Red Magic 7S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 14 Jul 2022 06:54:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 कधीच हँग होणार नाही हा फोन? 18GB रॅमसह दणकट स्मार्टफोनची एंट्री, किंमत वनप्लसपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/red-magic-7s-and-red-magic-7s-pro-launched-check-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/red-magic-7s-and-red-magic-7s-pro-launched-check-price-and-specifications/#respond Thu, 14 Jul 2022 06:54:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11387 Red Magic 7S आणि RedMagic 7s Pro दोन्ही स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहेत.

The post कधीच हँग होणार नाही हा फोन? 18GB रॅमसह दणकट स्मार्टफोनची एंट्री, किंमत वनप्लसपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Nubia नं आपल्या होम मार्केट चीनमध्ये Red Magic 7S या गेमिंग स्मार्टफोन सीरीज अंतर्गत Red Magic 7S आणि Red Magic 7S Pro असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. याची सुरुवात कंपनीनं क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देऊन केली आहे. जो लेटेस्ट आणि पावरफुल अँड्रॉइड प्रोसेसर आहे. ये दोन्ही स्मार्टफोन 18GB पर्यंत रॅम आणि 165Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आले आहेत.

Red Magic 7S चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Red Magic 7S फोनमध्ये 6.8-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 165Hz रिफ्रेश रेट आणि 720Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळतो. सोबतीला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा गेमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 आधारित Red Magic OS 5.5 वर चालतो. हे देखील वाचा: स्वस्तात 128 जीबी मेमरी असलेला स्मार्टफोन; 5000mAh च्या बॅटरीसह Tecno Camon 19 Neo आणि Camon 19 लाँच

या फोनमध्ये ICE Magic कूलिंग सिस्टम 9.0, 520Hz टच सॅम्पलिंग रेट असलेले शोल्डर ट्रिगर आणि मॅजिक GPU स्टेबल फ्रेम इंजिन असे गेमिंग सेंट्रिक फीचर्स देण्यात आले आहेत. नूबियाच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबतीला 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. Red Magic 7S स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी, 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Red Magic 7S Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Red Magic 7S Pro स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स Red Magic 7S सारखेच आहे. या फोनमध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनचा ट्रान्सपरंट एडिशन RGB कूलिंग फॅनसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 960Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 165Hz रिफ्रेश रेट असलेला 6.8-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 18GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज मिळते. कंपनीनं ICE Magic Cooling 10.0 सिस्टम दिली आहे. पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी 135W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या फोनचा रियर कॅमेरा Red Magic 7S प्रमाणे आहे. फोनच्या फ्रंटला 16MP चा अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा शूटर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर

किंमत आणि उपलब्धता

Red Magic 7S सीरीज डार्क नाइट आणि ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट व्हेरिएंट देण्यात आला आहे. तसेच Red Magic 7S Pro चा ट्रांसफॉर्मस एडिशन बंबलबी प्रेरित डिजाइनसह सादर करण्यात आला आहे.

Red Magic 7S ची किंमत

  • 8GB+128GB: CNY 3,999 (सुमारे 47,300 रुपये)
  • 12GB+256GB: CNY 4,799 (सुमारे 56,800 रुपये)
  • 12GB+256GB ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट: CNY 4,899 (सुमारे 57,900 रुपये)
  • 16GB+512GB ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट: CNY 5,499 (सुमारे 65,000 रुपये)

Red Magic 7S Pro ची किंमत

  • 12GB+256GB: CNY 5,199 (सुमारे 61,500 रुपये)
  • 16GB+512GB: CNY 5,999 (सुमारे 71,000 रुपये)
  • 18GB+1TB: CNY 7,499 (सुमारे 88,700 रुपये)
  • 12GB+256GB ड्यूटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट : CNY 5,299 (सुमारे 62,700 रुपये)
  • 16GB+512GB ट्रांसफॉर्मस एडिशन : CNY 6,499 (सुमारे 76,900 रुपये)

The post कधीच हँग होणार नाही हा फोन? 18GB रॅमसह दणकट स्मार्टफोनची एंट्री, किंमत वनप्लसपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/red-magic-7s-and-red-magic-7s-pro-launched-check-price-and-specifications/feed/ 0