स्वस्तात 128 जीबी मेमरी असलेला स्मार्टफोन; 5000mAh च्या बॅटरीसह Tecno Camon 19 Neo आणि Camon 19 लाँच

Tecno कंपनी आपल्या स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. कंपनी बजेटमध्ये शानदार स्पेसिफिकेशन्स देत असल्यामुळे ग्राहक आकर्षित होतात. आता कंपनीनं भारतात Tecno Camon 19 Neo आणि Tecno Camon 19 हे स्मार्टफोन लाँच केले आहेत. कमी किंमतीत आलेल्या या फोन्समध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स आणि शानदार कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये FHD+ डिस्प्ले, MediaTek Helio G85 प्रोसेसर, 128GB स्टोरेज, Android 12 OS, 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग मिळते.

Tecno Camon 19 Neo आणि Camon 19 ची किंमत

Tecno Camon 19 Neo स्मार्टफोनचा 6GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंट 12,499 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्रीमलँड ग्रीन, आईस मिरर आणि इको ब्लॅक कलरमध्ये सादर झाला आहे. तर Tecno Camon 19 स्मार्टफोनचा 6GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिएंट तुम्ही 14,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकाल. हा डिवाइस इको ब्लॅक, सी सॉल्ट व्हाईट आणि जियोमेट्रिक ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: Nothing Phone (1) ला विसरा! तेच फीचर्स मिळवा स्वस्तात; हे 5 फोन देत आहेत टक्कर

Tecno Camon 19 Neo चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 19 Neo स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2460 x 1080 पिक्सल आहे. या स्लिम बेजल असलेल्या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट मिळतो. टेक्नोच्या या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी ARM Mali-G52 2EEMC2 GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. टेक्नोचा हा फोन Android 12 वर आधारित HiOS कस्टम स्किनवर चालतो.

कनेक्टव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth, NFC, GPS आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. कंपनीनं सुरक्षेसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. Camon 19 Neo मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 48MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP AI सेन्सर आहे. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोन झाला आणखी स्वस्त; 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनवर 4,000 रुपयांची सूट

Tecno Camon 19 चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 19 स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Mali-G68 MC4 GPU आहे. सोबतीला 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 आधारित HiOS कस्टम स्किनवर चालतो. फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, ड्युअल बँड, Wi-Fi, Bluetooth, NFC, GPS, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट मिळतो. यातील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्टँडर्ड व्हर्जनमध्ये देखील ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. परंतु यातील मुख्य कॅमेरा 64MP चा सेन्सर आहे. सोबतीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here