Realme चा हिट स्ट्रोक : फक्त 9999 रुपयांमध्ये लॉन्च केला 5000एमएएच बॅटरी आणि क्वॉड कॅमेरा असलेला Realme 5s

Realme ने दीर्घ प्रतीक्षेनंतर आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीने एक साथ दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत ज्यात Realme X2 Pro आणि Realme 5s चा समावेश आहे. Realme X2 Pro अंर्तराष्ट्रीय बाजारात आधीच आला आहे तर Realme 5s टेक विश्वासाठी नवीन आहे. Realme 5s कंपनीने लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे जो शानदार लुक सह क्वॉड रियर कॅमेरा आणि चांगल्या प्रोसेसिंग सह येतो. हा स्मार्टफोन 9,999 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च झाला आहे जो 29 नोव्हेंबरपासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Realme 5s बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच सह सादर केला गेला आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे आणि या नॉच मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. नॉचच्या वर स्पीकर आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वाल्यूम रॉकर देण्यात आला आहे. Realme 5s 3डी डायमंड कट डिजाईन वर बनवण्यात आला आहे.

Realme 5s पण सीरीज मधील स्मार्टफोन्स प्रमाणे क्वॉड रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे वरच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर्स आहेत तसेच सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. सर्वात खास बाब अशी कि कॅमेरा सेटअप मध्ये पहिल्या सेंसरच्या खाली त्याची MP पावर पण छापलेली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट व स्पीकर आहे.

5 कॅमेरा आहेत यात

Realme 5s च्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर फ्रंटला 1 सेंसर आहे. रियर कॅमेरा सेटअप पाहता यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा जीएम1 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच त्याच अपर्चरची 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Realme 5s मध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme 5s चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे तसेच हा डिवाईस 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.5 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Realme 5s कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Realme 5s एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला गेला आहे तसेच हा फोन 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतो.

Realme 5s बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा एक वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. Realme 5s डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Realme 5s मध्ये 5000एमएएच ची बॅटरी आहे.

किंमत व सेल

Realme 5s चा 4 जीबी + 64 जीबी वेरिएंट कंपनीने 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. तर फोनचा 4 जीबी + 128 जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Realme 5s येत्या 29 नोव्हेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइट वरून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन क्रिस्टल रेड, क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल पर्पल कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here