Realme 3 Pro च्या लॉन्च डेटचा खुलासा, 22 एप्रिलला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन

रियलमीने गेल्या महिन्यात लॉन्च केलेला स्मार्टफोन Realme 3 भारतात हिट झाला आहे. हा फोन इंडियन यूजर्सना इतका आवडला कि फक्त 3 आठवड्यांत Realme 3 चे 5 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले. रियलमी घोषणा केली आहे कि ते या स्मार्टफोनचा अजून एक वर्जन आणणार आहे जो Realme 3 Pro नावाने लॉन्च केला जाईल. कालच कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल वरून Realme 3 Pro ची रियल ईमेज शेयर केली होती. तर आज Realme 3 Pro ची लॉन्च डेट पण समोर आली आहे. ​ट्वीट मधून कंपनी ने खुलासा केला आहे कि Realme 3 Pro येत्या 22 एप्रिलला भारतात लॉन्च होईल.

रियलमीने कंपनीच्या आगामी स्मार्टफोन Realme 3 Pro च्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. कंपनी ने ऑफिशियली घोषणा केली आहे कि येत्या 22 एप्रिलला कंपनीचा लेटेस्ट डिवाईस Realme 3 Pro टेक मंचावर येईल आणि भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. या ट्वीट मध्ये 22 एप्रिलच्या लॉन्च तारीखेसह असे पण सांगण्यात आले आहे कि Realme 3 Pro चा लॉन्च ईवेंट दिल्ली विश्वविद्यालयाच्या स्टेडियम मध्ये आयोजित केला जाईल जो दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. Realme 3 Pro च्या या लॉन्च टीजर मध्ये #SpeedAwakens चा वापर करण्यात आला आहे.

काल रियलमी इंडिया सीईओ माधव सेठ यांनी जे ट्वीट केले होते त्यात Realme 3 Pro चा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला होता. या फोन मध्ये फोर्टनाइट गेम खेळात सीईओनी ​ट्वीट केले होते कि Realme 3 Pro चा प्रोसेसर शानदार गेमिंगला सपोर्ट करतो आणि यूजर्सना चांगला एक्सपीरियंस देणार आहे. या ट्वीट मध्ये Realme 3 Pro अलीकडेच भारतात लॉन्च झालेल्या काही ‘प्रो’ स्मार्टफोन्सना टक्कर देणार असलचे सांगण्यात आले. चर्चा अशी आहे कि या ट्वीट मध्ये ​शाओमीचा रेडमी नोट 7 प्रो टारगेट करण्यात आला आहे आणि Realme 3 Pro त्यापेक्षा चांगला असल्याचे सांगण्यात आले आहे.

Realme 3 Pro स्पेसिफिकेशन्स
Realme 3 Pro बद्दल अलीकडेच समोर आलेला एका लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल. रियलमी 3 प्रो च्या सर्वात छोट्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनचा दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. तसेच रियलमी 3 प्रो च्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम असेल तसेच हा वेरिएंट पण 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

रिपोर्ट नुसार रियलमी 3 प्रो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. हा चिपसेट 10एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला असेल जो आक्टा-कोर प्रोसेसर सह चालेल. लीकनुसार रियलमी 3 प्रो डुअल रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च केला जाईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमी 3 प्रो चा एक बॅक कॅमेरा सोनी आईएमएक्स519 सेंसर सह येईल. तसेच रियलमी 3 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे कि या फोन मध्ये वीओओसी 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण दिली जाईल.

Realme 3
जाताजाता भारतात हिट झालेल्या रियलमी 3 च्या वेरिएंट्स आणि किंमतीची माहिती देतो कि भारतात हा फोन 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता रियलमी 3 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here