8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च

Realme ने या महिन्यात भारतात ब्रँडचा पहिला 64 MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Realme XT लॉन्च केला होता. फोन भारतीय बाजारात लॉन्च करताना Realme ने सांगितले होते कि कंपनी डिसेंबर मध्ये या फोनचा अजून एक मॉडेल देशात लॉन्च करेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह येईल. आज Realme ने हा आगामी स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. Realme ने हा स्मार्टफोन सध्या चीनी बाजारात लॉन्च केला आहे जिथे हा Realme X2 नावाने सेल साठी उपलब्ध होईल.

Realme X2 स्पेसिफिकेशन्स

रियलमीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 91.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे स्क्रीन वर टच करताच हा अनलॉक होतो. फोनच्या डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी Realme X2 कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Realme X2 एंडरॉयड 9.0 पाई आधारित कलर ओएस 6.0 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 730जी वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 618 जीपीयू आहे. चीनी बाजारात Realme X2 दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme X2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोन मध्ये Samsung ISOCELL Bright GW1 टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. या टेक्नोलॉजीने 9216 x 6912 रेज्ल्यूशन असलेली अल्ट्रा-हाई पिक्सल इमेज कॅप्चर करता येईल. Realme X2 मध्ये एफ/1.8 अपर्चर वाला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगलला सपोर्ट करतो. रियर पॅनल वर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Realme X2 एफ/2.0 अपर्चर वाल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme X2 डुअल सिम फोन आहे जो डुअल 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये 30W VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप-सी पोर्ट द्वारे चार्ज करता येईल. विशेष म्हणजे हि चार्जिंग टेक्नॉलॉजी फक्त 30 मिनिटांत फोन 67 टक्के चार्ज करू शकते.

हे देखील वाचा: Exclusive : ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy A20s दोन वेरिएंट्स मध्ये होईल भारतात लॉन्च, किंमत होईल 10,990 रुपयांपासून सुरु

किंमत

Realme X2 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट 1599 युआन (जवळपास 15,900 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 8 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 1899 युआन (जवळपास 18,900 रुपये) आहे. Realme X2 चीन मध्ये पर्ल व्हाइट आणि पर्ल ब्लू कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे Realme X2 डिसेंबर मध्ये भारतात येईल आणि भारतीय बाजारात हा फोन Realme XT 730G नावाने लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here