पुन्हा कमी झाली रेडमी 6 ची किंमत, बघा नवीन किंमत

सतत आपल्या स्मार्टफोनची किंमत कमी करत असलेल्या शाओमी ने आज आपल्या पाचव्या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. यावेळी शाओमी ने रेडमी 6 ची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे. याआधी कंपनी मी ए2, रेडमी नोट 5 प्रो, रेडमी वाई2 आणि रेडमी 6 प्रो ची किंमत कमी केली आहे.

रेडमी 6 बद्दल बोलायचे तर डिवाइस कंपनी ने गेल्या वर्षी दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला होता. यात 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज आणि 3जीबी रॅम व 64 स्टोरेजचा समावेश होता, ज्यांची किंमत क्रमश: 7,999 व 9,499 रुपये होती. लॉन्च नंतर काही दिवसांनी रेडमी 6 च्या 3जीबी रॅम+ 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,00 रुपयांनी वाढवली होती, ज्यामुळे हा 8,499 रुपयांमध्ये विकला जात होता. आता 500 रुपयांच्या कपातीनंतर रेडमी 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरीएंट 7,999 रुपये आणि 3जीबी रॅम व 64 स्टोरेज वेरीएंट 7,999 रुपयांमध्ये मिळत आहे.

रेडमी 6 चे स्पेसिफिकेशन्स
शाओमी रेडमी 6 चे स्पेसिफिकेशन पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ (720 x 1440 पिक्सल रेजल्यूशन) बेजल लेस डिस्प्ले सह उपलब्ध आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 72.7 टक्के आहे आणि हा 295 पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो.ड्यूअल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे. त्याचबरोबर वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. जीपीएस आणि एफएम रेडियो पण देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी कंपनी ने यात 3,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण फोन मधील दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे. त्यामुळे सिम किंवा कार्ड पैकी एकच वापरात येईल. पण चांगली बाब म्हणजे यात फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

हा फोन मीयूआई 9 वर चालतो आणि फोन मध्ये तुम्हाला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो मिळेल. हा फोन मीडियाटेक च्या पावरफुल चिपसेट हेलियो पी22 वर चालतो आणि यात 2.0गीगाहर्ट्जचा 64बिट्स वाला आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.कॅमेरा च्या बाबतीत हा फोन खास आहे. बजट सेग्मेंट चा हा फोन कंपनी ने डुअल कॅमेरा सेंसर सह सादर केला आहे. रेडमी 6 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 12—मेगापिक्सल कॅमेरा सेंसर + एफ/2.2 अपर्चर वालाच 5—मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की फोनचा कॅमेरा क्रमश: 1.25 1.12 माइक्रोन​ पिक्सलला सपोर्ट करतो. फोनचा डुअल कॅमेरा डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 5—मेगापिक्सलचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here