Xiaomi ने Redmi 8A लॉन्च केल्यानंतर Redmi 8 ची पहिली झलक दाखवली होती. त्यांनतर Redmi 8 बद्दल माहिती समोर येत होती. अलीकडेच रेडमी 8 रेंडर व्यतिरिक्त हँडसेटचे काही स्पेसिफिकेशन पण लीक झाले होते. आता Redmi 7 च्या अपग्रेडेड वेरिएंट Redmi 8 च्या लॉन्च डेटचा खुलासा झाला आहे.
शाओमी इंडियाचे हेड मनु कुमार जैन यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे कि 9 ऑक्टोबरला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला जाईल. या ट्विट मध्ये फोनच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण फोटो मध्ये 8 नंबर लिहिण्यात आला आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी Redmi 8 9 ऑक्टोबरला लॉन्च करेल.
Mi fans! Just when you thought the #Diwali action has reached a peak, here's #BatteryCameraAction!
Battery champion with 4⃣/_ _ arriving on 9th Oct.
It's time to do moooooooore!
? Click more
? Watch more
? Play more
? Store moreRT if you know what's coming. ?#Xiaomi ❤️ pic.twitter.com/71LxSA4iyk
— #MiFan Manu Kumar Jain (@manukumarjain) October 3, 2019
कंपनीने Redmi 8 मोठ्या बॅटरी सह टीज केला आहे. तसेच Redmi 8 मध्ये पण Redmi 7 प्रमाणे डुअल कॅमेरा असेल. पण यात सेंसर खूप वेगळा असेल. ऑफिशियल लॉन्चच्या आधी हा फोन टेना आणि गूगल कंसोल वर दिसला होता.
अलीकडेच इंडियन टिप्सटर सुधांशु अंभोरे यांनी ट्विटर हँडल वरून Redmi 8 रेंडर लीक केले होते. फोटो मध्ये रेडमी फोन वाटरड्रॉप-नॉच डिजाइन सह दिसला होता. फोनच्या मागील भागात दोन सेंसर आणि सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर दिसला होता.
रेडमी 8 च्या खालच्या भागात 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक सह सिंगल स्पीकर ग्रिल, प्राइमरी माइक्रोफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असेल. Redmi 8A प्रमाणे फ्रंट पॅनल वर रेडमी लोगो साठी थोडी बॉर्डर देण्यात आली आहे.
स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार रेडमी 8 स्मार्टफोन एंड्रॉयड 9 पाई वर आधारित MIUI 10.0.1.3 वर चालेल. तसेच या फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 439 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच रेडमी 8 फोन आधी थाईलँड सर्टिफिकेशन साइट एनबीटीसी वर लिस्ट केला गेला आहे.
वीडियो














