5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वीवो ने अलीकडेच जगातील पहिला डुअल पॉप सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन Vivo V17 Pro लॉन्च केला होता, ज्याची किंमत 29,990 रुपये होती. आज कंपनीने आपल्या बजेट कॅटगरी मध्ये Vivo U10 सादर केला आहे.

कंपनीच्या U सीरीज मध्ये येणारा हँडसेट ऑनलाइन एक्सक्लूसिव सेल केला जाईल. त्यामुळे कंपनी Vivo U10 पण ई-कॉर्मस अमेझॉन इंडिया वर 29 पासून सेल करेल. U10 च्या 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,990 रुपये, 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,990 रुपये आणि 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,990 रुपये आहे.

डिजाइन

Vivo U10 कंपनीने ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. हा कॅमेरा सेटअप बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट दिली जाईल तर मधोमध रियर फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचप्रमाणे Vivo U10 वॉटरड्रॉप नॉच सह जी ‘वी’ शेप असेल. Vivo U10 चा डिस्प्ले बेजल लेस आहे. पण खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल. त्याचप्रमाणे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण Vivo U10 च्या उजव्या पॅनल वर असेल तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट दिला जाईल. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि 3.5एमएम जॅक असेल.

हे देखील वाचा: Exclusive : ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट्स मध्ये होईल भारतात लॉन्च, किंमत होईल 10,990 रुपयांपासून सुरु

दमदार बॅटरी

कंपनीने Vivo U10 मध्ये 5,000एमएएच पावर असेलेली बॅटरी दिली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येईल. या टेक्नॉलॉजीमुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्ज मध्ये Vivo U10 यूजरला 4.5 तासांचा टॉकटाईम मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

कंपनीने फोन मध्ये 6.35-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला आहे जो वॉटर ड्रॉप नॉच स्टाइल सह येतो. तसेच फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आहे. त्याचबरोबर फोनची स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी साठी फोनच्या मागे 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर, 8-मेगापिक्सल सेकंडरी सेंसर सुपर वाइड अँगल लेंस सह आहे. फोन मध्ये तिसरा 2-मेगापिक्सलचा tertiary सेंसर आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: 4 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सह Samsung Galaxy A20s ग्लोबल मार्केट मध्ये झाला लॉन्च

Vivo U10 कंपनीने तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. या वेरिएंट्स मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी स्टोरेज, 3 जीबी रॅम सह 64 जीबी मेमरी आणि 4 जीबी रॅम सह 64 जीबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here