Redmi 8 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 26 Dec 2019 13:07:09 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8, ओपन सेल साठी झाले उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-redmi-8-open-sale-starts-in-india-price-specs/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-redmi-8-open-sale-starts-in-india-price-specs/#respond Thu, 26 Dec 2019 13:07:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6125 हे तिन्ही स्मार्टफोन भारतात ओपन सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

The post Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8, ओपन सेल साठी झाले उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी Xiaomi कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले फोन आणते आणि याच कारणामुळे Xiaomi स्मार्टफोन्स दरवेळी विक्रीचे नवीन रेकॉर्ड करतात. फोनची मागणी जास्त असल्यामुले Xiaomi आपले स्मार्टफोन्स साधारणतः फ्लॅश सेलच्या माध्यमातून विकते. पण आता नवीन वर्षाच्या आधी आपल्या यूजर्सना शानदार भेट देत Xiaomi ने घोषणा केली आहे कि कंपनीचे तीन हिट स्मार्टफोन Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8 आता कधी विकत घेता येतील. हे तिन्ही स्मार्टफोन भारतात ओपन सेल साठी उपलब्ध झाले आहेत.

Xiaomi ने घोषणा केली आहे कि आज पासूनच Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8 स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर ओपन सेल अंतर्गत विकत घेता येतील. Redmi Note 8 Pro आणि Redmi Note 8 शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन वर चोवीस तासात सेल साठी उपलब्ध होतील. तसेच Redmi 8 मी डॉट कॉम व्यतिरिक्त ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून पण कधीही विकत घेता येईल.

अशी असेल किंमत

प्राइस पाहता 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Redmi Note 8 Pro भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi Note 8 इंडियन मार्केट मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विकला जातो तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने खास ऑफलाईन मार्केट साठी लॉन्च केला होता. ओपन सेल अंतर्गत Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपये आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Xiaomi Redmi 8 बद्दल बोलायचे तर या फोनचा पण एक वेरिएंट फक्त ऑनलाईन मार्केट साठी लॉन्च केला गेला होता तर दुसरा वेरिएंट ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर आला होता. Redmi 8 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोेरेज वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व मी डॉट कॉम वरून 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर रेडमी 8 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध आहे.

Xiaomi Redmi 9

जाताजाता सांगू इच्छितो कि शाओमी कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Redmi 9 वर पण काम करत आहे आणि हा डिवाईस साल 2020 च्या सुरवातीला बाजारात येईल. Xiaomi Redmi 9 मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट मिळेल. तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार रेडमी 9 चा एक वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.

The post Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8, ओपन सेल साठी झाले उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-8-pro-redmi-8-open-sale-starts-in-india-price-specs/feed/ 0
डुअल कॅमेऱ्यासह आला Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 8, Realme साठी आहे का धोक्याची घंटा https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-with-5000-mah-battery-launched-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-with-5000-mah-battery-launched-in-india/#respond Wed, 09 Oct 2019 10:39:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5485 फोन 12 ऑक्टोबरला मी.कॉम सह फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

The post डुअल कॅमेऱ्यासह आला Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 8, Realme साठी आहे का धोक्याची घंटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने गेल्या महिन्यात Redmi 8a लॉन्च केला होता जो Redmi 7A चा अपग्रेडेड वर्जन होता. आज कंपनीने रेडमी 7 चा अपग्रेडेड वर्जन Redmi 8 भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. शाओमीने या लॉन्च इवेंट मध्ये माहिती दिली आहे कि Redmi Note 8 Pro भारतात 16 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल.

किंमत आणि उपलब्धता

Redmi 8 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे. याच्या 3जीबी रॅम +32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,999 रुपये आणि 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आहे. फोन 12 ऑक्टोबरला मी.कॉम सह फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 720×1520 पिक्सल रेजोल्यूशन सह 6.21-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीन मध्ये 19:9 के आस्पेक्ट रेशियो आहे, जिची पिक्सल डेंसिटी 320ppi आहे. तसेच फोनचा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. त्याचबरोबर कंपनीने या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट दिला आहे.

रेडमी 8 दोन वेरियंट 3जीबी+32जीबी आणि 4जीबी+64जीबी मध्ये सादर केला गेला आहे. हा फोन माइक्रो एसडी कार्ड सपॉर्ट सह येतो. माइक्रो एसडी कार्डने फोन मेमरी 512जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये डुअल रियर AI कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्राइमरी कॅमेरा 12-मेगापिक्सलचा आहे, ज्यात सोनी IMX363 चा सेंसर एफ/1.8 अपर्चर आणि दूसरा 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी साठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

ऑपरेटिंग सिस्टम बद्दल बोलायचे तर फोन एंड्रॉयड 9 पाई वर बेस्ड MIUI 10.0.1.3 वर चालतो. फोन मध्ये पावर देण्यासाठी यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जो 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. बॉक्स मध्ये 10 वॉट चार्जर दिला जाईल. फोन मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग देण्यात आली आहे. सिक्योरिटी साठी फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर सोबत फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे.

The post डुअल कॅमेऱ्यासह आला Xiaomi चा स्वस्त फोन Redmi 8, Realme साठी आहे का धोक्याची घंटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-with-5000-mah-battery-launched-in-india/feed/ 0
मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/#respond Fri, 04 Oct 2019 09:06:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5463 स्पष्ट झाले आहे कि कंपनी Redmi 8 9 ऑक्टोबरला लॉन्च करेल.

The post मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने Redmi 8A लॉन्च केल्यानंतर Redmi 8 ची पहिली झलक दाखवली होती. त्यांनतर Redmi 8 बद्दल माहिती समोर येत होती. अलीकडेच रेडमी 8 रेंडर व्यतिरिक्त हँडसेटचे काही स्पेसिफिकेशन पण लीक झाले होते. आता Redmi 7 च्या अपग्रेडेड वेरिएंट Redmi 8 च्या लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे.

शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे कि 9 ऑक्टोबरला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. या ट्विट मध्ये फोनच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण फोटो मध्ये 8 नंबर लिहिण्यात आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी Redmi 8 9 ऑक्टोबरला लॉन्च करेल.

कंपनीने Redmi 8 मोठ्या बॅटरी सह टीज केला आहे. तसेच Redmi 8 मध्ये पण Redmi 7 प्रमाणे डुअल कॅमेरा असेल. पण यात सेंसर खूप वेगळा असेल. ऑफिशियल लॉन्चच्या आधी हा फोन टेना आणि गूगल कंसोल वर दिसला होता.

अलीकडेच इंडियन टिप्सटर सुधांशु अंभोरे यांनी ट्विटर हँडल वरून Redmi 8 रेंडर लीक केले होते. फोटो मध्ये रेडमी फोन वाटरड्रॉप-नॉच डिजाइन सह दिसला होता. फोनच्या मागील भागात दोन सेंसर आणि सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर दिसला होता.

रेडमी 8 च्या खालच्या भागात 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक सह सिंगल स्पीकर ग्रिल, प्राइमरी माइक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. Redmi 8A प्रमाणे फ्रंट पॅनल वर रेडमी लोगो साठी थोडी बॉर्डर देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार रेडमी 8 स्मार्टफोन एंड्रॉयड 9 पाई वर आधारित MIUI 10.0.1.3 वर चालेल. तसेच या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच रेडमी 8 फोन आधी थाईलँड सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर लिस्ट केला गेला आहे.

वीडियो

The post मोठ्या बॅटरी सह 9 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल Redmi 8, Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-launching-in-india-on-october-9-with-big-battery-and-dual-camera/feed/ 0
स्नॅपड्रॅगॉन 439 SoC आणि HD+ डिस्प्ले सह गूगल कंसोल वर लिस्ट झाला Redmi 8 https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-spotted-on-google-play-console-listing-with-snapdragon-439-soc-and-hd-display/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-spotted-on-google-play-console-listing-with-snapdragon-439-soc-and-hd-display/#respond Tue, 01 Oct 2019 12:33:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5458 लिस्टिंगनुसार फोन स्नॅपड्रॅगॉन 439 मोबाईल प्लॅटफॉर्म वर आधारित असेल

The post स्नॅपड्रॅगॉन 439 SoC आणि HD+ डिस्प्ले सह गूगल कंसोल वर लिस्ट झाला Redmi 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन Redmi 8A लॉन्च केला होता. या लॉन्चच्या वेळी Redmi 8 ची पहिली झलक दिसली होती. आता Redmi 7 च्या अपग्रेडेड वेरिएंट Redmi 8 बद्दल नवीन माहिती समोर आली आहे.

Redmi 8 गूगल कंसोल लिस्टिंग मध्ये दिसला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. गूगल कंसोल लिस्टिंगनुसार फोन स्नॅपड्रॅगॉन 439 मोबाईल प्लॅटफॉर्म वर आधारित असेल. या चिपसेट वर कंपनीने शाओमीचा Redmi 8A स्मार्टफोन सादर केला होता. तसेच फोन मध्ये eight ARM Cortex-A53 cores आणि क्वॉलकाम एड्रिनो 505 GPU असेल. तसेच समोर आले आहे कि कंपनी Redmi 8 मध्ये 3GB रॅम (4GB रॅम वेरिएंट पण सादर केला जाऊ शकतो) आणि यातील डिस्प्ले HD+ (720 x 1,520 पिक्सल) रिजोल्यूशन आणि 320p स्क्रीन डेंसिटी सह येईल.

गूगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये कोणताही फोटो समोर आला नाही. पण यावरून आशा व्यक्त केली जात आहे कि Redmi 8 मध्ये डॉट नॉच डिस्प्ले असेल. तसेच फोनच्या रियर पॅनल वर पॉलिकॉर्बोनेट ग्लास, डुअल कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेंसर असेल. तसेच Redmi 8 एंड्ररॉयड 9 पाई सह कंपनीच्या MIUI 10 स्किन वर चालेल.

Redmi 8A

Xiaomi ने Redmi 8A द्वारे आपल्या स्वस्त स्मार्टफोन्सचा लुक बदलला आहे. Redmi 8A 18:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 720 x 1520 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.22 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन स्प्लॅशप्रूफ आहे तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी Redmi 8A कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Xiaomi Redmi 8A एंडरॉयड 9 पाई आधारित मीयूआई वर लॉन्च झाला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या स्मार्टफोन मध्ये एड्रेनो 505 जीपीयू आहे.

Xiaomi द्वारा Redmi 8A दोन वेरिएंट्स मध्ये मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 2 जीबी रॅम सह 32 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. Redmi 8A फोटोग्राफी साठी सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Redmi 8A मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Redmi 8A डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये सिक्योरिटी आणि अनलॉकिंग साठी फेस रेक्ग्नेशन फीचर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी Redmi 8A मध्ये यूएसबपी टाईप-सी पोर्ट सह 18वॉट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी आहे. किंमत पाहता Xiaomi ने Redmi 8A चा 2जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 रुपये आहे.

The post स्नॅपड्रॅगॉन 439 SoC आणि HD+ डिस्प्ले सह गूगल कंसोल वर लिस्ट झाला Redmi 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-8-spotted-on-google-play-console-listing-with-snapdragon-439-soc-and-hd-display/feed/ 0