48 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेऱ्यासह 20 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होईल Realme 5s, लो बजेट मध्ये देईल Xiaomi ला टक्कर

Realme संबंधित बातमी कालच समोर आली होती ज्यात समजले होते कि कंपनी भारतीय बाजारात आपल्या ‘रियलमी 5 सीरीज’ चा अजून एक नवीन फोन Realme 5s नावाने लॉन्च करणार आहे. या फोनची माहिती शॉपिंग साइट फ्लिपकार्ट कडून समोर आली होती जिथे Realme च्या आगामी डिवाईस Realme X2 Pro च्या प्रोडक्ट पेज वरच “realme 5s Coming Soon” लिहिण्यात आले होते. आज फ्लिपकार्टने Realme 5s चा वेगळा प्रोडक्ट पेज पण बनवला आहे. या पेज वर फोनच्या लॉन्च डेटची माहिती तर दिली आहे सोबत फोनच्या फोटोसह याच्या स्पेसिफिकेशनचा पण खुलासा केला आहे.

Realme 5s चा प्रोडक्ट पेज सध्या फक्त शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरच लाईव आहे. Realme ब्रँड कडून या फोनच्या लॉन्चची घोषणा करण्यात आलेली नाही पण फ्लिपकार्टने सांगितले आहे कि येत्या 20 नोव्हेंबरला रियलमीचा हा आगामी डिवाईस Realme 5s पण इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या दिवशी रियलमी आपला 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme X2 Pro पण लॉन्च करेल.

Realme 5s

फ्लिपकार्ट वर 20 नोव्हेंबरला Realme 5s लॉन्चची माहिती तर देण्यात आली आहे तसेच सोबत फोनच्या प्रोडक्ट पेज वर Realme 5s चा फोटो पण दिसत आहे. पेज वर Realme 5s चा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे ज्यावरून फोनच्या डिजाईनचा खुलासा झाला आहे. या फोनचा रियर लुक या सीरीज मधील स्मार्टफोन Realme 5 सारखा आहे. Realme 5s पण सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये असेल. सर्वात खास बाब अशी कि या कॅमेरा सेटअप मध्ये पहिल्या सेंसरच्या खाली त्याची MP पावर पण लिहिण्यात आली आहे.

Realme 5s च्या कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. फोटो मध्ये फोन डायमंड कट डिजाईन वर बनलेला दिसत आहे तसेच समोर आलेल्या फोटो मध्ये Realme 5s चा कलर रेड आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण दिसत आहे. त्यामुळे वाल्यूम रॉकर फोनच्या डाव्या पॅनल वर असू शकतो. बॅक पॅनल वरच खालच्या बाजूला Realme ची ब्रँडिंग आहे.

48 मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा

Realme 5s चा बॅक पॅनल दाखवण्यासोबतच फ्लिपकार्टच्या प्रोडक्ट पेज वर असा पण खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रियर कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर्स असतील तसेच सर्वात वरचा कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. या प्रोडक्ट पेज वर “Ultra Detailed Pictures, that remain sharp even when zoomed in” लिहिण्यात आले आहे, जो ईशारा करतो Realme 5s च्या क्वॉड कॅमेरा सेटअप मधील एका ‘टेलीफोटो लेंस’ कडे.

Realme 5 सीरीज

या सीरीज मध्ये Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत, ज्यांनी आपल्या पहिल्याच सेल मध्ये 1,20,000 पेक्षा जास्त यूनिट विकून नवीन रिकॉर्ड बनवला होता. Realme 5 आणि Realme 5 Pro भारतीय बाजारात लोकांना खूप आवडले. Realme 5 Pro भारतात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे ज्यात 4 जीबी + 64 जीबी, 6 जीबी + 64 जीबी आणि 8 जीबी + 128 जीबी चा समावेश आहे.

Realme 5 Pro चा 4 जीबी रॅम वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता तर ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर हा 14,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर Realme 5 Pro चा 6 जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे पण ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर हा वेरिएंट 15,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. Realme 5 Pro च्या सर्वात मोठ्या 8 जीबी रॅम वेरिएंटची ऑनलाईन किंमत16,999 रुपये तर ऑफलाईन किंमत17,499 रुपये आहे.

Realme 5 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर Realme 5 चा 3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये, 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण मागे झालेल्या प्राइज कट नंतर हे तिन्ही फोन वेरिएंट 1,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. फोनचा 3जीबी + 32जीबी वेरिएंट 8,999 रुपये, 4जीबी + 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी + 128जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here