Samsung Galaxy A34 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 13:33:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A34 5G झाला गिकबेंचवर लिस्ट; पाहा महत्वाचे स्पेक्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-listed-on-geekbench-with-6gb-ram-and-dimensity-1080/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-listed-on-geekbench-with-6gb-ram-and-dimensity-1080/#respond Fri, 30 Dec 2022 05:23:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16519 Samsung Galaxy A34 5G गेले दोन महिने टेक विश्वात चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनच्या रेंडर ईमेज इंटरनेटवर व्हायरल झाल्या होत्या, ज्यात मोबाइलची लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. तसेच आता हा सॅमसंग फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे. या सर्टिफिकेशनमधून बाजारात येण्याआधी सॅमसंग गॅलेक्सी ए34 स्मार्टफोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा […]

The post Samsung Galaxy A34 5G झाला गिकबेंचवर लिस्ट; पाहा महत्वाचे स्पेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A34 5G गेले दोन महिने टेक विश्वात चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या स्मार्टफोनच्या रेंडर ईमेज इंटरनेटवर व्हायरल झाल्या होत्या, ज्यात मोबाइलची लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला होता. तसेच आता हा सॅमसंग फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे. या सर्टिफिकेशनमधून बाजारात येण्याआधी सॅमसंग गॅलेक्सी ए34 स्मार्टफोनचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सचा खुलासा झाला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए34 स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर SM-A346N मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे. या सर्टिफिकेशनमध्ये एकीकडे फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत तसेच हे देखील स्पष्ट झालं आहे की हा गॅलेक्सी मोबाइल लवकरच मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो. गीकबेंचवर Galaxy A34 ला सिंगल-कोर मध्ये 778 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 2332 स्कोर मिळाला आहे. हे देखील वाचा: सर्वात शानदार कॅमेरा फोनवर 17,000 रुपयांची सूट; आताच खरेदी करा स्वस्त Google Pixel 6a

Samsung Galaxy A34 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए34 5जी स्मार्टफोन गीकबेंचवर लेटेस्ट अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 13 सह लिस्ट झाला आहे. तसेच लिस्टिंगनुसार हा मोबाइल फोन मार्केटमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 1080 चिपसेटवर लाँच होऊ शकतो. गीकबेंचवर फोनचा 6जीबी रॅम व्हेरिएंट समोर आला आहे. परंतु कंपनी आपला हा मोबाइल मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच करू शकते. यात 8जीबी रॅम देखील मिळू शकतो.

फोन संबंधित अन्य लीक्स पाहता हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनचा अ‍ॅस्पेक्ट रेशियो 19.5:9 असू शकतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल ज्यात प्रायमरी सेन्सरसह एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो सेन्सरचा समावेश असू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A34 मध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जो 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते. हे देखील वाचा: भारतीयांच्या भेटीला येतोय मोटोरोला स्वस्त. सुंदर आणि टिकाऊ फोन; Moto E13 चा इंडिया लाँचसाठी सज्ज

The post Samsung Galaxy A34 5G झाला गिकबेंचवर लिस्ट; पाहा महत्वाचे स्पेक्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a34-listed-on-geekbench-with-6gb-ram-and-dimensity-1080/feed/ 0