4,500एमएएच बॅटरी, 6जीबी रॅम आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo Y7s

Vivo बद्दल कालच बातमी आली होती कि कंपनी आपल्या वाय सीरीजच्या आगामी डिवाईस वर काम करत आहे जो Vivo Y7s नावाने लॉन्च केला जाईल. या स्मार्टफोनचे काही पोस्टर्स लीक झाले होते ज्यानंतर फोनची माहिती मिळाली होती. आज कंपनीने अधिकृतपणे हा स्मार्टफोन सादर केला आहे. वीवो ने Vivo Y7s अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन सध्या चीनी बाजारात आला आहे जो गामी काळात इतर बाजारात येऊ शकतो.

Vivo Y7s डिजाईन

सर्वात आधी फोनच्या डिजाईन बद्दल बोलायचे तर Vivo Y7s वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. फोटो मध्ये फोनच्या स्क्रीन वरच इन डिस्प्ले फिंगरप्रिंट पण देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोन Vivo Y7s च्या बॅक पॅनल वर कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही.

Vivo Y7s च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप सोबतच वर्टिकल शेपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली कॅमेरा एआई ची माहिती लिहिण्यात आली आहे. Vivo Y7s च्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण दिसत आहे. तसेच फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर सोबत यूएसबी पोर्ट मिळेल.

हे देखील वाचा: Realme X नंतर कंपनी घेऊन येणार आहे सर्वात ताकदवान फोन, फ्लॅगशिप प्रोसेसर असेल यात

Vivo Y7s स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo Y7s 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. वीवो चा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. कंपनीने Vivo Y7s एडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच ओएस 9.0 वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीया पी65 चिपसेट वर चालतो.

Vivo Y7s चीनी बाजारात 6जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo Y7s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स499 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, सोबत 8-मेगापिक्सलची वाइड-एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे.

हे देखील वाचा: 12जीबी रॅम असलेला ASUS फोन वेबसाइट वर लिस्ट, 23 जुलैला होईल लॉन्च

सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी वीवोचा हा फोन 16-मेगापिक्सलच्या एआई फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo Y7s डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये सिक्योरिटी साठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी Vivo Y7s डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. वीवो ने Vivo Y7s वेव ब्लू आणि सी ब्रीज कलर मध्ये 1798 युआन मध्ये लॉन्च केला आहे जे इंडियन करंसीनुसार जवळपास 18,000 रुपये होतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here