Xiaomi ने आणला पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स वर टाका एक नजर

Xiaomi ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये Redmi K30S ऑफिशियली सादर केला आहे. हा स्मार्टफोन Mi 10T चा रीब्रँडेड वर्जन असेल असे समजले आहे. रेडमी के30एस मध्ये कंपनीने 144 हर्ट्ज डिस्प्ले, स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 33 वाट फास्ट-चार्जिंग सपॉर्ट सारखे फीचर्स दिले आहेत. चला जाणून या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स बाबत सर्वकाही.

दमदार कॅमेरा

कॅमेरा पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोन 64 मेगापिक्सल प्राइमरी, 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर सह येईल. फोन मध्ये सेल्फी आणि विडियो चॅटसाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

डिस्प्ले

रेडमी के30एस चे स्पेसिफिकेशन्स Mi 10T सारखेच आहेत. यात 6.67 इंचाचा फुल एचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्ज आहे. तसेच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे. यात पंच-होल कटआउट पण देण्यात आला आहे.

हार्डवेयर

हैंडसेट मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी अड्रेनो 650 जीपीयू दिला जाईल. फोन मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम व 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज होगी. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. फोन अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12 कस्टम स्किन सह लॉन्च केला गेला आहे.

कनेक्टिविटी आणि बॅटरी

या फोन मध्ये साइडला फिंगरप्रिंट सेंसर असेल. हँडसेट फेस अनलॉक फीचर सह आला आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये 5जी सपॉर्ट, 4जी एलटीई, ड्यूल-बॅंड वाय-फाई, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि चार्जिंग व डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. हँडसेटला पावर देण्यासाठी 5000mAh बॅटरी आहे जी 33 वॉट फास्ट-चार्जिंगला सपॉर्ट करेल.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

किंमत

Redmi K0S चा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट कंपनीने RMB 2,599 (जवळपास 28,700 रुपये) मध्ये सादर केला आहे. तर याच्या 8GB + 256GB वेरिएंटची किंमत RMB 2,799 (जवळपास 30,900 रुपये) आहे. इंट्रोडक्टरी ऑफर मध्ये दोन्ही रॅम व स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 2,299 (जवळपास 25,400 रुपये) आणि RMB 2,499 (जवळपास 27,600 रुपये) आहे. फोन 11 नोव्हेंबरला ब्लॅक आणि मून लाइट सिल्वर कलर मध्ये येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here