Samsung Fold - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 26 Sep 2019 14:01:59 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 1 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा घडी होणारा Galaxy Fold स्मार्टफोन, कंपनीने केले कंफर्म https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-launching-in-india-on-october-1/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-launching-in-india-on-october-1/#respond Thu, 26 Sep 2019 14:01:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5428 या फोनची किंमत 1.5 लाख ते 1.75 लाख रुपये असू शकते.

The post 1 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा घडी होणारा Galaxy Fold स्मार्टफोन, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरिया की इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने यावर्षी फेब्रुवारी मध्ये आपला घडी होणारा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड लॉन्च केला होता. आता हा फोन भारतात 1 ऑक्टोबरला लॉन्च केला जाईल, यासाठी कंपनीने अधिकृतपणे मीडिया इनवाइट पाठवायला सुरवात केली आहे.

किंमत

अलीकडेच समोर आलेल्या माहिती नुसार भारतात या फोनची किंमत 1.5 लाख ते 1.75 लाख रुपये असू शकते. Samsung Galaxy Fold ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल. Samsung Galaxy Fold घेण्यासाठी आधी यूजर्सना आधी फोनची प्री-बुकिंग करावी लागेल. फोन नुकताच साउथ कोरिया मध्ये लॉन्च करण्यात आला होता.

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगच्या या फोल्डेबल फोन मध्ये 7.3-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन घडी करून छोट्या फोन मध्ये रूपांतरित होतो, ज्यामुळे बाहेरील स्क्रीन 4.6-इंचाची होते. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा आहेत, जे फोन बॉडी मध्ये बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी आहेत. फोनच्या रियर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ/2.2 अपर्चर वाला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

तर दुसरा सेंसर 12एमपी चा आहे जो डुअल पिक्सल ऑटोफोकस, ओआईएस ला सपोर्ट करतो. कंपनीने हा वेरियेबल अपर्चर सह सादर केला आहे. हा एफ/1.5 ते एफ/2.4 पर्यंत शूट करतो. तसेच तिसरा सेंसर टलीफोटो आहे. यात 2एक्स ऑप्टिकल झूम सपोर्ट आहे. तसेच फोल्डच्या आत पण 10एमपी चा एक कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/2.2 सह येतो. त्याचबरोबर तुम्हाला सेल्फी साठी फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. मेन सेंसर 10एमपी चा आहे जो एफ2.2 अपर्चर सह येतो. तिथे आरजीबी सेंसर आहे जो डेफ्थ सेंसिंग साठी आहे आणि तो एफ/1.9 अपर्चर वाला आहे.

Samsung Galaxy Fold एंडरॉयड 9 पाई वर आधारित सॅमसंगच्या नवीन वनयूआई इंटरफेस वर चालतो. या फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा 7 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वाल्या क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो. यात एक साथ तीन ऍप सह मल्टी टास्किंग करता येईल. तसेच सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड मध्ये दोन वेगवेगळ्या बॅटरीज देण्यात आल्या आहेत. या दोन्ही बॅटऱ्यांची कपॅसिटी मिळून 4,380एमएएच होते. या दोन्ही बॅटऱ्या वेगवेगळ्या डिस्प्लेला पावर देतील.

The post 1 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल सॅमसंगचा घडी होणारा Galaxy Fold स्मार्टफोन, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-fold-launching-in-india-on-october-1/feed/ 0
ट्रिपल डिस्प्ले सह येऊ शकतो सॅमसंगचा अपकमिंग फोन, सर्वात यूनिक असेल डिजाइन https://www.91mobiles.com/marathi/samsung-patents-unique-triple-display-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-patents-unique-triple-display-smartphone/#respond Tue, 30 Jul 2019 12:42:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4936 या डिजाइनची पेटेंट गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये फाइल केली होती आणि यावर्षी मार्च मध्ये कंपनीला हा पेटेंट मिळाला आहे.

The post ट्रिपल डिस्प्ले सह येऊ शकतो सॅमसंगचा अपकमिंग फोन, सर्वात यूनिक असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फोल्डेबल आणि डुअल डिस्प्ले असलेल्या स्मार्टफोन पासून पुढे जात सॅमसंग आपला ट्रिपल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. एकापेक्षा एक डिजाइन असलेले स्मार्टफोन सादर करण्याच्या शर्यतीत सॅमसंगचे हे पाऊल सर्वात वेगळे सिद्ध होऊ शकते.

सॅमसंगने एक नवीन डिजाइन पेटेंट केली आहे, जी नवीन डिजाइन पेटेंट केली आहे त्या नुसार फोन मध्ये एक नाही तर एका वर एक तीन डिस्प्ले असतील. कंपनीने या डिजाइनची पेटेंट गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये फाइल केली होती आणि यावर्षी मार्च मध्ये कंपनीला हा पेटेंट मिळाला आहे.

फोनची डिजाइन एका रेंडर लेट्सगो डिजिटल वेबसाइट द्वारे समोर आली होती. या डिजाइन मध्ये फोनची डिजाइन आणि मॅकेनिजम समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पेटेंटनुसार फोन मध्ये खालच्या बाजूला एक मेटल रॉड वापरली जाईल जी फोनचे तिन्ही बघ जोडून ठेवील. डिजाइन बघून बोलले जात आहे कि यूजर या फोनचे तिन्ही डिस्प्ले आपल्या मर्जीने उजवीकडे किंवा डावीकडे स्क्रोल करू शकतात. फोनचा खालचा भाग अर्ध गोलाकार आहे जो चांगला लुक देतो.

हे देखील वाचा: Xiaomi घेऊन येत आहे नवीन 5G फोन, 16जीबी रॅम सह होऊ शकतो लॉन्च

विशेष म्हणजे या पेटेंट वरून कंपनी अशाप्रकारचा फोन कधी सादर करेल हे सांगता येणार नाही. आगामी काळात फोन संबंधित अजून लीक्स व माहिती समोर आल्यावर या फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळेल.

याव्यतिरिक्त Samsung Galaxy Note 10 ची चर्चा अनेक दिवसांपासून आहे आणि कंपनी अलीकडेच या डिवाइसची लॉन्च डेट पण सांगितली आहे. 7 ऑगस्टला याचा ग्लोबल लॉन्च आहे आणि हा भारतात पण तुम्ही बघू शकता. 8 ऑगस्टला रात्री 1 वाजल्यापासून भारतात याचे लाइव प्रक्षेपण होईल. कंपनीने फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती दिली नाही पण आतापर्यंत याचे अनेक लीक आले आहेत. नुकतीच ऑनलिक्सने फोनच्या जवळपास सर्वच स्पेसिफिकेशनची माहिती दिली आहे. खास बाब अशी कि Galaxy S10 सीरीज प्रमाणे यावेळी कंपनी नोट मध्ये पण दोन मॉडेल सादर करणार आहे. Samsung Galaxy Note 10 सह Note 10+ ची पण तयारी आहे आणि दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत.

हे देखील वाचा: आता ऑफलाइन मिळतील Realme X आणि Realme 3, जाणून घ्या अधिक माहिती

Samsung Galaxy Note 10 मध्ये तुम्हाला 6.3-इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनी हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर करू शकते आणि फोन मध्ये 1440×3040 पिक्सल रेजल्यूशनची स्क्रीन असू शकते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा गॅलेक्सी एस10 प्रमाणे इनफिनिटी ओ डिस्प्ले स्क्रीन सह सादर करू शकते ज्याला पंच होल डिस्प्ले पण म्हणतात. स्क्रीन मध्ये यावेळी पंच होले मिळू शकतो ज्यात सेल्फी कॅमेरा असेल.

सोर्स

The post ट्रिपल डिस्प्ले सह येऊ शकतो सॅमसंगचा अपकमिंग फोन, सर्वात यूनिक असेल डिजाइन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-patents-unique-triple-display-smartphone/feed/ 0
फोल्डेबल फोन नंतर सॅमसंग घेऊन येत आहे खास फोन, खेचल्यावर मोठी होईल स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-develop-a-smartphone-with-retractable-screen/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-develop-a-smartphone-with-retractable-screen/#respond Thu, 18 Jul 2019 11:55:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4831 नवीन डिजाइन असल्यामुळे फोन अनफोल्ड झाल्यानंतर पण सहज खिशात ठेवता येईल.

The post फोल्डेबल फोन नंतर सॅमसंग घेऊन येत आहे खास फोन, खेचल्यावर मोठी होईल स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग ने यावर्षी आपला फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्‍ड नावाने सादर केला होता. आता समोर येत असलेल्या बातम्यांनुसार कंपनी अजून एक नवीन खास स्मार्टफोन आणण्याचा विचार करत आहे.

फोल्ड होणाऱ्या फोन नंतर आता कंपनी रीट्रॅक्टबल स्क्रीन वाल्या स्मार्टफोन वर काम करत आहे. हा असा स्मार्टफोन असेल ज्याची स्क्रीन खेचून वाढवता येईल. सॅमसंग ने काही दिवसांपूर्वी बाहेर स्क्रीन असलेला फोल्डेबल स्मार्टफोन आणि ड्यूल फोल्डेबल जॉइंट्स असलेला टॅबलेटचे पेटेंट फाइल केले होते. आता सॅमसंग एक असा स्मार्टफोन पण डेवेलप करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याची स्क्रीन खेचून मोठी करता येईल.

सॅमसंगची हि नवीन डेवलपमेंट LetsGoDigital वेबसाइट वर दिसली आहे. पेटेंट मध्ये स्क्रीन खेचून दाखवण्यात आली. तसेच, डिजाइनची माहिती देण्यात आली आहे. माहिती नुसार अपकमिंग स्मार्टफोनची स्क्रीन दोन्ही बाजूंनी वाढवता येईल, ज्याच्या मदतीने हाइब्रिड स्मार्टफोन एखाद्या टॅबलेट सारखा बनेल.

हे देखील वाचा: Exclusive: ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह 15 ऑगस्टला लॉन्च होईल Vivo S1, 17,990 रुपयांपासून होईल किंमत सुरु

पेटेंट फाइल नुसार डिवाइस मध्ये एक पंच-होल कटआउट व्यतिरिक्त यूएसबी टाइप-सी पोर्ट खालच्या बाजूला असेल. तसेच डिवाइस मध्ये स्पीकर ग्रिल मिळेल. पण यात 3.5एमएम हेडफोन जॅक नसेल.

काही दिवसांपूर्वी माहिती समोर आली होती कि कंपनी क्लेमशेल सारख्या फॉर्म फॅक्टर सह आपला फोन सादर करण्याची योजना बनवत आहे. डिजाइन पाहता हा कंपनीच्या आधीच्या सॅमसंग फोल्ड स्मार्टफोन पेक्षा वेगळा असेल. याचा अर्थ असा कि डिजाइन जुन्या फ्लिप फोन्स सारखा नसेल. यात 6.7-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो वर्टिकली फोल्ड होईल.

हे देखील वाचा: 4,500एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo Y7s

आधीच्या रिपोर्ट नुसार कंपनी हा फोल्डेबल स्मार्टफोन पुढल्या वर्षी लॉन्च करू शकते. आशा आहे कि याची किंमत सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड पेक्षा कमी असेल. नवीन डिजाइन असल्यामुळे फोन अनफोल्ड झाल्यानंतर पण सहज खिशात ठेवता येईल.

The post फोल्डेबल फोन नंतर सॅमसंग घेऊन येत आहे खास फोन, खेचल्यावर मोठी होईल स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-develop-a-smartphone-with-retractable-screen/feed/ 0