डिस्काउंटची हाव पडली महागात! 50 हजारांच्या लॅपटॉप ऐवजी Flipkart ने पाठवल्या साबणाच्या वड्या

Flipkart Sale Man Order Laptop Worth Rs 50 Thousand Instant Received Ghadi Detergent Soap Online Scam

Flipkart Sale: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Sale) सुरु आहे, ज्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे ग्राहक देखील या वस्तूंवर तुटून पडले आहेत. परंतु तुम्हाला देखील डिस्काउंटनं आकर्षित केलं असेल तर कोणतीही खरेदी करण्याआधी ही बातमी (Online Shopping Fraud) नक्की वाचा. या Sale दरम्यान IIM-अहमदाबादचा विद्यार्थी यशस्वी शर्मा याने ऑफर पाहून वडिलांसाठी 50 हजारांचा लॅपटॉप ऑर्डर केला. परंतु फ्लिपकार्टनं लॅपटॉपच्या बॉक्समध्ये घडी डिटर्जंट साबणाच्या वड्या पाठवल्यामुळे ग्राहकाचे डोळे उघडले.

फ्लिपकार्टला चूक मान्य नाही

लॅपटॉप ऐवजी साबण मिळाल्यानंतर यशस्वी शर्मानं लिंक्डइन सोबतच ट्विटरवर पोस्ट करून माहिती दिली आहे की लॅपटॉपच्या जागी घडी डिटर्जंट पॅक पाठवल्यावर देखील फ्लिपकार्टच्या कस्टमर सपोर्ट आपली चूक मान्य करत नाही आणि उलटे आरोप करत आहे. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त Electric Car लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळेल 315KM ची रेंज

तसेच त्याने सांगितलं की त्याच्याकडे हे सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. परंतु, कस्टमर सपोर्टच्या मते खरेदीदाराला डिलिव्हरी एजंटच्या समोर पॅकेज उघडावं लागतं आणि आयटम टेस्ट केल्यानंतरच ओटीपी द्यावा लागतो. शर्मानं म्हटलं आहे की त्याच्या वडिलांना वाटलं की पॅकेज घेतल्यानंतर ओटीपी द्यायचा असतो, असं बऱ्याच प्रीपेड डिलिव्हरीच्या बाबतीत होतं.

रिटर्न होणार नाही प्रोडक्ट

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्लिपकार्टच्या सर्वात वरिष्ठ ग्राहक सहायता कर्मचाऱ्याने म्हटलं आहे की या प्रोडक्टचं रिटर्न शक्य नाही. त्याचबरोबर असं सांगण्यात आलं आहे की हे प्रकरण पुढे नेता येणार नाही. दुसरीकडे यशस्वीचं म्हणणं आहे की माझ्या वडिलांची चूक म्हणजे की त्यांना वाटलं की – फ्लिपकार्ट अश्योर्डवरून येणाऱ्या पॅकेजमध्ये एक लॅपटॉप असेल डिटर्जंट नव्हे. ओटीपी मागण्याआधी डिलिव्हरी बॉयनं माझ्या वडिलांना ओपन बॉक्स कॉन्सेप्टची माहिती दिली नाही.

How To Grab Best Deals On Online Sale Amazon Great Indian Festival Sale Flipkart Big Billion Days

ओपन बॉक्स कॉन्सेप्टमध्ये डिलिव्हरी बॉय समोरच ग्राहक बॉक्स ओपन करू शकतात. बॉक्समध्ये तुम्ही मागवलेलं प्रोडक्ट नसेल किंवा ते सुस्थितीत नसेल तर डिलिव्हरी बॉय ते प्रोडक्ट पुन्हा रिटर्न करतो. फक्त हे सर्व तुमच्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी डिलिव्हरी बॉयला देण्याआधी करणं आवश्यक आहे. ओटीपी दिल्यानंतर बॉक्स ओपन केल्यास डिलिव्हरी पूर्ण होईल आणि प्रोडक्ट त्याक्षणी रिटर्न जाणार नाही. हे देखील वाचा: भन्नाट! दोन-दोन सेल्फी कॅमेरे आणि 12GB रॅमसह Xiaomi Civi 2 लाँच; फ्रंटला देखील मिळतोय फ्लॅश

iPhone 13 च्या ऑर्डर झाल्या रद्द

गेले काही दिवस जबरदस्त डिस्काउंटसह Flipkart वर iPhone 13 ची विक्रीची सुरु होती, हा आयफोन ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांची देखील फसवणूक झाली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की Flipkart नं त्यांच्या Apple iPhone 13 ची ऑर्डर कॅन्सल केली आहे. युजर्सनी ट्विटरवर ऑर्डर कॅन्सलेशनचे स्क्रीनशॉट्स देखील शेयर केले होते. तसेच अशा युजर्सना फ्लिपकार्ट 10 हजार रुपयांचे व्हाउचर देत असल्याची बातमी देखील आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here