Samsung Galaxy A02s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 16 Dec 2020 15:00:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-google-play-supported-devices-leak-a02s-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-google-play-supported-devices-leak-a02s-launch-soon/#respond Wed, 16 Dec 2020 15:00:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9328 गॅलेक्सी एम02एस चे कोडनेम ‘a02q’ सांगण्यात आले आहे ज्याबाबत बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी फोन Samsung Galaxy A02s चा रिब्रँडिंड वर्जन म्हणून लॉन्च करेल.

The post Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Samsung Galaxy M02 स्मार्टफोन वर काम करत आहे जो लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्चची माहिती अजूनतरी दिली नाही पण मागे गॅलेक्सी एम02 सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर स्पॉट झाला होता. तसेच आता या सीरीजच्या अजून एका नवीन फोनची माहिती समोर येत आहे ज्याचे नाव Samsung Galaxy M02s असल्याचे बोलले जात आहे.

Samsung Galaxy M02s गुगल प्ले सपोर्टेड डिवायसेज लिस्ट मध्ये अपडेट केला गेला आहे जो एमएसपीने स्पॉट केला आहे. वेबसाइट वर हा फोन SM-M025F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे, सोबतच फोनचे नाव ‘Galaxy M02s’ चा पण खुलासा झाला आहे. इथे गॅलेक्सी एम02एस चे कोडनेम ‘a02q’ सांगण्यात आले आहे ज्याबाबत बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी फोन Samsung Galaxy A02s चा रिब्रँडिंड वर्जन म्हणून लॉन्च करेल.

Samsung Galaxy A02s

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस च्या लॉन्चची स्थिती तर स्पष्ट झाली नाही पण अलीकडेच सादर झालेला गॅलेक्सी ए02एस पाहता हा 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. कंपनीने गॅलेक्सी ए02एस मधील चिपसेट सांगितला नाही पण आशा आहे कि मार्केट मध्ये हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर

सॅमसंग गॅलेक्सी ए02एस मधील फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए02 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A02s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही तसेच पावर बॅकअपसाठी हा गॅलेक्सी ए02एस स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन येत्या काही दिवसांत Black आणि White कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m02s-google-play-supported-devices-leak-a02s-launch-soon/feed/ 0
5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy A02s ची डिजाइन झाली लीक, लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02s-design-battery-capacity-spotted-in-fcc-listing/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02s-design-battery-capacity-spotted-in-fcc-listing/#respond Fri, 30 Oct 2020 14:32:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8747 Samsung च्या बजेट कॅटेगरी मध्ये आगामी Galaxy A02s स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक बातम्या समोर येत आहेत.

The post 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy A02s ची डिजाइन झाली लीक, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung च्या बजेट कॅटेगरी मध्ये आगामी Galaxy A02s स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच फोनचा मॉडेल नंबर SM-A025G सह गीकबेंच वर दिसला होता. लिस्टिंग मध्ये फोनचा सिंगल कोर स्कोर 756, तर मल्टी-कोर टेस्ट स्कोर 3,934 होता. तसेच लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि फोन 3 जीबी रॅम आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येऊ शकतो. आता Galaxy A02s FCC वर लिस्ट केला गेला आहे, जिथे फोनच्या डिजाइन आणि बॅटरी क्षमतेचा खुलासा झाला आहे. लिस्टिंग नुसार Samsung Galaxy A02s मॉडेल नंबर SM-A025M/DS सह दिसला आहे.

लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या इमेज नुसार फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल टॉप-लेफ्टला असेल. आशा आहे कि या कॅमेरा सेटअप मध्ये कमीत कमी दोन कॅमेरे असतील. पण हे निश्चित समजले नाही. फोनच्या फ्रंट डिजाइनचा खुलासा पण अजून झाला नाही.

हे देखील वाचा : Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात

लिस्टिंग नुसार Samsung Galaxy A02s मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल. अजूनतरी फोन मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट असल्याची माहिती मिळाली नाही. अडॅप्टरचा मॉडेल नंबर- IEP-TA200 आहे, जो इशारा करतो कि हा 15W फास्ट-चार्जिंग सपोर्ट सह येईल आणि हा UL Demko सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला आहे. Galaxy A02s FCC लिस्टिंग मध्ये समोर आला आहे कि फोन डुअल सिम वेरिएंट सह येईल.

काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी ए02एस फोन कथितरित्या थायलंडच्या NBTC सर्टिफिकेशन साइट वर पण दिसला होता, जिथे याच्या त्वरित लॉन्चची माहिती मिळाली होती. एनबीटीसी लिस्टिंग मध्ये समजले आहे कि हा फोन डुअल-सिम वेरिएंट असेल. विशेष म्हणजे मॉडेल नंबर SM-A025F सह येणारा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए02 असल्याचे बोलले जात आहे, जो गेल्या महिन्यात गीकबेंच वर लिस्ट झाला होता.

हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी

Samsung Galaxy A02 स्मार्टफोन पाहता हा काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.

The post 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy A02s ची डिजाइन झाली लीक, लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a02s-design-battery-capacity-spotted-in-fcc-listing/feed/ 0