देशातील सर्वात स्वस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळेल 315KM ची रेंज

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

Tata Tiago Electric India Launch: Tata Motors नं आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV hatchback भारतात लाँच केली आहे. ही कंपनी सोबतच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (India’s most affordable EVs) आहे, जिची प्रारंभिक किंमत Rs 8.5 lakh आहे. तसेच, Tiago EV कंपनीनं Tata’s Ziptron powertrain technology आणि hatchback body स्टाइलसह बाजारात सादर केली आहे. चला जाणून घेऊया हिची सेल डेटपासून फीचर्स पर्यंतची संपूर्ण माहिती.

Tata Tiago EV Price In India आणि Availability

Tata Tiago EV चा बेस XE व्हेरिएंट कंपनीनं 8.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या प्रारंभिक किंमतीत सादर केला आहे. यात 19.2kWh चा बॅटरी पॅक आहे. तसेच 24kWh च्या मोठ्या बॅटरी पॅकसह टॉप-एन्ड XZ+ Tech LUX व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

वर सांगितल्याप्रमाणे कार दोन बॅटरी पॅक ऑप्शनमध्ये उपलब्ध झाली आहे. तसेच, Tata Tiago भारतात 10 October पासून सेलसाठी सादर केली जाईल. तसेच, या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी January 2023 पासून सुरु होईल. हे देखील वाचा: Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स

टाटा मोटर्सनं पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी डिस्काउंटची घोषणा केली आहे, जो स्टॉक असेपर्यंत मिळेल. या ईव्हीच्या कलर ऑप्शनची माहिती समोर आली नाही. परंतु, ही कार इंटेंसी टील, सिल्व्हर, ब्लू रेड आणि अन्य कलरमध्ये विकली जाईल, अशी चर्चा आहे. तसेच टाटा मोटर्स बॅटरी आणि मोटरवर 8 वर्ष/1.6 लाख किलोमीटरची वॉरंटी देणार आहे.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

Tata Tiago EV Design

Tata Tiago EV ची डिजाइन पूर्णपणे Tata Tiago च्या पेट्रोल व्हर्जन प्रमाणेच आहे. परंतु टाटाच्या सिग्नेचर ट्राय-एरो पॅटर्न डिजाइनसह एक फ्रेश लुक यात मिळेल. Tiago EV मध्ये ब्लॅक कॉन्ट्रास्ट रूफ, ब्लॅक आउट ORVMs, दरवाज्याचे हँडल आणि रियर स्पॉइलर एलिमेंट आहेत जो हिला स्पोर्टी लुक देखील देतो.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

Tata Tiago EV specifications

टाटा टियागो ईव्ही टाटाची जिपट्रॉन टेक्नॉलॉजीसह येते आणि यात दोन बॅटरी पॅक ऑप्शन मिळतात. छोटा बॅटरी पॅक 19.4kWh चा आहे तर मोठा बॅटरी पॅक 24kWh चा आहे. तसेच 19.4kWh बॅटरी पॅक असलेल्या Tata Tiago EV मध्ये 250km ची रेंज अपेक्षित आहे. तर MIDC नुसार मोठी बॅटरीमधून 315km ची रेंज मिळेल. Tiago EV पॉवरट्रेन (बॅटरी आणि मोटर) IP67 सर्टिफाइड आहेत.

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

टाटा नुसार फक्त 5.7 सेकंदात ही कार ताशी 60 किमीचा वेग पकडू शकते. Tiago EV मध्ये 15A घरगुती सॉकेट, एक 3.3kW AC होम चार्जर, एक 7.2kWh एसी होम चार्जर आणि एक DC फास्ट चार्जर असे चार चार्जिंग ऑप्शन मिळतात. यातील 7.2kW चा फास्ट चार्जर Tiago EV फक्त 3 तास 36 मिनिटांत पूर्णपणे चार्ज करेल. तर DC चार्जर फक्त 57 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग देईल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात

Cheapest Electric Car Tata Tiago Ev Launched Price Sale Availability Specs Range

Tata Tiago EV Features

टाटा टियागो ईव्ही मल्टी-लेव्हल रीजनरेटिव ब्रेकिंग, क्रूज कंट्रोल आणि स्पोर्ट्स मोडसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये व्हाइट लेदरेट सीट्स, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रेन-सेंसिंग वाइपर, ऑटो हेडलॅम्प, पावर विंडो, कूल्ड ग्लव बॉक्स, पुश बटन स्टार्ट स्टॉप, रियर वॉश वाइप्स आणि डिफॉगर, फॉग लॅम्प, एलईडी डीआरएल, प्रोजेक्टर सारखे प्रीमियम फीचर्सचा देखील समावेश आहे. तसेच यात हेडलॅम्प, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅप्पल कारप्लेसह एक हरमन सोर्स टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि 8 स्पिकर सिस्टम मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here