Samsung Galaxy A40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 10 Apr 2019 14:03:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A70 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-launched-with-4500mah-battery-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-launched-with-4500mah-battery-6gb-ram/#respond Wed, 10 Apr 2019 14:03:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4067 Galaxy A70 मीड बजेट फोन आहे जो जागतिक मंचावर लॉन्च झाला तसेच लवकरच भारतीय बाजारात पण येईल.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A70 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी सॅमसंग ने आज जागतिक मंचावर रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर बनलेला ट्रिपल सेल्फी कॅमेरा सेटअप असलेला फोन Galaxy A80 सादर करून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे कि स्मार्टफोन बाजारात त्यांच्या सारखे कोणी नाही. या हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन सोबत सॅमसंग ने आपल्या Galaxy A सीरीजचा विस्तार करत Galaxy A70 पण टेक मंचावर सादर केला आहे. Galaxy A70 मीड बजेट फोन आहे जो जागतिक मंचावर लॉन्च झाला तसेच लवकरच भारतीय बाजारात पण येईल.

Galaxy A70 डिजाईन
सॅमसंग Galaxy A सीरीज मध्ये लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्स प्रमाणे Galaxy A70 पण इनफिनिटी यू नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यावर ‘यू’ शेप ची छोटीशी नॉच आहे. या नॉच मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Galaxy A70 पण सॅमसंग ने Galaxy A80 प्रमाणे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह आणला आहे.

Galaxy A70 च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. रियर कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. Galaxy A70 च्या खालच्या पॅनल वर स्पीकर सोबत यूएसबी पोर्ट पण आहे. चांगली बाब अशी कि सॅमसंग ने आपल्या या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण दिला आहे जो फोनच्या खालच्या पॅनल वर आहे.

Galaxy A70 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग ने Galaxy A70 को इनफिनिटी यू नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. हा फोन पण Galaxy A80 प्रमाणे 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोन स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. कंपनीने Galaxy A70 को एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 670 चिपसेट वर चालतो.

कंपनीने Galaxy A70 6जीबी रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 32-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. Galaxy A70 चा दूसरा रियर कॅमेरा सेंसर 8-मेगापिक्सलचा आहे तसेच फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

सेल्फी साठी सॅमसंग Galaxy A70 एफ/2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Galaxy A70 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलॉजी सह पण येतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Galaxy A70 मध्ये 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 4,500एमएएच बॅटरी आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंग Galaxy A70 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a70-launched-with-4500mah-battery-6gb-ram/feed/ 0
सॅमसंगने घडवला इतिहास : लॉन्च केला जगातील पहिला ट्रिपल सेल्फी कॅमेरा असलेला फोन Galaxy A80, यात आहे 8जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-official-with-rotating-slider-camera-8gb-ram-snapdragon-730g-specifications-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-official-with-rotating-slider-camera-8gb-ram-snapdragon-730g-specifications-price/#respond Wed, 10 Apr 2019 13:44:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4064 Galaxy A80 च्या रोटेटिंग कॅमेऱ्यासह सॅमसंग ने नवीन ट्रेंडची सुरवात केली आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण सॅमसंगचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच आहे.

The post सॅमसंगने घडवला इतिहास : लॉन्च केला जगातील पहिला ट्रिपल सेल्फी कॅमेरा असलेला फोन Galaxy A80, यात आहे 8जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साल 2019 सॅमसंग फॅन्ससाठी विशेष आहे. कंपनी ने पहिल्याच तिमाहीत दाखवले आहे कि सॅमसंग स्मार्टफोन बाजारात नंबर वन पॉजिशन वर राहण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहे. सॅमसंग ने Galaxy M सीरीज द्वारे लो बजेट मध्ये पण शानदार डिजाईन आणि स्पेसिफिकेशन्स दिले तर Galaxy S10 सीरीज आणून हाईएंड फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये इतर कंपन्यांना टक्कर दिली आहे. सॅमसंग ने Galaxy A सीरीज ने इंडिया सहित इतर मार्केट्स मध्ये आपली पकड मजबूत केली आहे. हि पकड अजून मजबूत करत सॅमसंग ने आज एक नवीन डाव खेळला आहे. सॅमसंग ने एक साथ जगातील तीन देशांत एक मोठ्या ईवेंटचे आयोजन करून आपली Galaxy A सीरीजचा सर्वात वेगळा आणि पावरफुल स्मार्टफोन Galaxy A80 सादर केला आहे. हा फोन फक्त स्पेसिफिकेशन्स नव्हे तर लुक आणि डिजाईनच्या बाबतीती पण इतर टेक कंपन्यांना मागे टाकतो.

Galaxy A80 डिजाईन
गॅलेक्सी सीरीजचा हा नवीन स्मार्टफोन फक्त सॅमसंगच नाही तर जगातील सर्व स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सर्वात वेगळा आणि अनोखा आहे. फक्त डिजाईनच्या बदलामुळे हा फोन बेस्ट सेल्फी फोन पण बनला आहे. आतापर्यंत पॉप-अप कॅमेरा, स्लाईडर पॅनल आणि शार्क फिन पॉप-अप सारखे सेल्फी कॅमेरा सेटअप बाजारात आले आहेत. पण Galaxy A80 च्या रोटेटिंग कॅमेऱ्यासह सॅमसंग ने नवीन ट्रेंडची सुरवात केली आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण सॅमसंगचा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा एकच आहे.

सॅमसंग ने आपला हा नवीन फोन रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर बनवला आहे. फोनच्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप वर तीन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फीची कमांड देताच हाच स्लाईडर पॅनल वर येतो आणि फोन बॉडीच्या बाहेर येतो. पॅनल वर आल्यानंतर संपूर्ण रियर कॅमेरा सेटअप फ्लिप म्हणजे रोटेट होतो तसेच सर्व कॅमेरा सेंसर आणि फ्लॅश लाईट समोरच्या बाजूला येतात आणि अशाप्रकारे फोनचा रियर कॅमेरा सेल्फी कॅमेरा बनतो.

Galaxy A80 सॅमसंग ने 3डी ग्लास वर बनवला आहे जो मेटल फ्रेम सह येतो. हा फोन फुलव्यू न्यू इनफिनिटी बेजल लेस डिस्प्ले वर सादर केला आहे, ज्याच्या फ्रंट पॅनल वर कोणतीही नॉच देण्यात आलेली नाही. डिस्प्लेच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Galaxy A80 च्या स्क्रीन खाली इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर वरच्या स्लाईडर पॅनल वर कॅमेरा सेटअप आहे तसेच पॅनल वर मध्ये सॅमसंगची ब्रॅण्डिंग आहे. Galaxy A80 च्या उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे तसेच डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आहे. फोन खालच्या पॅनल वर यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे तसेच याच्या बाजूला स्पीकर आणि सिम ट्रे देण्यात आला आहे.

Galaxy A80 स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे जो कालच कंपनीने आफिशियल केला आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता पुन्हा सांगतो, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

The post सॅमसंगने घडवला इतिहास : लॉन्च केला जगातील पहिला ट्रिपल सेल्फी कॅमेरा असलेला फोन Galaxy A80, यात आहे 8जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a80-official-with-rotating-slider-camera-8gb-ram-snapdragon-730g-specifications-price/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/#respond Tue, 19 Mar 2019 12:16:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3896 एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी ए20 भारतात पण लॉन्च होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी सॅमसंगने कालच घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 10 एप्रिलला ‘गॅलेक्सी ईवेंट’ चे आयोजन करणार आहे. सॅमसंग ने अजूनतरी सांगितले नाही कि या ईवेंट मध्ये कोणते प्रोडक्ट लॉन्च केले जातील पण बोलले जात आहे कि 10 एप्रिलला सॅमसंग अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या गॅलेक्सी ए सीरीजचा विस्तार करत गॅलेक्सी ए90 आणि सोबत गॅलेक्सी ए70 तसेच गॅलेक्सी ए40 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. पण 10 एप्रिलला आयोजित या ईवेंटच्या आधीच सॅमसंग ने आज गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 अधिकृतपणे सादर केला आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए20 रशियन बाजारात ऑफिशियल केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 किंमत
सॅमसंगने गॅलेक्सी ए20 सध्या फक्त रशियन मार्केट मध्ये आणला आहे जो येत्या काळात भारतासहित इतर बाजारांत येईल. रशिया मध्ये सॅमसंग ने गॅलेक्सी ए20 ची किंमत तिथल्या करंसीनुसार 13,900 ठेवण्यात आली आहे. हि किंमत इंडियन करंसीनुसार जवळपास 14,900 रुपये असेल. रशिया मध्ये हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. अशा आहे कि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गॅलेक्सी ए20 भारतात पण लॉन्च होईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चा लुक
गॅलेक्सी ए20 सॅमसंग द्वारा पॉलीकार्बोनेट बॉडी सह ​इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. समोरून हा फोन तुम्हाला गॅलेक्सी ए10 किंवा गॅलेक्सी ए30 सारखा वाटेल. डिस्प्लेच्या वर छोटी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्ले तिन्ही बाजुंनी बेजल लेस आहे आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. नॉचच्या वर स्पीकर आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे. यूएसबी आणि ऑडियो जॅक ​फोनच्या खालच्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए20 चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंगने गॅलेक्सी ए20 720 x 1560 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.2-इंचाच्या एचडीप्लस सुपर एमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले वर सादर केला आहे. गॅलेक्सी ए20 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9.0 पाई आधारित सॅमसंग वन यूआई वर लॉन्च केला गेला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 7884 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: शाओमीने भारतात लॉन्च केली पेमेंट सर्विस ‘मी पे’, पेटीएम आणि मोबिक्विकला मिळेल टक्कर

रशियन बाजारात गॅलेक्सी ए20 3जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे. हा फोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंटी पाहता हा फोन डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.9 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: शाओमी रेडमी गो झाला भारतात लॉन्च, किंमत फक्त 4,499 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी ए20 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी गॅलेक्सी ए20 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बोलले जात आहे कि भारतात पण गॅलेक्सी ए20 याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च होईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि 3जीबी रॅम सह लॉन्च झाला सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन गॅलेक्सी ए20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a20-official-launched-4000mah-battery-specifications-feature-price/feed/ 0
लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/#respond Tue, 12 Mar 2019 14:49:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3843 कंपनीच्या यूनाइटेड किंगडम वेबसाइट ने सॅमसंग गॅलेक्सी ए90, सॅमसंग गॅलेक्सी ए40 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए20ई ची माहिती दिली आहे.

The post लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए10 स्मार्टफोन सादर केले होते. हे दोन्ही फोन ए सीरीज मध्ये सादर केले गेले होते. आता कंपनी आपल्या या सीरीज मध्ये लवकरच अजून तीन नवीन स्मार्टफोन सादर करण्यास तयार आहे. कंपनीच्या यूनाइटेड किंगडम वेबसाइट ने सॅमसंग गॅलेक्सी ए90, सॅमसंग गॅलेक्सी ए40 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए20ई ची माहिती दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, गॅलेक्सी ए सीरीजचा पहिला फोन असेल जो “ई” मोनीकर सह येईल. काही दिवसांपूर्वी यूरोप मध्ये गॅलेक्सी ए40 चा सपोर्ट पेज लाइव झाला होता आणि याला एफसीसी कडून सर्टिफिकेशन पण मिळाले होते. कंसेप्ट रेंडर्स मधून गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा असल्याची माहिती पण समोर आली होती.

सॅमसंगच्या यूके की वेबसाइट वर गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई चे वेगवेगळे प्रोडेक्ट पेज लाइव झाले आहेत. प्रोडक्ट पेज वर स्पेसिफिकेशनची माहिती दिली नाही. पण या वेबपेज वरून गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट लवकरच लॉन्च केले जाणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

89 टक्के ग्राहकांना स्मार्टफोन मध्ये हवा दमदार कॅमेरा, बघा रिपोर्ट

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए40 इनफिनिटी यू डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित असेल तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 7885 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 4जीबी रॅम वर लॉन्च होईल.

शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचा दावा केला गेला होता. पण यांनतर अजून एक रिपोर्ट आला ज्यात या फोन मध्ये फक्त एक कॅमेरा सेटअप असेल जो स्लाइड अप आणि स्लाइड डाउन होईल असे सांगण्यात आले आहे. जुन्या रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये एंंडरॉयड पाई आधारित वन यूआई, 6.41-इंचाचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर असेल.

गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोनची भारतीय किंमती
सॅमसंग द्वारा भारतात लॉन्च केल्या गेलेल्या गॅलेक्सी ए सीरीजचे स्मार्टफोन्स पाहता कंपनीने गॅलेक्सी ए10 के 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच गॅलेक्सी ए30 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. सॅमसंगचा गॅलेक्सी ए50 के 4जीबी व 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तसेच 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90-galaxy-a40-and-galaxy-a20e-listed-on-official-uk-website/feed/ 0