Realme X2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 17 Dec 2019 16:50:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme X2 आणि Redmi Note 8 Pro प्रो मध्ये कोण आहे जास्त दमदार https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-vs-remi-note-8-pro-price-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-vs-remi-note-8-pro-price-specifications-and-features/#respond Tue, 17 Dec 2019 16:50:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6066 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर तुम्हाला नको असेल तर रेडमी नोट 8 प्रो चांगला म्हणता येईल. कारण 3,000 रुपये काही कमी नाहीत.

The post Realme X2 आणि Redmi Note 8 Pro प्रो मध्ये कोण आहे जास्त दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीने आज भारतीय बाजारात एक्स2 मॉडेल लॉन्च केला आहे. हा फोन काही महिन्यांपूर्वी लॉन्च रियलमी एक्सटी चा अडवांस वर्जन आहे. म्हणजे प्रोसेसर सहित काही गोष्टी बदलण्यात आल्या आहेत पण स्क्रीन साइज, बॅटरी आणि कॅमेरा साहित डिजाइन जुन्या फोन सारखी आहे. एक प्रोसेसरच मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे जाणून घेणे गरजेचे आहे कि रेडमी नोट 8 प्रो ला मागे टाकण्याइतका हा ताकदवान झाला आहे का. कारण याआधी रियलमी एक्सटीच्या तुलनेत रेडमी अनेक बाबतीत पुढे होता. आता जर प्रोसेसर झाला असेल तर प्रश्न पुन्हा तोच आहे. कि रीयलमी एक्स2, शाओमी रेडमी नोट 8 प्रो पॅकी चांगला कोण? चला तर मग एक छोटीशी तुलना करून बघूया कोण कोणावर भारी पडतो ते?

डिजाइन

रियलमी एक्स2 च्या फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजुंना ग्लासचा वापर केला गेला आहे आणि दोन्ही मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे जी चांगली बाब म्हणता येईल. कंपनीने 3डी ग्लासचा वापर केला आहे जी हायपर बोलिक ग्रेडियंट कलर मध्ये उपलब्ध आहे. मागच्या पॅनल वर डावीकडे तुम्हाला फ्लॅश सह क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल खाली यूएसबी टाइपी—सी, 3.5एमएम ऑडियो जॅक आणि लाउडस्पीकर मिळेल. एकंदरीत डिजाइन शानदार आहे आणि तुम्हाला आवडेल.

https://img.hi.91mobiles.com/uploads/2019/12/Realme-X2.jpg

Redmi Note 8 Pro प्रो पण डिजाइनच्या बाबतीत मागे नाही. हा फोन पण ग्लास डिजाइन सह येतो. फ्रंट आणि बॅक दोन्ही मध्ये तुम्हाला 3डी ग्लास मिळेल. तसेच कंपनीने ग्रेडियंट कलरचा वापर केला आहे जो आकर्षक आहे. मागच्या पॅनल वर कॅमेरा सेटअप आहे. कॅमेरा सेटअप थोडा वेगळा आहे. तीन कॅमेरा एक साथ आणि त्याखाली फिंगरप्रिंट स्कॅनर, जवळ चौथा कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे. खाली पोर्ट्स आणि बाजूला हार्डवेयर बटण आणि सिम स्लॉट. डिजाइनच्या बाबतीत हा फोन पण मागे नाही.

डिस्प्ले

Realme X2 मध्ये तुम्हाला नॉच स्क्रीन मिळेल. यात 6.4-इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे जो फुल एचडी+ (2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन) रेजल्यूशन सह येतो. फोनचा डिस्प्ले शानदार आहे आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. खास बाब अशी कि कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर चा वापर केला आहे.

Xiaomi Redmi Note 8 Pro मध्ये पण 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असेलला 6.53 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. यात पण तुम्हाला वॉटर ड्रॉप नॉच मिळेल आणि हा फोन पण कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड आहे.

पण कमकुवत बाब म्हणजे यात तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर मिळणार नाही. तसेच सुपर एमोलेड डिस्प्ले पण नाही. त्यामुळे रियलमी एक्स2 खूप पुढे आहे.

कॅमेरा

Realme X2 मध्ये 64 एमपी चा क्वाड कॅमेरा सेटअप आहे. याचा मेन सेंसर Samsung ISOCELL Bright GW1 आहे जो एफ/1.8 अपर्चर सह येतो. तर दुसरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे आणि हा अल्ट्रावाइड अँगलला सपोर्ट करतो. कंपनीने यासाठी एफ/2.25 अपर्चरचा वापर केला आहे. तसेच तिसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे आणि हा डेफ्थ सेंसिंगचे काम करतो. तर चौथा सेंसर 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. दोन्ही मध्ये एफ/2.4 अपर्चर आहे. सेल्फी पाहता कंपनीने 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो.

Redmi Note 8 Pro मध्ये पण मेन कॅमेरा 64-मेगापिक्सलचा आहे आणि कंपनीने Samsung ISOCELL सेंसरचा वापर केला आहे. हा एफ/1.8 अपर्चर सह येतो. तसेच 8 मेगापिक्सलचा दुसरा सेंसर जो एफ/2.2 अपर्चर सह येतो आणि हा वाइड अँगलला सपोर्ट करतो. तर तिसरा सेंसर 2 मेगापिक्सलचा जो डेफ्थ सेंसंरचे काम करतो आणि चौथा 2 मेगापिक्सल आणि हि मॅक्रो लेंस आहे. कॅमेरा सेग्मेंट एक सारखा आहे. त्यामुळे कोण पुढे कोण मागे सांगता येत नाही.

सेल्फी मध्ये रियलमी बाजी मारत आहे. कारण रेडमी नोट 8 प्रो मध्ये 20 एमपी चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे तर रियलमी एक्स2 मध्ये तुम्हाला 32एमपी कॅमेरा मिळतो.

हार्डवेयर

रियलमी एक्सटी आणि एक्स2 मध्ये मुख्य फरक प्रोसेसरचा आहे. हा फोन क्वालकॉमच्या अडवांस स्नॅपड्रॅगन 730जी चिपसेट वर चालतो. यात 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर मिळेल. ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रीनो 618 जीपीयू देण्यात आला आहे आणि भारतीय बाजारात हा फोन 4जीबी रॅम 64जीबी मेमरी, 6जीबी रॅम 64जीबी मेमरी आणि 8जीबी रॅम व 128जीबी मेमरी मध्ये उपलब्ध आहे. एनटूटू बेंचमार्क वर या फोनला 2,66,028 स्कोर मिळाला आहे.

रेडमी नोट 8 प्रो पाहता हा फोन मीडियाटेकच्या नवीन हेलीयो जी90टी चिपसेट वर चालतो आणि यात माली जी76 एमसी4 जीपीयूला सपोर्ट देण्यात आला आहे. ऑक्टाकोर प्रोसेसर असेलला हा चिपसेटचा अधिकतम क्लॉक स्पीड 2.05 आहे. हा फोन 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज, 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. एनटूटू बेंचमार्क वर या फोनला 2,86,100 स्कोर मिळाला आहे.

त्यामुळे तुम्ही म्हणू शकता कि स्पीडच्या बाबतीत शाओमी, रियलमी पेक्षा थोडी पुढे गेली आहे. क्वालकॉम प्रोसेसर जास्त स्टेबल आणि चांगले असतात पण इथे मीडियाटेक जिंकतो.

ऑपरेटिंग सिस्टम

Realme X2 कलर ओएस 6.1 वर चालतो जो एंडरॉयड 9 पाई आधारित आहे. कंपनी हा अपडेट करणार आहे.
तर Redmi Note 8 Pro मी यूआई 10 वर चालतो आणि हा एंडरॉयड 9 पाई आधारित आहे. याला पण एंडरॉयड 10 अपडेट मिळणार आहे.

कनेक्टिविटी

Realme X2 मध्ये तीन कॉर्ड स्लॉट आहेत ज्यात दोन सिम सह तुम्ही एक मेमरी कार्डचा वापर करू शकता. सोबत यूएसबी टाईप—सी, 3.5 एमएम आॅडियो जॅक, वाईफाई, 4जी वोएलटीई आणि ब्लूटूथ पण मिळेल.

Redmi Note 8 Pro मध्ये पण दोन सिम फोन सह तुम्ही एका माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. हा फोन 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. तसेच आईआर ब्लास्टर, ब्लूटूथ, वाईफाई आणि यूएसबी टाईप सी सह ही 3.5एमएम पण मिळेल.

इथे जवळपास सर्व एकसारखे आहे पण आईआर ब्लास्टर असल्यामुळे शाओमी पुढे आहे.

बॅटरी

Realme X2 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे आणि यात VOOC flash charge 4.0 टेक्नॉलॉजी आहे. 30W चा चार्जर बॉक्स मध्ये दिला आहे. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी 30 मिनिटांत 67 टक्के चार्ज करू शकतो.

तसेच Redmi Note 8 Pro 18वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 4500एमएएच च्या दमदार बॅटरीला सपोर्ट करतो.

मोठी बॅटरी रेडमी मध्ये असलीतरी चार्जिंग फास्ट रियलमीची आहे.

प्राइस

Realme X2 च्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजची किंमत 18,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोन साठी तुम्हाला 19,999 रुपये द्यावे लागतील.

Redmi Note 8 Pro च्या 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 15,999 रुपयांमध्ये घेता येईल. त्याचबरोबर 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज साठी तुम्हाला 17,999 रुपये द्यावे लागतील.

निष्कर्ष

बघू शकतो कि रियलमी एक्स2 ची किंमत रेडमी नोट8 प्रो पेक्षा थोडी जास्त आहे पण यात तुम्हाला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, सुपर एमोलेड डिस्प्ले आणि फास्ट चर्जिंग मिळते. तसेच सेल्फी कॅमेरा पण चांगला आहे आणि चांगली बाब अशी क्वालकॉम चिपसेट मीडियाटेक पेक्षा थोडा पुढे राहतो. रेडमी पाहता यात कमी किंमतीसह मोठी बॅटरी आणि स्टोरेज पण थोडी जास्त आहे. जर इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर तुम्हाला नको असेल तर रेडमी नोट 8 प्रो चांगला म्हणता येईल. कारण 3,000 रुपये काही कमी नाहीत.

The post Realme X2 आणि Redmi Note 8 Pro प्रो मध्ये कोण आहे जास्त दमदार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-vs-remi-note-8-pro-price-specifications-and-features/feed/ 0
Realme ने पहिल्या वर्षात विकले 150 लाख स्मार्टफोन, पुढच्या वर्षाचे ध्येय 300 लाख https://www.91mobiles.com/marathi/realme-sold-15-million-smartphone-in-first-year-of-operation-india-to-double-sales-in-2020/ https://www.91mobiles.com/marathi/realme-sold-15-million-smartphone-in-first-year-of-operation-india-to-double-sales-in-2020/#respond Tue, 17 Dec 2019 15:14:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6064 Realme ने आपल्या फेस्टिवल सेल मध्ये एका महिन्यात 5.2 मिलियन म्हणजे 52 लाख स्मार्टफोन यूनिट विकले होते.

The post Realme ने पहिल्या वर्षात विकले 150 लाख स्मार्टफोन, पुढच्या वर्षाचे ध्येय 300 लाख first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme X2 भारतीय बाजारात आला आहे. या फोन मुळे रियलमी इंडियन मार्केट मधील एकमेव असा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे ज्याचे सर्वात जास्त 64 मेगापिक्सल कॅमेरा असेल स्मार्टफोन्स आहेत. Realme ने कमी काळात भारतीय मोबाईल बाजारातील एका मोठ्या हिस्स्यावर कब्जा केला आहे. Realme फॅन फॉलोइंग सतत वाढत आहे आणि तेवढ्याच वेगाने कंपनी प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या पुढे जात आहे. अनेक नवीन रेकॉर्ड करत Realme ने अजून एक धक्कादायक घोषणा केली आहे कि आपल्या पहिल्या वर्षातच या ब्रँडने भारतात 15 मिलियन म्हणजे 150 लाख स्मार्टफोन विकले आहेत.

Realme संबंधित हि मोठी बातमी स्वतः ब्रँडचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितली आहे. न्यूज एजेंसी पीटीआई कडून समोर आलेल्या माहिती नुसार Realme ने भारतात आपल्या पहिल्या वर्षात 15,000,000 स्मार्टफोन यूनिट विकले आहेत. 150 लाख या आकड्याला स्पर्श करत असताना माधव सेठ म्हणाले कि पहिल्या वर्षात मिळालेली हि उपलब्धी त्यांना अजून मोठी करायची आहे तसेच त्यांनी ध्येय ठरवले आहे कि साल 2020 मध्ये संख्या वाढवून दुप्पट व्हावी. विशेष म्हणजे मे 2018 मध्ये Realme ने भारतात आपले स्मार्टफोन विकायला सुरवात केली होती.

सर्वात वेगवान ब्रँड

Realme ने मे 2018 मध्ये आपल्या सुरवातीनंतर एक वर्षात 15 मिलियन स्मार्टफोन विकले आहेत. या आकड्यांसह Realme इंडियन मार्केट मध्ये सर्वात वेगाने वाढणाऱ्या ब्रँड्स पैकी एक बनला आहे. कंपनीचे ध्येय दुसऱ्या वर्षात हि संख्या दुप्पट म्हणजे 300 लाख करायची आहे. अलीकडे आईडीसीने शेयरकेलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Realme ने भारतीय मोबाईल बाजारात 14.3 टक्के मार्केट शेयर वर कब्जा केला आहे ज्यामुळे हा देशातील चौथा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

Xiaomi – Samsung ला टक्कर

Realme च आहे वेग सर्वात जास्त टक्कर Xiaomi आणि Samsung ला देत आहे. आईडीसी च्या रिपोर्ट तिसऱ्या तिमाहीचा होता ज्यात Xiaomi चा मार्केट शेयर सर्वात जास्त 27.1 टक्के होता तसेच 18.9 टक्के मार्केट शेयर सह Samsung दुसऱ्या नंबर वर होती. एका वर्षातच 14 टक्के पेक्षा पण जास्त हिस्सेदारी मिळवणारी Realme मुळे शाओमीच्या जागेला आणि सॅमसंगच्या साम्राज्याला खतरा वाटत आहे. तसेच या लिस्ट मध्ये 15.2 टक्के मार्केट शेयर सह Vivo तिसऱ्या स्थानी होती.

दिवाळीत विकले 52 लाख स्मार्टफोन

Realme ने आपल्या फेस्टिवल सेल मध्ये एका महिन्यात 5.2 मिलियन म्हणजे 52 लाख स्मार्टफोन यूनिट विकले होते. कंपनीनुसार 30 सप्टेंबर पासून 31 ऑक्टोबर पर्यंत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म व रिटेल स्टोर्स वर आयोजित फेस्टिवल सेल मध्ये Realme चे 5.2 मिलियन पेक्षा पण जास्त स्मार्टफोन विकले आहेत. फक्त एका महिन्यातच 52 लाख स्मार्टफोन विकून Realme ने नवीन रेकॉर्ड बनवला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत Realme ने 160 टक्के वाढ नोंदवली आहे.

जगातील 7वा स्मार्टफोन ब्रँड

Realme गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 808 टक्क्यांची वाढ नोंदवून जगातील 7वा सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड पण बनली आहे. गेल्या वर्षी Realme जगभरात 47व्या स्थानी होती. तर यावर्षी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत Realme ने थेट 3 टक्क्यांवरून 18 टक्क्यांची वाढ केली आहे. एका रिपोर्ट मध्ये खुलासा झाला होता कि Realme ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 6 पट जास्त वेगाने आपला विस्तार केला आहे. साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत Realme ने ग्लोबल मार्केट मध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट केली होती.

लवकरच येईल Realme ची ऑफलाईन सीरीज

माधव सेठ यांनी पण कंफर्म कर केले आहे कि कंपनी लवकरच भारतात आपली ऑफलाईन एक्सक्लूसिव स्मार्टफोन सीरीज आणणार आहे. हि स्मार्टफोन सीरीज फक्त ऑफलाईन प्लॅटफॉर्म वर लॉन्च होईल आणि या सीरीज अंतर्गत लॉन्च होने वाले स्मार्टफोन फक्त रिटेल स्टोर्स वरच सेल साठी उपलब्ध होईल. माधव सेठ यांनी सांगितले कि नवीन वर्ष सुरु होण्याआधी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटी Realme अधिकृतपणे या सीरीजचे नाव सांगेल. या सीरीजचे फोन मीड प्रीमियम रेंजचे असतील.

The post Realme ने पहिल्या वर्षात विकले 150 लाख स्मार्टफोन, पुढच्या वर्षाचे ध्येय 300 लाख first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-sold-15-million-smartphone-in-first-year-of-operation-india-to-double-sales-in-2020/feed/ 0
Realme X2 भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 4000mAh बॅटरी, 32MP सेल्फी आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launched-in-india-with-snapdragon-730g-32mp-selfie-64mp-isocell-bright-gw1-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launched-in-india-with-snapdragon-730g-32mp-selfie-64mp-isocell-bright-gw1-price-sale/#respond Tue, 17 Dec 2019 12:20:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6060 Realme X2 16,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 20 डिसेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

The post Realme X2 भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 4000mAh बॅटरी, 32MP सेल्फी आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने सप्टेंबर महिन्यात सांगितले होते कि कंपनी साल 2019 च्या शेवटी भारतीय बाजारात एक असा स्मार्टफोन लॉन्च करेल जो 64 मेगापिक्सल सेंसर असलेल्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल आणि क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालेल. हा स्मार्टफोन Realme XT 730G नावाने लॉन्च केला जाईल. आज हा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणत रियलमीने आपला डिवाईस Realme X2 नावाने अधिकृतपणे लॉन्च केला आहे. Realme X2 16,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 20 डिसेंबर पासून भारतात सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X2 लुक व डिजाईन

रियलमी एक्स2 कंपनीने 3डी ग्लॉस डिजाईन सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे. Realme ने याला ‘ड्यूड्रॉप नॉच’ चे नाव दिले आहे. Realme X2 कंपनीने ग्लॉस बॅक पॅनल वर सादर केला जो प्रीमियम दिसतो. Realme X2 च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जो वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे.

या कॅमेरा सेटअप मध्ये चारही सेंसर एकाच रिंग मध्ये आहेत तसेच सर्वात वरील कॅमेरा सेंसरला पिवळ्या रंगाची आउट लाईन आहे. या सेंसरच्या खाली 64MP लिहिण्यात आले आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला Realme ची ब्रॅंडिंग देण्यात आली आहे. Realme X2 च्या साईड पॅनल वर पावर बटन व वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे खालच्या बाजूला यूएसबी पोर्ट आहे.

कॅमेरा डिटेल

Realme X2 मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन असलेली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे फ्लॅश लाईट सह देण्यात आले आहेत. Realme X2 च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

त्याचबरोबर Realme X2 एफ/2.25 अपर्चर असलली 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि त्याच अपर्चरची 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme X2 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme X2 स्पेसिफिकेशन्स

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता Realme X2 91.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.4-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीन मध्ये रियलमीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तर Realme X2 च्या सुरक्षेसाठी फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme X2 एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6.1 वर सादर केला गेला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज़ क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 618 जीपीयू देण्यात आला आहे. भारतीय बाजारात Realme X2 तीन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे ज्यात 4 जीबी रॅम, 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमचा समावेश आहे.

Realme X2 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. Realme X2 मध्ये पावर बॅकअप साठी VOOC flash charge 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 30W फास्ट चार्जिंग असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट ने चार्ज करता येईल. कंपनीचा दावा आहे कि हा फोन 30 मिनिटांत 67 टक्के चार्ज होऊ शकतो.

वेरिएंट्स आणि किंमत

Realme X2 येत्या 20 डिसेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल जिथे हा फोन पर्ल ग्रीन, पर्ल ब्लू आणि पर्ल व्हाईट कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध असेल. Realme X2 चे वेरिएंट्स आणि किंमत पाहता:

4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 18,999 रुपये

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 19,999 रुपये

The post Realme X2 भारतात झाला लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 4000mAh बॅटरी, 32MP सेल्फी आणि 64MP क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launched-in-india-with-snapdragon-730g-32mp-selfie-64mp-isocell-bright-gw1-price-sale/feed/ 0
Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/#respond Wed, 11 Dec 2019 09:40:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6034 काही अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे Realme X2 आणि Realme XT एकमेकांपेक्षा खूप वेगळे ठरतात

The post Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 17 डिसेंबरला भारतीय बाजारात आपला नवीन डिवाईस Realme X2 लॉन्च करेल. हा स्मार्टफोन सप्टेंबर मध्ये लॉन्च झालेल्या Realme XT चा अपग्रेडेड वर्जन असेल ज्याची माहिती कंपनीने दोन महिन्यांपूर्वी दिली होती. तेव्हा कंपनीने या फोनचे नाव Realme XT 730G सांगितले होते जो आता Realme X2 नावाने टीज केला जात आहे. Realme XT स्मार्टफोन भारतात लॉन्च झालेला पहिला रियलमी फोन होता जो 64 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. तसेच Realme X2 स्मार्टफोन पण 64MP कॅमेऱ्यासह येईल या दोन्ही स्मार्टफोनचा लुक हुबेहूब असेल, पण काही अश्या गोष्टी आहेत ज्यामुळे Realme X2 आणि Realme XT एकमेकांपेक्षा खूप वेगळे ठरतात. पुढे तुम्हाला समजेल कि का आणि किती वेळगेल आहेत हे दोन्ही स्मार्टफोन.

प्रोसेसर

Realme XT स्मार्टफोन कंपनीने भारतात एंडरॉयड 9 पाई आधारित कलर ओएस 6 वर सादर केला होता जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 712 एआईई चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी Realme XT मध्ये एड्रेनो 616 जीपीयू आणि सोबत गेम बूस्ट 2.0 टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पण आहे. पण Realme X2 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर लॉन्च केला जाईल जो 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या प्रोसेसर वर चालेल.

बॅटरी

Realme XT कंपनीने 4,000एमएएच बॅटरी वर लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. Realme XT 20वॉट चार्जरला सपोर्ट करतो जो यूएसबी टाईप-सी ने चार्ज केला जाऊ शकतो. तसेच Realme X2 मध्ये पण 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल पण हा फोन रियलमी 30वॉट VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट सह लॉन्च करेल. म्हणजे Realme X2 स्मार्टफोन Realme XT च्या तुलनेत जास्त वेगाने चार्ज होईल.

रॅम व स्टोरेज

Realme XT भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला होता. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. त्याचबरोबर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तर Realme X2 संबंधित जी माहिती समोर आली आहे त्यानुसार रियलमी या स्मार्टफोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देईल. तर Realme XT 730G च्या इतर वेरिएंट्स मध्ये पण जास्त स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

कॅमेरा सेग्मेंट

Realme X2 चा कॅमेरा सेग्मेंट Realme XT सारखा असेल. या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशनची अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येते. फोनच्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच Realme XT 8-मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वरच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Realme XT 16-मेगापिक्सलच्या Sony IMX471 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme X2 मध्ये पण हा कॅमेरा मॉड्यूल दिला जाईल.

17 डिसेंबरला Realme X2 स्मार्टफोन सोबत Realme एयरपॉड पण भारतीय बाजारात येतील. ये एयरपॉड ब्रँडचे पहिले ट्रू वायरलेस ईयरफोन असतील. तसेच Realme X2 बद्दल बोलायचे तर आशा आहे कि हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 17,000 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम मिळू शकतो. Realme X2 बद्दल अशी अशा व्यक्त केली जात आहे कि हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64जीबी/128 जीबी मेमरी वेरिएंट सह पण लॉन्च केला जाऊ शकतो. Realme X2 च्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीचा खुलासा 17 डिसेंबरला होईल.

The post Realme X2 स्मार्टफोन 17 डिसेंबरला होत आहे भारतात लॉन्च, जाणून घ्या किती वेगळा आहे Realme XT पेक्षा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-india-launch-17-december-know-difference-between-realme-xt-specs-chipset-battery/feed/ 0
8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launch-64mp-quad-camera-snapdragon-730g-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launch-64mp-quad-camera-snapdragon-730g-specs-price/#respond Tue, 24 Sep 2019 13:51:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5403 Realme X2 डिसेंबर मध्ये भारतात येईल आणि भारतीय बाजारात हा फोन Realme XT 730G नावाने लॉन्च केला जाईल.

The post 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने या महिन्यात भारतात ब्रँडचा पहिला 64 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT लॉन्च केला होता. फोन भारतीय बाजारात लॉन्च करताना Realme ने सांगितले होते कि कंपनी डिसेंबर मध्ये या फोनचा अजून एक मॉडेल देशात लॉन्च करेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह येईल. आज Realme ने हा आगामी स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. Realme ने हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात लॉन्च केला आहे जिथे हा Realme X2 नावाने सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X2 स्पेसिफिकेशन्स

रियलमीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 91.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे स्क्रीन वर टच करताच हा अनलॉक होतो. फोनच्या डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी Realme X2 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme X2 एंडरॉयड 9.0 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 730जी वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 618 जीपीयू आहे. चीनी बाजारात Realme X2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme X2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन असलेली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. Realme X2 मध्ये एफ/1.8 अपर्चर वाला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme X2 एफ/2.0 अपर्चर वाल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme X2 डुअल सिम फोन आहे जो डुअल 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 30W VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट द्वारे चार्ज करता येईल. विशेष म्हणजे हि चार्जिंग टेक्नॉलॉजी फक्त 30 मिनिटांत फोन 67 टक्के चार्ज करू शकते.

हे देखील वाचा: Exclusive : ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट्स मध्ये होईल भारतात लॉन्च, किंमत होईल 10,990 रुपयांपासून सुरु

किंमत

Realme X2 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 1599 युआन (जवळपास 15,900 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 8 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 1899 युआन (जवळपास 18,900 रुपये) आहे. Realme X2 चीन मध्ये पर्ल व्हाइट आणि पर्ल ब्लू कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Realme X2 डिसेंबर मध्ये भारतात येईल आणि भारतीय बाजारात हा फोन Realme XT 730G नावाने लॉन्च केला जाईल.

The post 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x2-launch-64mp-quad-camera-snapdragon-730g-specs-price/feed/ 0