Sale - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Sep 2022 11:40:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या https://www.91mobiles.com/marathi/flipkart-sale-man-order-laptop-worth-rs-50-thousand-instant-received-ghadi-detergent-soap-online-scam/ https://www.91mobiles.com/marathi/flipkart-sale-man-order-laptop-worth-rs-50-thousand-instant-received-ghadi-detergent-soap-online-scam/#respond Wed, 28 Sep 2022 11:40:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13540 Flipkart Sale: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Sale) सुरु आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे ग्राहक देखील या वस्तूंवर तुटून पडले आहेत. परंतु तुम्हाला देखील डिस्काउंटनं आकर्षित केलं असेल तर कोणतीही खरेदी करण्याआधी ही बातमी (Online Shopping Fraud) नक्की वाचा. या Sale दरम्यान IIM-अहमदाबादचा विद्यार्थी यशस्वी […]

The post डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Flipkart Sale: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Sale) सुरु आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे ग्राहक देखील या वस्तूंवर तुटून पडले आहेत. परंतु तुम्हाला देखील डिस्काउंटनं आकर्षित केलं असेल तर कोणतीही खरेदी करण्याआधी ही बातमी (Online Shopping Fraud) नक्की वाचा. या Sale दरम्यान IIM-अहमदाबादचा विद्यार्थी यशस्वी शर्मा याने ऑफर पाहून वडिलांसाठी 50 हजारांचा लॅपटॉप ऑर्डर केला. परंतु फ्लिपकार्टनं लॅपटॉपच्या बॉक्समध्ये घडी डिटर्जंट साबणाच्या वड्या पाठवल्यामुळे ग्राहकाचे डोळे उघडले.

फ्लिपकार्टला चूक मान्य नाही

लॅपटॉप ऐवजी साबण मिळाल्यानंतर यशस्वी शर्मानं लिंक्डइन सोबतच ट्विटरवर पोस्ट करून माहिती दिली आहे की लॅपटॉपच्या जागी घडी डिटर्जंट पॅक पाठवल्यावर देखील फ्लिपकार्टच्या कस्टमर सपोर्ट आपली चूक मान्य करत नाही आणि उलटे आरोप करत आहे. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळेल 315KM ची रेंज

तसेच त्याने सांगितलं की त्याच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. परंतु, कस्टमर सपोर्टच्या मते खरेदीदाराला डिलिव्हरी एजंटच्या समोर पॅकेज उघडावं लागतं आणि आयटम टेस्ट केल्यानंतरच ओटीपी द्यावा लागतो. शर्मानं म्हटलं आहे की त्याच्या वडिलांना वाटलं की पॅकेज घेतल्यानंतर ओटीपी द्यायचा असतो, असं बऱ्याच प्रीपेड डिलिव्हरीच्या बाबतीत होतं.

रिटर्न होणार नाही प्रोडक्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लिपकार्टच्या सर्वात वरिष्ठ ग्राहक सहायता कर्मचाऱ्याने म्हटलं आहे की या प्रोडक्टचं रिटर्न शक्य नाही. त्याचबरोबर असं सांगण्यात आलं आहे की हे प्रकरण पुढे नेता येणार नाही. दुसरीकडे यशस्वीचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांची चूक म्हणजे की त्यांना वाटलं की – फ्लिपकार्ट अश्योर्डवरून येणाऱ्या पॅकेजमध्ये एक लॅपटॉप असेल डिटर्जंट नव्हे. ओटीपी मागण्याआधी डिलिव्हरी बॉयनं माझ्या वडिलांना ओपन बॉक्स कॉन्सेप्टची माहिती दिली नाही.

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

ओपन बॉक्स कॉन्सेप्टमध्ये डिलिव्हरी बॉय समोरच ग्राहक बॉक्स ओपन करू शकतात. बॉक्समध्ये तुम्ही मागवलेलं प्रोडक्ट नसेल किंवा ते सुस्थितीत नसेल तर डिलिव्हरी बॉय ते प्रोडक्ट पुन्हा रिटर्न करतो. फक्त हे सर्व तुमच्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी डिलिव्हरी बॉयला देण्याआधी करणं आवश्यक आहे. ओटीपी दिल्यानंतर बॉक्स ओपन केल्यास डिलिव्हरी पूर्ण होईल आणि प्रोडक्ट त्याक्षणी रिटर्न जाणार नाही. हे देखील वाचा: भन्नाट! दोन-दोन सेल्फी कॅमेरे आणि 12GB रॅमसह Xiaomi Civi 2 लाँच; फ्रंटला देखील मिळतोय फ्लॅश

iPhone 13 च्या ऑर्डर झाल्या रद्द

गेले काही दिवस जबरदस्त डिस्काउंटसह Flipkart वर iPhone 13 ची विक्रीची सुरु होती, हा आयफोन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांची देखील फसवणूक झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की Flipkart नं त्यांच्या Apple iPhone 13 ची ऑर्डर कॅन्सल केली आहे. युजर्सनी ट्विटरवर ऑर्डर कॅन्सलेशनचे स्क्रीनशॉट्स देखील शेयर केले होते. तसेच अशा युजर्सना फ्लिपकार्ट 10 हजार रुपयांचे व्हाउचर देत असल्याची बातमी देखील आली होती.

The post डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/flipkart-sale-man-order-laptop-worth-rs-50-thousand-instant-received-ghadi-detergent-soap-online-scam/feed/ 0
Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/#respond Thu, 19 Dec 2019 12:03:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6085 किंमत कमी असण्यासोबतच बँक कडून मिळणारा डिस्काउंट, कॅशबॅक ऑफर्स आणि बिनव्याजी ईएमआई चा ऑप्शन तुम्हाला मिळेल.

The post Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 संपायला आता काही दिवस उरले आहेत आणि त्याआधी चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आपल्या “No. 1 Mi Fan Sale” ची घोषणा केली आहे. या सेल मध्ये वेगवेगळ्या किंमतीचे प्रोडक्ट्स स्वस्तात विकले जातील. “No. 1 Mi Fan Sale” मध्ये शाओमीच्या स्मार्टफोन सोबत वियरेबल आणि स्मार्ट होम एक्सेसरीज डिस्काउंट सह सेल केले जातील.

सेलची सुरवात 19 डिसेंबर म्हणजे आज पासून होईल आणि हा 25 डिसेंबर पर्यंत चालेल. हा सेल मी डॉट कॉम, मी होम स्टोर्स, फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि अधिकृत रिटेल स्टोर्स मध्ये आयोजित केला जात आहे. शाओमी आपल्या काही एक्सेसरीज साठी फ्लॅश सेल पण आयोजित करेल.

शाओमीच्या एक्सेसरीज आणि स्मार्ट होम प्रोडक्टचा फ्लॅश सेल रोज 10 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि 6 वाजता आयोजित केला जाईल. हा सेल 23 डिसेंबर पर्यंत चालू राहील. पण मी नंबर वन फॅन सेल 25 डिसेंबर पर्यंत सुरु असेल. किंमत कमी असण्यासोबतच बँक कडून मिळणारा डिस्काउंट, कॅशबॅक ऑफर्स आणि बिनव्याजी ईएमआई चा ऑप्शन तुम्हाला मिळेल.

या सेल मध्ये Redmi K20 Pro 24,999 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल. तर जुना फोन देऊन 2000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळवता येईल. कंपनीचा प्रसिद्ध फोन Redmi Note 7 Pro 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल जे याच्या लॉन्च किंमतीपेक्षा आहेत. इतकेच नव्हे तर या सेल मध्ये ग्राहक Redmi 7A, Redmi K20, Poco F1 आणि Xiaomi Mi A3 सारखे फोन स्वस्तात विकत घेऊ शकतील.

स्मार्टफोन्स व्यतिरिक्त Xiaomi आपला मी स्मार्ट बल्ब, मी स्पोर्ट्स ब्लूटूथ इयरफोन्स बेसिक आणि मी बॅंड 3 मी नंबर वन फॅन सेल मध्ये आतापर्यंतच्या स्वस्त किंमतीत विकत आहे. पुढे एक तक्ता दिला आहे ज्यात कोणता फोन कोणत्या किंमतीत तुमच्यासाठी उपलब्ध असेल याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 Phone Discount No. 1 Mi Fan Sale Price Additional Offers
Redmi Note 7 Pro4GB+64GB

6GB+64GB

6GB+128GB

INR 4,000

INR 2,000

INR 2,000

INR 9,999

INR 12,999

INR 14,999

INR 1,000 BUPINR 1,000 BUP
Redmi K20 Pro6GB+128GB

8GB+256GB

INR 3,000

INR 3,000

INR 24,999

INR 27,999

INR 2,000 BUPINR 2,000 BUP
Redmi K206GB+64GB

6GB+128GB

INR 2,000INR 1,000 INR 19,999INR 22,999 INR 2,000 BUP

INR 2,000 BUP

Redmi 7A2GB+16GB

2GB+32GB

INR 1,000

INR 700

 

INR 4,999

INR 5,499

 

 

Mi A34GB+64GB

6GB+128GB

INR 500INR 500 INR 12,499INR 15,499 INR 1,000 BUPINR 1,000 BUP
POCO F16GB+128GB

8GB+256GB

INR 4,000

INR 4,000

INR 14,999

INR 18,999

Redmi Note 7S3GB+32GB

4GB+64GB

INR 1,000INR 2,000 INR 8,999INR 9,999
Redmi Y33GB+32GB

4GB+64GB

INR 1,000INR 2,000 INR 7,999INR 9,999
Redmi 72GB+32GB

3GB+32GB

INR 500INR 500 INR 6,999INR 7,999
 Redmi 7A

2GB+16GB

2GB+32GB

 

INR 700

INR 700

 

INR 5,299

INR 5,499

 Redmi Go

1GB+8GB

1GB+16GB

 

INR 200

INR 300

 

INR 4,299

INR 4,499

 

The post Mi No. 1 Fan Sale: Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 Pro सह Xiaomi च्या या प्रोडक्ट्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-no-1-fan-sale-start-today-discounts-on-redmi-k20-pro-redmi-note-7-pro-and-more/feed/ 0
7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल Thomson 32-इंचाचा TV, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/thomson-tv-discount-on-flipkart-big-billion-day-sale/ https://www.91mobiles.com/marathi/thomson-tv-discount-on-flipkart-big-billion-day-sale/#respond Fri, 27 Sep 2019 14:08:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5440 कंपनीच्या 4K टीव्ही रेंज मध्ये असलेली 43-इंचाची टीव्ही 26,999 रुपये व 65-इंचाची टीव्ही 55,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

The post 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल Thomson 32-इंचाचा TV, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेस्टिव सीजन पाहता ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपले ‘बिग बिलियन डेज’ (The Big Billion Days) 29 सप्टेंबर पासून सुरु करणार आहे. हा सेल 4 ऑक्टोबर पर्यंत चालेल. या सेल मध्ये भरपूर सूट आणि आकर्षक किंमतींसह Thomson TV वर पण भरपूर डिस्काउंट दिला जाईल.

आम्ही तुम्हाला पुढे Thomson टीव्ही वर मिळणाऱ्या डिस्काउंटची माहिती देत आहोत. ‘बिग बिलियन डेज’ च्या माध्यमातून ग्राहकांना फ्री डिलिवरी, बाय नाउ पे लेटर प्लान, लिमिटिड एडीशन न्यू लॉन्च आणि 90 टक्क्यांपर्यंतची डिस्काउंट ऑफर देण्याचा वादा केला आहे.

त्याचबरोबर Thomson 32-inch TV या सेल मध्ये Rs 6,999 मध्ये उपलब्ध होईल. Thomson 32TM3290 TV सेल नसताना फ्लिपकार्ट वर 8,999 रुपयांमध्ये विकली जाते. कंपनीचा दावा आहे की डिवाइस झिरो डॉट A+ ग्रेड एचडी रेडी पॅनल सह येतो. टीव्ही मध्ये 178 डिग्री वाइड व्यूइंग अँगल आणि 20W स्पीकर्स आहेत.

पाच दिवस चालणाऱ्या या सेल मध्ये कंपनी 5999 रुपयांमध्ये 24-इंचाची एचडी एलईडी टीव्ही देईल. कंपनीच्या 4K टीव्ही रेंज मध्ये असलेली 43-इंचाची टीव्ही 26,999 रुपये व 65-इंचाची टीव्ही 55,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

विशेष म्हणजे या सेल मध्ये स्मार्टफोन्स वर पण चांगला डिस्काउंट दिला जात आहे. या सेल मध्ये 5,000एमएएच बॅटरी असलेल्या स्मार्टफोन Vivo Z1 Pro वर सूट दिली जाईल. वीवो झेड1 प्रो जुलै मध्ये भारतीय बाजारात 14,990 रुपयांच्या बेस किंमतीसह लॉन्च केला गेला होता. जो या सेल मध्ये 12,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हि किंमत फोनच्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे.

The post 7000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल Thomson 32-इंचाचा TV, जाणून घ्या कधी आणि कुठे होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/thomson-tv-discount-on-flipkart-big-billion-day-sale/feed/ 0