भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो Moto E13; BIS वर लिस्ट झाला फोन

Motorola कंपनी आपल्या ‘ई’ सीरीजच्या लो बजेट स्मार्टफोनवर काम करत आहे जो Moto E13 नावानं लवकरच बाजारात येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून या स्वस्त मोबाइल फोनसंबंधित अनेक लीक्स समोर आले आहेत तर आता हा मोटोरोला मोबाइल भारतीय सर्टिफिकेशन्स साइट BIS वर देखील लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झालं आहे की मोटो ई13 आता लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो. पुढे आम्ही या मोटो फोनच्या लीक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

Moto E13 स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डवर स्पॉट झाला आहे जिथे हा XT2345-3 मॉडेल नंबरसह सर्टिफाइड करण्यात आला आहे. बीआयएस सोबतच हा मोबाइल फोन थायलंडच्या सर्टिफिकेशन्स साइट NBTC वर देखील दिसला आहे जिथे याचा XT2345-4 मॉडेल नंबर समोर आला आहे. दोन्ही सर्टिफिकेशन्समधून फोन स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही परंतु हे स्पष्ट झालं आहे की मोटो ई13 लवकरच या दोन्ही देशांमध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: महाराष्ट्रातील आणखी दोन शहरांमध्ये आलं Jio True 5G; मोफत वापरता येणार वेगवान इंटरनेट

Moto E13 चे स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलानं आतापर्यंत मोटो ई13 चे स्पेसिफिकेशन्स लपवून ठेवले आहेत, परंतु काही दिवसांपूर्वीच हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला होता. गीकबेंचवर हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 ओएससह येईल असं सांगण्यात आलं होतं तसेच प्रोसेसिंगसाठी यात Unisoc T606 प्रोसेसर असू शकतो. या प्रोसेसरचा मॅक्सिमम क्लॉक स्पीड 1.61गीगाहर्ट्ज पर्यंत असू शकतो.

Moto E13 स्मार्टफोन गीकबेंचवर 2जीबी रॅमसह लिस्ट झाला होता. रॅम आणि चिपसेट डिटेल्स पाहता अंदाज लावला जात आहे की मोबाइल अँड्रॉइड गो एडिशनवर बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच फोटोग्राफीसाठी मोटो ई13 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: 483km रेंजसह 7 सीटर Kia EV9 इलेक्ट्रिक एसयूव्ही ऑटो एक्सपोमध्ये येणार जगासमोर; असे असतील फीचर्स

Moto E13 ची किंमत

Motorola Moto E13 बद्दल अंदाज लावला जात आहे की हा मोबाइल फोन जानेवारी 2023 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. मोटो ई13 एक लो बजेट स्मार्टफोन असेल तसेच हा भारतात 10 हजारांच्या रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं मात्र या स्मार्टफोनच्या किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही परंतु हा मोटोरोलाचा स्वस्त मोबाइल फोन असेल ज्याची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु होऊ शकते किंवा यापेक्षा कमी असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here