भारतातील नंबर वन स्मार्टफोन कंपनी Xiaomi कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले फोन आणते आणि याच कारणामुळे Xiaomi स्मार्टफोन्स दरवेळी विक्रीचे नवीन रेकॉर्ड करतात. फोनची मागणी जास्त असल्यामुले Xiaomi आपले स्मार्टफोन्स साधारणतः फ्लॅश सेलच्या माध्यमातून विकते. पण आता नवीन वर्षाच्या आधी आपल्या यूजर्सना शानदार भेट देत Xiaomi ने घोषणा केली आहे कि कंपनीचे तीन हिट स्मार्टफोन Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8 आता कधी विकत घेता येतील. हे तिन्ही स्मार्टफोन भारतात ओपन सेल साठी उपलब्ध झाले आहेत.
Xiaomi ने घोषणा केली आहे कि आज पासूनच Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 आणि Redmi 8 स्मार्टफोन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर ओपन सेल अंतर्गत विकत घेता येतील. Redmi Note 8 Pro आणि Redmi Note 8 शाओमीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन वर चोवीस तासात सेल साठी उपलब्ध होतील. तसेच Redmi 8 मी डॉट कॉम व्यतिरिक्त ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वरून पण कधीही विकत घेता येईल.
अशी असेल किंमत
प्राइस पाहता 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला Redmi Note 8 Pro भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
? Mi Fans, we've got some #Ultim8 news!
Back on popular demand. Get the #RedmiNote8 & #RedmiNote8Pro from @amazonIN and #Redmi8 from @Flipkart any time of the day! ?
Also available on https://t.co/cwYEXdVQIo & Retail Outlets.
Sale starts at 12 noon ? today. RTs appreciated! pic.twitter.com/W15ZKNs9DI
— Redmi India for #MiFans (@RedmiIndia) December 26, 2019
Xiaomi Redmi Note 8 इंडियन मार्केट मध्ये तीन वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. फोनचा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विकला जातो तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने खास ऑफलाईन मार्केट साठी लॉन्च केला होता. ओपन सेल अंतर्गत Redmi Note 8 चा 4 जीबी रॅम वेरिएंट 9,999 रुपये आणि 6 जीबी रॅम वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Xiaomi Redmi 8 बद्दल बोलायचे तर या फोनचा पण एक वेरिएंट फक्त ऑनलाईन मार्केट साठी लॉन्च केला गेला होता तर दुसरा वेरिएंट ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर आला होता. Redmi 8 चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोेरेज वेरिएंट शॉपिंग साइट फ्लिपकार्ट व मी डॉट कॉम वरून 7,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर रेडमी 8 चा 3 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट रिटेल स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध आहे.
Xiaomi Redmi 9
जाताजाता सांगू इच्छितो कि शाओमी कंपनी आपल्या रेडमी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Redmi 9 वर पण काम करत आहे आणि हा डिवाईस साल 2020 च्या सुरवातीला बाजारात येईल. Xiaomi Redmi 9 मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट मिळेल. तसेच या स्मार्टफोन मध्ये 6.6 इंचाचा एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार रेडमी 9 चा एक वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल.















