Samsung Galaxy M02s वेबसाइट वर लिस्ट, लो बजेट मध्ये लवकरच होईल लॉन्च

Samsung बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या Samsung Galaxy M02 स्मार्टफोन वर काम करत आहे जो लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. कंपनीने या फोनच्या लॉन्चची माहिती अजूनतरी दिली नाही पण मागे गॅलेक्सी एम02 सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर स्पॉट झाला होता. तसेच आता या सीरीजच्या अजून एका नवीन फोनची माहिती समोर येत आहे ज्याचे नाव Samsung Galaxy M02s असल्याचे बोलले जात आहे.

Samsung Galaxy M02s गुगल प्ले सपोर्टेड डिवायसेज लिस्ट मध्ये अपडेट केला गेला आहे जो एमएसपीने स्पॉट केला आहे. वेबसाइट वर हा फोन SM-M025F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे, सोबतच फोनचे नाव ‘Galaxy M02s’ चा पण खुलासा झाला आहे. इथे गॅलेक्सी एम02एस चे कोडनेम ‘a02q’ सांगण्यात आले आहे ज्याबाबत बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा आगामी फोन Samsung Galaxy A02s चा रिब्रँडिंड वर्जन म्हणून लॉन्च करेल.

Samsung Galaxy A02s

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस च्या लॉन्चची स्थिती तर स्पष्ट झाली नाही पण अलीकडेच सादर झालेला गॅलेक्सी ए02एस पाहता हा 720 x 1500 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ टीएफटी इनफिनिटी ‘वी’ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड ओएस आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालतो. कंपनीने गॅलेक्सी ए02एस मधील चिपसेट सांगितला नाही पण आशा आहे कि मार्केट मध्ये हा फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हे देखील वाचा : Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर

सॅमसंग गॅलेक्सी ए02एस मधील फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी ए02 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A02s डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई व अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. इंटरनेशनल मार्केट मध्ये हा फोन 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला नाही तसेच पावर बॅकअपसाठी हा गॅलेक्सी ए02एस स्मार्टफोन 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा फोन येत्या काही दिवसांत Black आणि White कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here