आता ऑफलाइन मिळतील Realme X आणि Realme 3, जाणून घ्या अधिक माहिती

चीनी स्मार्टफोन कंपनी रियलमी भारतात वेगाने लोकप्रिय होत आहे. तसेच कंपनीने घोषणा केली आहे कि आतापासून Realme X आणि Realme 3 ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध होतील. हे दोन्ही फोन 1 ऑगस्ट पासून ऑफलाइन मिळतील.

त्याचबरोबर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Realme X चा स्पाइडर मॅन एडिशन 30 जुलै म्हणजे आज पासून ऑफलाइन विकत घेता येईल आणि या फोन सोबत ग्राहकांना स्पाइडर-मॅन गूडीज पण फ्री दिल्या जातील. इतकेच नव्हे तर कंपनीने 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट दरम्यान ‘Realme freedom sale’ ची पण घोषणा केली आहे. या सेल मध्ये कंपनी आपले अनेक स्मार्टफोन्स वर भरपूर डिस्काउंट देईल.

तसेच रियलमी 3 चा नवीन डायमंड रेड कलर वेरियंट 1 ऑगस्ट पासून रियलमी.कॉम, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर्स वर 8,999 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध होईल. हि किंमत याच्या 3GB+ 32GB स्टोरेज ऑप्शनची असेल.

तसेच याचा 4GB+ 64GB स्टोरेज ऑप्शन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचप्रमाणे 1 ते 3 ऑगस्ट मधील सेल मध्ये Realme X, Realme 3 च्या डायमंड रेड कलर आणि Realme 3 Pro वर चांगल्या ऑफर्स आणि डिस्काउंट मिळेल.

विशेष म्हणजे अलीकडेच Realme ने चीनच्या माइक्रोब्लॉगिंग साइट वीबो वर पोस्ट केली होती, ज्यात Hello स्नॅपड्रॅगॉन 855+ लिहिले होते. या पोस्ट सह प्रोससेरचा फोटो पण आहे. यावरून हिंट मिळाली आहे कि कंपनी आगामी कळत स्नॅपड्रॅगॉन 855+ प्रोसेसर असलेला फोन सादर करू शकते.

नवीन स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस बद्दल बोलायचे तर यात पावरफुल सीपीयू आणि चांगल्या जीपीयू चा वापर केला गेला आहे. तसेच रियलमी व्यतिरिक्त Black Shark, nubia Red Magic, Vivo NEX आणि Vivo iQOO कंपन्या पण आपले स्मार्टफोन या प्रोसेसर सह लॉन्च करू शकतात.

काही दिवसांपूर्वी रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली होती कि कंपनी लवकरच 5G हँडसेट मार्केट मध्ये सादर करू शकते. तसेच हि टेक्नोलॉजी भारतात सादर करण्याचा पण माधव यांनी ट्विट मध्ये उल्लेख केला होता.

रियलमी एक्स वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here