Redmi 9A - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 04 Nov 2020 13:02:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-vs-redmi-9a-5000-mah-battery-low-budget-phone-comparison/ https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-vs-redmi-9a-5000-mah-battery-low-budget-phone-comparison/#respond Wed, 04 Nov 2020 13:02:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8802 आम्ही तुमच्या सुविधेसाठी दोन्ही हँडसेटची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर Micromax In 1b ची तुलना Redmi 9A सोबत केली आहे. चला जाणून घेऊया कोणता फोन जास्त चांगला आहे.

The post Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Micromax ने भारतात आपल्या बहुप्रतीक्षित In सीरीज मध्ये दोन फोन्स Note 1 आणि IN 1B सादर केले आहेत. या दोन्ही फोन्सच्या जीवावर माइक्रोमॅक्स भारतीय स्मार्टफोन बाजारात एक शानदार पुनरागमन करण्याचा अपेक्षा ठेऊन आहे. दोन्ही फोन्सची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. पण IN 1B कंपनीने बजेट कॅटेगरी मध्ये सादर केला आहे जो शाओमी-रियलमी सारख्या कंपन्यांसाठी आव्हान ठरू शकतो. Micromax In 1b ची बेस किंमत 6,999 रुपये आहे जी ग्राहकांना आकर्षित करू शकते. ज्या चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी माइक्रोमॅक्सने आपला नवीन बजेट फोन सादर केला आहे त्यातल्या Xiaomi कडे अनेक फोन्स आहेत जे In 1b ला आव्हान देतील. अलीकडेच शाओमीने Redmi 9A लॉन्च केला होता, ज्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन जवळपास Micromax In 1b प्रमाणेच आहेत. आम्ही तुमच्या सुविधेसाठी दोन्ही हँडसेटची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावर Micromax In 1b ची तुलना Redmi 9A सोबत केली आहे. चला जाणून घेऊया कोणता फोन जास्त चांगला आहे.

डिस्प्ले व डिजाइन

Micromax In 1b आणि Redmi 9A दोन्ही फोन्स वॉटरड्रॉप नॉच डिजाइन सह येतात. दोन्हीच्या फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत. तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. In 1b फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा लेंस आणि एक फ्लॅश लाइट देण्यात आली आहे. Redmi 9A च्या मागे एक सिंगल कॅमेरा आणि फ्लॅश लाइट आहे. Micromax In 1b च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि Redmi 9A मध्ये फिंगरप्रिंट सेंसर नाही. डिस्प्ले पाहता Micromax In 1b मध्ये 6.52-इंच HD+ एलसीडी डिस्प्ले सह 20:9 आसपेक्ट रेश्यो आहे आणि Xiaomi Redmi 9A 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे.

हार्डवेयर

In 1b मध्ये MediaTek Helio G35 SoC सह Mali-G52 GPU देण्यात आला आहे. सोबतच या फोन मध्ये 2GB, 4GB रॅम आणि 32GB व 64GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी Redmi 9A फोन मध्ये 2 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असेलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला हीलियो जी25 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8329 जीपीयूला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 2जीबी रॅम व 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

कॅमेरा

Micromax In 1b डुअल-कॅमेरा मागे देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलची सेकेंडरी लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच शाओमी रेडमी 9ए एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर

बॅटरी

Micromax In 1b आणि Redmi 9A मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन्स मध्ये डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड वापरता येतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह हे फोन्स 4जी वोएलटीई सह काम करतात.

हे देखील वाचा : Micromax चा चीनी कंपन्यांवर वार, लॉन्च केले 5000mAh बॅटरी आणि 48MP रियर कॅमेरा असलेले दोन फोन

किंमत

Micromax IN 1b कंपनीने 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला आहे. हि किंमत फोनच्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंटची आहे. तर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वर्जनची किंमत 7,999 रुपये आहे. Xiaomi Redmi 9A चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,799 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे.

The post Micromax In 1b Vs Redmi 9A: जाणून घ्या कोण जिंकेल लो बजेटची लढाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/micromax-in-1b-vs-redmi-9a-5000-mah-battery-low-budget-phone-comparison/feed/ 0
फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9a-launched-in-india-know-full-specification-features-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9a-launched-in-india-know-full-specification-features-price-sale-offer/#respond Wed, 02 Sep 2020 10:33:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7945 Redmi 9A कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला गेला आहे, जो ऑरा 360 डिजाईन वर बनला आहे तसेच पी2आई कोटेड आहे.

The post फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्या आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये ‘रेडमी सीरीज’ अंतर्गत नवीन स्मार्टफोन Redmi 9 लॉन्च केला होता. हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता ज्यात 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये तसेच 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. रेडमी 9 ची विक्री सुरु झाल्यानंतर आता शाओमीने या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन Redmi 9A पण लॉन्च केला आहे. शाओमी रेडमी 9ए पण लो बजेट मध्ये आला आहे जो 6,799 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 4 सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Redmi 9A कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला गेला आहे, जो ऑरा 360 डिजाईन वर बनला आहे तसेच पी2आई कोटेड आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये एक कॅमेरा लेंस आणि एक फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही. उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे. फोनच्या लोवर पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Redmi 9A 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. रेडमी 9ए एंडरॉयड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक चा 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला हीलियो जी25 चिपसेट आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8329 जीपीयू ला सपोर्ट करतो.

इंडियन मार्केट मध्ये हा फोन दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 2 जीबी रॅमला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3 जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही मॉडेल 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता शाओमी रेडमी 9ए एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi 9A एक रियल डुअल सिम फोन आहे ज्यात दोन सिम कार्ड आणि एक मेमरी कार्ड एक साथ वापरता येतात. बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करणारा हा फोन 4जी वोएलटीई सह येतो. सिक्योरिटीसाठी शाओमीने रेडमी 9ए स्मार्टफोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत व सेल

Xiaomi Redmi 9A चा 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 6,799 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. कंपनीने हा फोन Green, Black आणि Blue कलर मध्ये लॉन्च केला आहे. शाओमी रेडमी 9ए येत्या 4 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट अमॅझॉन व शाओमी स्टोर्स वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post फक्त 6,799 रुपयांमध्ये लॉन्च झाला Xiaomi चा 5,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन Redmi 9A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-9a-launched-in-india-know-full-specification-features-price-sale-offer/feed/ 0
Xiaomi घेऊन येत आहे 5000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/new-xiaomi-phone-to-launch-on-11-february-in-india-with-5000mah-battery-dual-camera-redmi-9a-realme-c3/ https://www.91mobiles.com/marathi/new-xiaomi-phone-to-launch-on-11-february-in-india-with-5000mah-battery-dual-camera-redmi-9a-realme-c3/#respond Thu, 06 Feb 2020 12:52:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6525 कथित Redmi 9A स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल.

The post Xiaomi घेऊन येत आहे 5000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आजच भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन Realme C3 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme ने आपल्या या स्मार्टफोन सह लो बजेट सेग्मेंट मध्ये Xiaomi ला आव्हान दिले आहे. रियलमीच्या या आव्हानाचा स्वीकार करत आज भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड शाओमीने पण आपल्या नवीन फोनची घोषणा केली आहे. Xiaomi ने अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला भारतात आपला नवीन फोन लॉन्च करणार आहे आणि हा डिवाईस पण लो बजेट मध्ये येऊन Realme C3 ला टक्कर देईल.

Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन आणि Redmi इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वर पोस्ट करत कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनची माहिती दिली आहे. शाओमीच्या अधिकृत वेबसाइट वर पण ब्रँडच्या आगामी मोबाइलचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. कंपनीने सांगितले आहे कि येत्या 11 फेब्रुवारीला Xiaomi इंडियन मार्केट मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल आणि हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेऱ्यासह 5,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करेल.

कंपनीने आपल्या या आगामी स्मार्टफोनचे नाव सांगितले नाही पण एवढे मात्र निश्चित कंपनीचा आगामी डिवाईस रेडमी सीरीज मध्ये लॉन्च होईल. आशा आहे की हा स्मार्टफोन Redmi 9A नावाने बाजारात येईल. फोनच्या प्रोडक्ट पेज वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन Redmi 8A सारख्या रियर डिजाईन सह येईल ज्यात बॅक पॅनल वर मधोमध एक पट्टी असेल ज्यावर कॅमेरा सेटअप असेल.

Redmi सीरीजच्या या आगामी स्मार्टफोनचा बॅक पॅनल थोड्या रग्ड पॅटर्न सह येईल. या फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जो पॅनलच्या मधोमध वर्टिकल शेप मध्ये असेल. तसेच कंपनी खुलासा केला आहे कि कथित Redmi 9A स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल. हा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल कि नाही याची ठोस माहिती मिळाली नाही.

विशेष म्हणजे 11 फेब्रुवारीला Xiaomi रेडमी सीरीजच्या नवीन स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून एक प्रोडक्ट पण सादर करेल. कंपनीने या नवीन प्रोडक्ट बद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण चर्चा अशी आहे कि हा नवीन प्रोडक्ट शाओमीची नवीन पावरबॅंक असेल. या नवीन प्रोडक्ट सोबत Redmi 9A च्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि याच्या किंमतीची लॉन्च डेटची वाट बघावी लागेल.

The post Xiaomi घेऊन येत आहे 5000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन, 11 फेब्रुवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-xiaomi-phone-to-launch-on-11-february-in-india-with-5000mah-battery-dual-camera-redmi-9a-realme-c3/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह Realme C3 झाला भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launched-in-india-with-4gb-ram-5000mah-battery-mediatek-helio-g70-specs-price-sale-offer-availability/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launched-in-india-with-4gb-ram-5000mah-battery-mediatek-helio-g70-specs-price-sale-offer-availability/#respond Thu, 06 Feb 2020 12:28:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6523 Realme C3 चा 3 जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह Realme C3 झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज भारतात आपल्या ‘सी सीरीज’ चा विस्तार केला आहे. कंपनीने इंडियन मार्केट मध्ये Realme C3 स्मार्टफोन आज लॉन्च केला आहे. रियलमी सी3 Realme ने भारतात लॉन्च केलेला साल 2020 चा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन लो बजेट सेग्मेंट मध्ये आणला आहे. आज ऑनलाईन लाईव स्ट्रीमिंगच्या माधयमातून Realme C3 ने स्मार्टफोन मार्केट मध्ये पाऊल टाकले आहे. हा स्मार्टफोन जगात सर्वात आधी भारतात लॉन्च झाला आहे जो 6,999 रुपयांच्या बेस किंमतीत येत्या 14 फेब्रुवारी पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Realme C3 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद पार्ट देण्यात आला आहे. हा फोन ‘वी’ शेप नॉचला सपोर्ट करतो. फोनचा बॅक पॅनल शाईनी रग्ड डिजाईन सह येतो जो एका खास पॅटर्न वर रिफ्लेक्शन देतो. बॅक पॅनल वर उजवीकडे डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सेंसर्सच्या खाली पिक्सल डिटेल पण लिहिण्यात आले आहेत. कॅमेरा सेटअपच्या डावीकडे फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये Realme ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सह सिम स्लॉट आहे. Realme C3 च्या लोवर वर यूएसबी पोर्ट सह स्पीकर ग्रिल आणि 3.5एमएम ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme C3 चा बॉडी-टू-स्क्रीन रेशियो 89.8 टक्के आहे तसेच कंपनीने हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड 6.5 इंचाचा मिनीड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. रियलमी सी3 एंडरॉयड 10 आधारित फोन आहे जो रियलमी यूआई वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हेलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एआरएम जी52 जीपीयू आहे.

Realme C3 कंपनीने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme C3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह 12 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Realme C3 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Realme C3 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी आणि अनलॉकिंगसाठी या फोन मध्ये फक्त फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा डिवाईस 5000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी 30 दिवसांचा स्टॅन्डबाय टाईम आणि 10.6 तास PUBG खेळू देते.

किंमत व सेल

Realme C3 चा 3 जीबी रॅम वेरिएंट 6,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट 7,999 रुपयांमध्ये आला आहे. हा फोन येत्या 14 फेब्रुवारी पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह Realme C3 झाला भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c3-launched-in-india-with-4gb-ram-5000mah-battery-mediatek-helio-g70-specs-price-sale-offer-availability/feed/ 0