टफोन सीरीज जी विकली जाईल फक्त ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-offline-retail-centric-smartphone-series-launching-in-india-first-quarter-2020-india-launch/feed/ 0
64MP कॅमेरा सह भारतात लॉन्च झाला Realme X2 Pro, OnePlus च्या अडचणी वाढल्या https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-pro-launched-in-india-with-64mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-pro-launched-in-india-with-64mp-camera/#respond Wed, 20 Nov 2019 13:16:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5829 या सेल मध्ये सहभागी होण्यासाठी इन्वाइट मिळवावे लागेल. हे इनवाइट Realme.com आणि फ्लिपकार्ट वर 21 ते 23 नोव्हेंबरला 12 वाजल्यापासून 12:30 पर्यंत मिळतील.

The post 64MP कॅमेरा सह भारतात लॉन्च झाला Realme X2 Pro, OnePlus च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात वेगाने यशाच्या पायऱ्या चढत असलेल्या चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आज भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लॉन्च केले. कंपनीने Realme X2 Pro आणि Realme 5s इंडियन मार्केट मध्ये सादर केले आहेत. या दोन्ही फोन्स पैकी Realme X2 Pro आधी कंपनीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला होता. आता कंपनीने Realme X2 Pro चा मास्टर एडिशन पण सादर केला आहे. चला जाणून घेऊया Realme X2 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशनची सर्व माहिती.

दमदार कॅमेरा

Realme X2 Pro स्मार्टफोन मध्ये 64 मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 64MP GW1 प्राइमरी सेंसर, 13MP टेलीफोटो लेंस सोबत 20x हाइब्रिड झूम सपॉर्ट, 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस सह 115-डिग्री फिल्ड ऑफ व्यू आहे जो 2.5mm मॅक्रो शॉट्स घेऊ शकतो. तसेच हा फोन 4K 60fps वीडियो आणि 960fps स्लो-मोशन रिकॉर्ड करण्यास सक्षम आहे. वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

डिस्प्ले

फोन मध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी (1080×2400 पिक्सल) सुपर एमोलेड फ्लूइड डिस्प्ले आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 20:9, रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि सॅम्पलिंग रेट 135 हर्ट्ज आहे. डिस्प्ले पॅनल डीसी डिमिंग 2.0 टेक्नॉलॉजी सपोर्ट सह येतो. स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 91.7 टक्के आहे आणि स्क्रीन प्रोटेक्शन साठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चा वापर करण्यात आला आहे.

रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसर

फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर सह 8 जीबी आणि 12 जीबी रॅम आहे. तसेच Realme X2 Pro मध्ये 128 जीबी (डुअल-चॅनेल यूएफएस 2.1), 256 जीबी (यूएफएस 3.0) आणि 512 जीबी (यूएफएस 3.0) स्टोरेज देण्यात आली आहे.

ऑपरेटिंग सिस्टम आणि कनेक्टिविटी ऑप्शन

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर फोन मध्ये 4जी एलटीई, वाई-फाई 802.11एसी, ब्लूटूथ वर्जन5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅकचा समावेश आहे. डुअल-सिम (नॅनो) असलेला रियलमी एक्स2 प्रो एंड्रॉयड 9 पाई वर आधारित कलरओएस 6.1 वर चालतो.

दमदार बॅटरी

या फोन मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जो 50 वॉट सुपर वूक फ्लॅश चार्ज सपोर्ट सह येतो. हि टेक्नोलॉजी फोन फक्त 35 मिनिटांत पूर्ण चार्ज करते. तसेच यात डॉल्बी एटमॉस आणि हाई-रेज ऑडियो टेक्नोलॉजी सपोर्ट सह डुअल स्पीकर्स आहेत.

किंमत

रियलमी एक्स2 प्रो ची भारतातील किंमत आज इवेंट मध्ये सांगण्यात आली आहे. Realme X2 Pro च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 29,999 रुपये, 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे. दोन्ही वेरिएंट व्हाइट आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये येतात. तसेच Realme X2 Pro चा मास्टर एडिशन कंपनीने 12जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज मध्ये सादर केला आहे, ज्याची किंमत 34,999 रुपये आहे.

Realme X2 Pro चा सेल कंपनीच्या वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर 26 नोव्हेंबर पासून सुरु होईल. या सेल मध्ये सहभागी होण्यासाठी इन्वाइट मिळवावे लागेल. हे इनवाइट Realme.com आणि फ्लिपकार्ट वर 21 ते 23 नोव्हेंबरला 12 वाजल्यापासून 12:30 पर्यंत मिळतील.

रियलमी एक्स2 प्रो वीडियो

The post 64MP कॅमेरा सह भारतात लॉन्च झाला Realme X2 Pro, OnePlus च्या अडचणी वाढल्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-pro-launched-in-india-with-64mp-camera/feed/ 0
Realme चा हिट स्ट्रोक : फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला Realme 5s https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-48mp-quad-rear-camera-launched-in-india-price-specifications-feature-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-48mp-quad-rear-camera-launched-in-india-price-specifications-feature-sale/#respond Wed, 20 Nov 2019 12:55:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5822 Realme 5s येत्या 29 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेता येईल.

The post Realme चा हिट स्ट्रोक : फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला Realme 5s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने दीर्घ प्रतीक्षेनंतर आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीने एक साथ दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Realme X2 Pro आणि Realme 5s चा समावेश आहे. Realme X2 Pro अंर्तराष्ट्रीय बाजारात आधीच आला आहे तर Realme 5s टेक विश्वासाठी नवीन आहे. Realme 5s कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे जो शानदार लुक सह क्वॉड रियर कॅमेरा आणि चांगल्या प्रोसेसिंग सह येतो. हा स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो 29 नोव्हेंबरपासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Realme 5s बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे आणि या नॉच मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. नॉचच्या वर स्पीकर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे. Realme 5s 3डी डायमंड कट डिजाईन वर बनवण्यात आला आहे.

Realme 5s पण सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे क्वॉड रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर्स आहेत तसेच सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. सर्वात खास बाब अशी कि कॅमेरा सेटअप मध्ये पहिल्या सेंसरच्या खाली त्याची MP पावर पण छापलेली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट व स्पीकर आहे.

5 कॅमेरा आहेत यात

Realme 5s च्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर फ्रंटला 1 सेंसर आहे. रियर कॅमेरा सेटअप पाहता यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा जीएम1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच त्याच अपर्चरची 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Realme 5s मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme 5s चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच हा डिवाईस 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Realme 5s कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Realme 5s एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे तसेच हा फोन 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतो.

Realme 5s बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा एक वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. Realme 5s डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Realme 5s मध्ये 5000एमएएच ची बॅटरी आहे.

किंमत व सेल

Realme 5s चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट कंपनीने 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तर फोनचा 4 जीबी + 128 जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Realme 5s येत्या 29 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन क्रिस्टल रेड, क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल पर्पल कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post Realme चा हिट स्ट्रोक : फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला Realme 5s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-48mp-quad-rear-camera-launched-in-india-price-specifications-feature-sale/feed/ 0
Realme 5s मध्ये आहे 5000एमएएच बॅटरी, 48एमपी क्वॉड कॅमेरा, 6.51 इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-48mp-quad-rear-camera-5000mah-battery-snapdragon-665-specs-revealed-india-launch-20-november-x2-pro/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-48mp-quad-rear-camera-5000mah-battery-snapdragon-665-specs-revealed-india-launch-20-november-x2-pro/#respond Mon, 18 Nov 2019 13:23:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5805 Realme येत्या 20 नोव्हेंबरला भारतात मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे. कंपनीने सांगितले आहे कि यादिवशी Realme ब्रँडचे दोन स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केले जातील. यात Realme X2 Pro आणि Realme 5s चा समावेश असेल. Realme X2 Pro अंर्तराष्ट्रीय बाजारात आधी आला आहे तर Realme 5s टेक विश्वासाठी नवीन आहे. Realme 5s कंपनीने शॉपिंग साइट […]

The post Realme 5s मध्ये आहे 5000एमएएच बॅटरी, 48एमपी क्वॉड कॅमेरा, 6.51 इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme येत्या 20 नोव्हेंबरला भारतात मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे. कंपनीने सांगितले आहे कि यादिवशी Realme ब्रँडचे दोन स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केले जातील. यात Realme X2 Pro आणि Realme 5s चा समावेश असेल. Realme X2 Pro अंर्तराष्ट्रीय बाजारात आधी आला आहे तर Realme 5s टेक विश्वासाठी नवीन आहे. Realme 5s कंपनीने शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर आधीच लिस्ट केला आहे आणि या लिस्टिंग मध्ये फोन लॉन्चच्या आधी याच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया कसा असेल Realme 5s आणि इसकी स्पेसिफिकेशन्स

लुक व डिजाईन

Realme 5s बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वाली नॉच देण्यात आली आहे आणि या नॉच मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. नॉचच्या वरच्या बाजूला स्पीकर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण दिसत आहे. त्यामुळे वाल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर असण्याची शक्यता आहे. Realme 5s चा रियर लुक इसी सीरीज मधील स्मार्टफोन Realme 5 सारखा आहे.

Realme 5s पण सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये असेल. सर्वात खास बाब अशी कि या कॅमेरा सेटअप मध्ये पहिल्या सेंसरच्या खाली त्याची MP पावर पण लिहिण्यात आली आहे. Realme 5s च्या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला Realme ची ब्रँडिंग आहे. फोटो मध्ये फोन डायमंड कट डिजाईन वर बनलेला दिसत आहे.

डिस्प्ले

Realme 5s च्या फ्लिपकार्ट लिस्टिंग वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन 6.51 इंचाच्या मोठ्या एचडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असेल ज्यात ‘यू’ शेप नॉच मिळेल. विशेष म्हणजे Realme आपल्या फोन मधील नॉचला ‘ड्यूड्रॉप नॉच’ म्हणते. आशा आहे कि Realme 5s मध्ये गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन पण असेल.

स्नॅपड्रॅगॉन चिपसेट

फ्लिपकार्ट वर Realme 5s स्मार्टफोन मधील चिपसेटचा पण खुलासा केला आहे. फोन मध्ये प्रोडक्ट पेज वर सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस क्वॉलकॉम चिपसेट वर लॉन्च केला जाईल आणि फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट मिळेल. हा चिपसेट आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी असेल.

48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा

Realme 5s चा बॅक पॅनल दाखवण्यासोबतच फ्लिपकार्टच्या प्रोडक्ट पेज वर असा पण खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर्स असतील तसेच सर्वात वरचा कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. या प्रोडक्ट पेज वर “Ultra Detailed Pictures, that remain sharp even when zoomed in” लिहिण्यात आले आहे, जो ईशारा करतो Realme 5s च्या क्वॉड कॅमेरा सेटअप मधील एका ‘टेलीफोटो लेंस’ कडे.

5000एमएएच बॅटरी

फ्लिपकार्ट वरून समजले आहे कि Realme 5s पण सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे दमदार व पावरफुल बॅटरी सह येईल. फोनच्या प्रोडक्ट पेज वर खुलासा करण्यात आला आहे कि पावर बॅकअप साठी Realme 5s मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल. आशा आहे कि हा फोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. फोनच्या इतर स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 20 नोव्हेंबरला फोन लॉन्च होण्याची वाट बघावी लागेल.

The post Realme 5s मध्ये आहे 5000एमएएच बॅटरी, 48एमपी क्वॉड कॅमेरा, 6.51 इंच डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-48mp-quad-rear-camera-5000mah-battery-snapdragon-665-specs-revealed-india-launch-20-november-x2-pro/feed/ 0
48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल Realme 5s, लो बजेट मध्ये देईल Xiaomi ला टक्कर https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-with-48-mp-quad-rear-camera-launching-in-india-20-november-with-x2-pro/ https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-with-48-mp-quad-rear-camera-launching-in-india-20-november-with-x2-pro/#respond Wed, 13 Nov 2019 11:23:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5764 हा स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल

The post 48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल Realme 5s, लो बजेट मध्ये देईल Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme संबंधित बातमी कालच समोर आली होती ज्यात समजले होते कि कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘रियलमी 5 सीरीज’ चा अजून एक नवीन फोन Realme 5s नावाने लॉन्च करणार आहे. या फोनची माहिती शॉपिंग साइट फ्लिपकार्ट कडून समोर आली होती जिथे Realme च्या आगामी डिवाईस Realme X2 Pro च्या प्रोडक्ट पेज वरच “realme 5s Coming Soon” लिहिण्यात आले होते. आज फ्लिपकार्टने Realme 5s चा वेगळा प्रोडक्ट पेज पण बनवला आहे. या पेज वर फोनच्या लॉन्च डेटची माहिती तर दिली आहे सोबत फोनच्या फोटोसह याच्या स्पेसिफिकेशनचा पण खुलासा केला आहे.

Realme 5s चा प्रोडक्ट पेज सध्या फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरच लाईव आहे. Realme ब्रँड कडून या फोनच्या लॉन्चची घोषणा करण्यात आलेली नाही पण फ्लिपकार्टने सांगितले आहे कि येत्या 20 नोव्हेंबरला रियलमीचा हा आगामी डिवाईस Realme 5s पण इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रियलमी आपला 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X2 Pro पण लॉन्च करेल.

Realme 5s

फ्लिपकार्ट वर 20 नोव्हेंबरला Realme 5s लॉन्चची माहिती तर देण्यात आली आहे तसेच सोबत फोनच्या प्रोडक्ट पेज वर Realme 5s चा फोटो पण दिसत आहे. पेज वर Realme 5s चा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यावरून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. या फोनचा रियर लुक या सीरीज मधील स्मार्टफोन Realme 5 सारखा आहे. Realme 5s पण सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये असेल. सर्वात खास बाब अशी कि या कॅमेरा सेटअप मध्ये पहिल्या सेंसरच्या खाली त्याची MP पावर पण लिहिण्यात आली आहे.

Realme 5s च्या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. फोटो मध्ये फोन डायमंड कट डिजाईन वर बनलेला दिसत आहे तसेच समोर आलेल्या फोटो मध्ये Realme 5s चा कलर रेड आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण दिसत आहे. त्यामुळे वाल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर असू शकतो. बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला Realme ची ब्रँडिंग आहे.

48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा

Realme 5s चा बॅक पॅनल दाखवण्यासोबतच फ्लिपकार्टच्या प्रोडक्ट पेज वर असा पण खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर्स असतील तसेच सर्वात वरचा कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. या प्रोडक्ट पेज वर “Ultra Detailed Pictures, that remain sharp even when zoomed in” लिहिण्यात आले आहे, जो ईशारा करतो Realme 5s च्या क्वॉड कॅमेरा सेटअप मधील एका ‘टेलीफोटो लेंस’ कडे.

Realme 5 सीरीज

या सीरीज मध्ये Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच सेल मध्ये 1,20,000 पेक्षा जास्त यूनिट विकून नवीन रिकॉर्ड बनवला होता. Realme 5 आणि Realme 5 Pro भारतीय बाजारात लोकांना खूप आवडले. Realme 5 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यात 4 जीबी + 64 जीबी, 6 जीबी + 64 जीबी आणि 8 जीबी + 128 जीबी चा समावेश आहे.

Realme 5 Pro चा 4 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर हा 14,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे पण ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर हा वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Realme 5 Pro च्या सर्वात मोठ्या 8 जीबी रॅम वेरिएंटची ऑनलाईन किंमत16,999 रुपये तर ऑफलाईन किंमत17,499 रुपये आहे.

Realme 5 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर Realme 5 चा 3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये, 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण मागे झालेल्या प्राइज कट नंतर हे तिन्ही फोन वेरिएंट 1,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. फोनचा 3जीबी + 32जीबी वेरिएंट 8,999 रुपये, 4जीबी + 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी + 128जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल Realme 5s, लो बजेट मध्ये देईल Xiaomi ला टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-5s-with-48-mp-quad-rear-camera-launching-in-india-20-november-with-x2-pro/feed/ 0