Redmi 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/#respond Thu, 11 Apr 2019 13:59:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4073 Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने याच महिन्यात आपल्या ‘मी फेस्टिवल’ चे आयोजन केले होते. हा फेस्टिवल 4 एप्रिल पासून सुरु होऊन 6 एप्रिल पर्यंत चालला होता ज्यात फक्त शाओमी स्मार्टफोन डिस्काउंट वर विकले गेले नव्हते तर अनेक ऑफर्स अंतर्गत मी फॅन्स गिफ्ट व फ्री प्रोडक्ट पण मिळाले. एका महिन्यात आपल्या इंडियन फॅन्सना अजून एक भेट देत शाओमी ने आज पासून ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे. जर तुम्ही पण एखादा शाओमी फोन घेऊ इच्छित असाल तर हीच योग्य वेळ आहे तो फोन कमी किंमतीत घेण्याची.

शाओमी मी सुपर सेल
Xiaomi ने आज ‘मी सुपर सेल’ ची सुरवात केली आहे. हा खास सेल 3 दिवस आयोजित करण्यात आला आहे जो आज 11 एप्रिल पासून सुरु होऊन 13 एप्रिल पर्यंत चालेल. Xiaomi Mi Super Sale मध्ये शाओमी प्रोडक्ट खूप कमी किंमतीत आणि भारी डिस्काउंट वर मिळत आहेत. या सेल मध्ये कंपनीने शाओमीच्या रेडमी सीरीजच्या नवीन व अन्य स्मार्टफोन्स सह पोको ब्रँड फोनचा पण समावेश केला आहे. या सेल मध्ये शाओमी स्मार्टफोन थेट 2,000 पर्यंतची सूट मिळत आहे.

इतका मिळेल डिस्काउंट
सर्वात आधी पोकोफोन बद्दल बोलायचे तर शाओमी ‘मी सुपर सेल’ मध्ये Poco F1 च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. डिस्काउंट नंतर पोको एफ1 चा हा वेरिएंट 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Redmi Note 5 Pro चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आणि 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट पण 2,000 रुपये स्वस्तात विकत घेता येईल. ​सूटीनंतर Mi Super Sale मध्ये रेडमी नोट 5 प्रो चे हे दोन्ही वेरिएंट क्रमश: 10,999 रुपये तसेच 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होतील.

हे देखील वाचा: Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

Mi Super Sale मध्ये शाओमी Redmi Note 6 Pro च्या 6जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट वर 2,000 रुपयांची सूट देत आहे ज्यामुळे हा वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच Redmi 6 Pro वर कंपनी कडून 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या सूटीनंतर रेडमी 6 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Mi Super Sale मध्ये 7,999 रुपयांचा Redmi 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 6,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. तसेच कंपनी Redmi Y2 स्मार्टफोन वर पण 1,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या सेल मध्ये रेडमी वाई2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A70

विशेष म्हणजे Xiaomi ने फक्त एका महिन्यात देशात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो चे 10,00,000 यूनिट विकले आहेत. इंडियन मार्केट मध्ये रेडमी नोट 7 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच रेडमी नोट 7 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 9,999 रुपये तथा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. हे दोन्ही फोन मी डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट वर फ्लॅश मध्ये मिळतात.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या स्मार्टफोन वर मिळत आहे किती सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-y2-poco-f1-offer-discount-price/feed/ 0
शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/#respond Mon, 25 Mar 2019 12:15:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3921 28 मार्च पर्यंत हे स्मार्टफोन्स फक्त कमी किंमतीत विकत घेता येतील असे नाही तर सोबत एक्सचेंज ऑफर आणि फोनच्या खरेदीवर कॅशबॅक पण मिळेल

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी आज भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रान्ड बनला आहे. या कंपनीच्या स्मार्टफोन लॉन्च सोबत यशाचे नवीन विक्रम पण बनतात. कमी किंमत आणि शानदार स्पेसिफिकेशन्सनी शाओमीला वर आणले आहे. शाओमी पण आपल्या फॅन्सची विशेष काळजी घेते आणि वेळोवेळी ऑफर्स व सेलचे आयोजन करते. होळी झाल्यांनतर पण शाओमी आपल्या इंडियन फॅन्ससाठी शानदार भेट घेऊन आली आहे. शाओमीने ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे, ज्यात कंपनीचे अनेक स्मार्टफोन डिस्काउंट आणि ऑफर्स सह सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

मी सुपर सेल
शाओमीने ‘मी सुपर सेल’ चे आयोजन केले आहे. मी सुपर सेल आज म्हणजे 25 मार्च पासून सुरु झाला आहे जो 28 मार्च पर्यंत चालेल. या चार दिवसीय सेल मध्ये शाओमी ने मी सीरीज आणि रेडमी सीरीज अंतर्गत लॉन्च झालेल्या अनेक शानदार स्मार्टफोन्सचा समावेश केला आहे जे भरभक्कम डिस्कांउट सह सेल साठी उपलब्ध होतील. 28 मार्च पर्यंत हे स्मार्टफोन्स फक्त कमी किंमतीत विकत घेता येतील असे नाही तर सोबत एक्सचेंज ऑफर आणि फोनच्या खरेदीवर कॅशबॅक पण मिळेल.

इथे मिळतील स्वस्त फोन
शाओमी द्वारा आयोजित मी सुपर सेल आज सुरु होऊन 28 मार्च पर्यंत चालेल आणि यात कंपनीच्या अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉम वर शाओमी फोन्स ऑफर्स अंतर्गत विकत घेता येतीलच. सोबत शापिंग साइट अमेझॉन इंडिया तसेच फ्लिपकार्ट वर पण शाओमी स्मार्टफोन डिस्काउंट व अन्य ऑफर्स सह सेल साठी उपलब्ध होतील. लक्षात ठेवा मी सुपर सेल फक्त आनलाईन प्लॅटफॉर्म वरच आयोजित करण्यात आला आहे जो मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असेल.

हे स्मार्टफोन मिळतील स्वस्त
मी सुपर सेल मध्ये रेडमी नोट 6 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट 2,000 रुपये स्वस्त विकत घेता येईल तसेच 4जीबी रॅम वेरिएंट 1,000 रुपये कमी किंमतीत विकत घेता येईल. या फोनचा 6जीबी रॅम 15,999 तसेच 4जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता पण मी सुपर सेल अंतर्गत फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपये तर 4जीबी रॅम वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

त्याचप्रमाणे शाओमीचा रेडमी 6ए स्मार्टफोन पण मी सुपर सेल मध्ये डिस्काउंटेड प्राइज वर विकत घेता येईल. या सेल मध्ये रेडमी 6ए चा 2जीबी रॅम व 16जीबी मेमरी वेरिएंट 5,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल तर 2जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. मी सुपर सेल मध्ये शाओमी मी ए2 चा 4जीबी रॅम 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर मी ए2 अमेझॉन से एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतल्यास 2,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक पण मिळेल.

मी सुपर सेल मध्ये शाओमी रेडमी नोट 5 प्रो चे सर्व वेरिएंटच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. ​रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण मी सुपर सेल अंतर्गत हा वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 5 प्रो चा 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

रेडमी वाई2 चा 3जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला तर 4जीबी रॅम वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली होती. पण मी सुपर सेल मध्ये फोनचा 3जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपये तथा 4जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे शाओमी रेडमी 6 चा 32जीबी स्टोरेज वेरिंएट शाओमी मी सुपर सेल मध्ये 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तर फोनचा 64जीबी वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post शाओमी ने सुरु केला ‘मी सुपर सेल’, बघा कोणत्या फोन वर मिळेल किती डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-super-sale-redmi-note-6-pro-6a-redmi-y2-mi-a2-discount-offer-price/feed/ 0
पुन्हा कमी झाली रेडमी 6 ची किंमत, बघा नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-price-cut-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-price-cut-in-india-in-marathi/#respond Fri, 11 Jan 2019 08:36:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3360 लॉन्च नंतर काही दिवसांनी रेडमी 6 च्या 3जीबी रॅम+ 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,00 रुपयांनी वाढवली होती

The post पुन्हा कमी झाली रेडमी 6 ची किंमत, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सतत आपल्या स्मार्टफोनची किंमत कमी करत असलेल्या शाओमी ने आज आपल्या पाचव्या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. यावेळी शाओमी ने रेडमी 6 ची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे. याआधी कंपनी मी ए2, रेडमी नोट 5 प्रो, रेडमी वाई2 आणि रेडमी 6 प्रो ची किंमत कमी केली आहे.

रेडमी 6 बद्दल बोलायचे तर डिवाइस कंपनी ने गेल्या वर्षी दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला होता. यात 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज आणि 3जीबी रॅम व 64 स्टोरेजचा समावेश होता, ज्यांची किंमत क्रमश: 7,999 व 9,499 रुपये होती. लॉन्च नंतर काही दिवसांनी रेडमी 6 च्या 3जीबी रॅम+ 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,00 रुपयांनी वाढवली होती, ज्यामुळे हा 8,499 रुपयांमध्ये विकला जात होता. आता 500 रुपयांच्या कपातीनंतर रेडमी 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरीएंट 7,999 रुपये आणि 3जीबी रॅम व 64 स्टोरेज वेरीएंट 7,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

रेडमी 6 चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी 6 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) बेजल लेस डिस्प्ले सह उपलब्ध आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 72.7 टक्के आहे आणि हा 295 पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो.ड्यूअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. जीपीएस आणि एफएम रेडियो पण देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण फोन मधील दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे. त्यामुळे सिम किंवा कार्ड पैकी एकच वापरात येईल. पण चांगली बाब म्हणजे यात फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

हा फोन मीयूआई 9 वर चालतो आणि फोन मध्ये तुम्हाला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो मिळेल. हा फोन मीडियाटेक च्या पावरफुल चिपसेट हेलियो पी22 वर चालतो आणि यात 2.0गीगाहर्ट्जचा 64बिट्स वाला आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.कॅमेरा च्या बाबतीत हा फोन खास आहे. बजट सेग्मेंट चा हा फोन कंपनी ने डुअल कॅमेरा सेंसर सह सादर केला आहे. रेडमी 6 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 12—मेगापिक्सल कॅमेरा सेंसर + एफ/2.2 अपर्चर वालाच 5—मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की फोनचा कॅमेरा क्रमश: 1.25 1.12 माइक्रोन​ पिक्सलला सपोर्ट करतो. फोनचा डुअल कॅमेरा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सलचा आहे.

The post पुन्हा कमी झाली रेडमी 6 ची किंमत, बघा नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-price-cut-in-india-in-marathi/feed/ 0
शाओमी इंडिया घेऊन येत आहे रेडमी 6 आणि रेडमी 6ए, 5 सप्टेंबरला होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-launching-in-india-5-september-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-launching-in-india-5-september-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 09:11:12 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1870 रेडमी सीरीज च्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर रेडमी 6 हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो तर रेडमी 6ए ए22 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे.

The post शाओमी इंडिया घेऊन येत आहे रेडमी 6 आणि रेडमी 6ए, 5 सप्टेंबरला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने काही दिवसांपूर्वी शाओमी संबधित एका बातमी मध्ये सांगितले होते की कंपनी भारतात आपली रेडमी सीरीज वाढवण्याची योजना करत आहे. बातमी अशी होती की शाओमी इंडियन मार्केट मध्ये रेडमी 6 सीरीज सादर करणार आहे आणि यात रेडमी 6 आणि रेडमी 6ए स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. त्यानुसार आज शाओमी इंडिया ने आॅफिशियल घोषणा केली आहे की कंपनी येत्या 5 सप्टेंबरला भारतात रेडमी 6 सीरीज चे फोन लॉन्च करणार आहे.

शाओमी इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवले आहे ज्यात सांगण्यात आले आहे की कंपनी येत्या 5 सप्टेंबरला एका ईवेंट चे आयोजन करत आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी 1 पेक्षा जास्त स्मार्टफोन लॉन्च करेल. शाओमी ने शेयर केलेल्या टीजर मध्ये ‘6’ नंबर दाखवण्यात आला आहे त्यामुळे बोलले जात आहे की 5​ सप्टेंबरला लॉन्च होणारे फोन रेडमी 6 सीरीज मधील असतील. चर्चा अशी केली जात आहे की कंपनी त्या दिवशी रेडमी 6 तसेच रेडमी 6ए भारतात लॉन्च करेल.

शाओमी रेडमी 6 आणि रेडमी 6ए स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च करण्यात आले आहेत आणि या स्मार्टफोन मध्ये मीडियाटेक चिपसेट आहे. विशेष म्हणजे जवळपास 4 वर्षांनी शाओमी मीडियाटेक चिपसेट वाले स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे. साल 2014 मध्ये आलेला रेडमी नोट शाओमीचा शेवटचा मीडियाटेक चिपसेट वाला फोन होता जो भारतात लॉन्च झाला होता. हा फोन एमटी6592 मीडियाटेक चिपसेट वर चालत होता. तसेच रेडमी सीरीज च्या नवीन स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर रेडमी 6 हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो तर रेडमी 6ए ए22 चिपसेट वर लॉन्च करण्यात आला आहे.

किंमत पाहता चीनी बाजारात शाओमी रेडमी 6 चा 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट 799 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे, तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 999 चीनी युआन मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत भारतीय करंसी नुसार क्रमश: 8,500 रुपये आणि 10,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच रेडमी 6ए ची किंमत 599 युआन आहे जी 6,300 रुपयांच्या आसपास आहे. शाओमी फॅन्स 5 सप्टेंबरची वाट बघत आहेत.

दोन्ही स्मार्टफोन्सच्या फुल स्पेसिफिकेशन्स साठी खाली क्लिक करा :
शाओमी रेडमी 6
शाओमी रेडमी 6ए

The post शाओमी इंडिया घेऊन येत आहे रेडमी 6 आणि रेडमी 6ए, 5 सप्टेंबरला होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-redmi-6a-launching-in-india-5-september-in-marathi/feed/ 0