Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर

कित्येक दिवस चर्चेत असलेला Nothing Phone (1) स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. जेव्हपासून कार्ल पेई यांनी वनप्लस सोडून नथिंगची स्थापना केली आहे तेव्हापासून या मोबाईलची वाट बघितली जात होती. आता हा फोन भारतासह जगभरात लाँच झाला आहे. Nothing Phone (1) मध्ये एक युनिक डिजाईन देण्यात आली आहे. कंपनीनं पारदर्शक बॅक पॅनलवर एलईडी लाईट्स देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कंपनीच्या नथिंग ओएसचे कौतुक देखील केलं जात आहे. परंतु स्मार्टफोनचे अन्य स्पेसिफिकेशन अन्य अँड्रॉइड स्मार्टफोन सारखेच आहेत. भारतात अनेक डिवाइस आहेत जे Nothing Phone (1) ला टक्कर देऊ शकतात ज्यांची माहिती आम्ही या लेखात दिली आहे. परंतु त्याआधी Nothing Phone (1) ची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Nothing Phone (1) चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

फोनमध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. HDR10+ला सपोर्ट करणारा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लासच्या कोटिंगसह येतो. यात क्वॉलकॉम Snapdragon 778G+ प्रोसेसरची टाकडे देण्यात आली आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 12 सह नथिंग युआयची लेयरिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 एमपीचे दोन सेन्सर आहेत. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500 एमएएचची बॅटरी मिळते जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Nothing Phone (1) स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते ज्याची किंमत 32,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 35,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेला टॉप एन्ड मॉडेल 38,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. लाँच ऑफर अंतर्गत हे तीन मॉडेल 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध होतील.

हे 5 फोन देतात Nothing Phone (1) ला टक्कर

  • OnePlus Nord 2T 5G
  • POCO F4 5G
  • iQOO Neo 6 5G
  • Samsung Galaxy M53 5G
  • Motorola Edge 30

OnePlus Nord 2T

OnePlus Nord 2T 5G

नथिंग ब्रँडचे फाउंडर कार्ल पेई हे वनप्लसचे देखील सहसंस्थापक आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या ब्रँडची सर्वात मोठी टक्कर वनप्लसशी आहे. 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये वनप्लस नॉर्ड 2टी 5जी नथिंग फोनला टक्कर देत आहे. Nord 2T मध्ये तुम्हाला 6.43 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं हा MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह सादर केला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत मेमरी मिळते. फोटोग्राफीसाठी 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आहे. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा फोन 4500mAh च्या बॅटरीसह येतो. या फोनची किंमत 28,999 रुपयांपासून सुरु होते.

POCO F4 5G

Nothing Phone (1) ला शाओमीच्या सब-ब्रँड पोकोकडून 30 हजारांच्या बजेटमध्ये चांगली टक्कर मिळते. POCO F4 5G स्मार्टफोन फ्लॅगशिप ग्रेड Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. जो स्टेबल, हीटिंग समस्या नसलेला चिपसेट आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर 3.2GHz क्लॉक स्पीडसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह मिळतो. फोनच्या मागे 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी 20 MP चा सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी मिळते. या फोनचा बेस व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.

iQOO Neo 6 5G

या बजेटमध्ये iQOO Neo 6 5G देखील एक शानदार डिवाइस आहे जो Nothing Phone (1) साठी पर्याय ठरवू शकतो. हा फोन Snapdragon 870 प्रोसेसरवर चालतो आणि यात 8GB रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळते. यातील 6.62 इंचाची आमोलेड स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. या फोनमध्ये 4700 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि ही 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. 29,999 रुपयांमध्ये फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M53 5G

जर तुम्ही या प्राईस रेंजमध्ये सॅमसंगचा पर्याय शोधत असाल तर Galaxy M53 5G चा विचार करू शकता. या फोनमध्ये 6.7 इंचाचा Super AMOLED Plus डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. कंपनीनं हा MediaTek Dimensity 900 प्रोसेसरसह सादर केला आहे. सोबतीला 8GB रॅम पर्यंत आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन क्वॉड कॅमेरा सेटअपसह येतो. यात 108MP च्या मेन कॅमेऱ्यासह 8MP चा वाईड अँगल, 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. कंपनीनं यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 26499 रुपयांमध्ये या फोनचा बेस व्हेरिएंट सॅमसंगच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Motorola Edge 30

या बजेटमध्ये मोटोरोलाचा देखील हा फोन खूप चांगला आहे आणि नथिंग फोन 1 च्या ऐवजी Motorola Edge 30 चा चार्ट करता येईल. या फोनमध्ये 6.5 इंचाचा P-OLED डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP च्या मेन कॅमेऱ्यासह 50MP चा वाईड अँगल आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. तर 32MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरता येतो. पावर बॅकअपसाठी 4020mAh ची बॅटरी मिळते, जी 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं हा फोन Snapdragon 778G Plus प्रोसेसरसह सादर केला आहे आणि जो प्रोसेसर नथिंग फोनमध्ये देखील आहे. फ्लिपकार्टवरून हा फोन 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here