लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स

सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी ए50, गॅलेक्सी ए30 आणि गॅलेक्सी ए10 स्मार्टफोन सादर केले होते. हे दोन्ही फोन ए सीरीज मध्ये सादर केले गेले होते. आता कंपनी आपल्या या सीरीज मध्ये लवकरच अजून तीन नवीन स्मार्टफोन सादर करण्यास तयार आहे. कंपनीच्या यूनाइटेड किंगडम वेबसाइट ने सॅमसंग गॅलेक्सी ए90, सॅमसंग गॅलेक्सी ए40 आणि सॅमसंग गॅलेक्सी ए20ई ची माहिती दिली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए20ई, गॅलेक्सी ए सीरीजचा पहिला फोन असेल जो “ई” मोनीकर सह येईल. काही दिवसांपूर्वी यूरोप मध्ये गॅलेक्सी ए40 चा सपोर्ट पेज लाइव झाला होता आणि याला एफसीसी कडून सर्टिफिकेशन पण मिळाले होते. कंसेप्ट रेंडर्स मधून गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा असल्याची माहिती पण समोर आली होती.

सॅमसंगच्या यूके की वेबसाइट वर गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई चे वेगवेगळे प्रोडेक्ट पेज लाइव झाले आहेत. प्रोडक्ट पेज वर स्पेसिफिकेशनची माहिती दिली नाही. पण या वेबपेज वरून गॅलेक्सी ए सीरीजचे नवीन हॅन्डसेट लवकरच लॉन्च केले जाणार आहेत हे स्पष्ट झाले आहे.

89 टक्के ग्राहकांना स्मार्टफोन मध्ये हवा दमदार कॅमेरा, बघा रिपोर्ट

आतापर्यंत समोर आलेल्या लीक्सनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए40 इनफिनिटी यू डिसप्ले वर लॉन्च केला जाईल. हा फोन एंडरॉयड ओएस एंडरॉयड 9 पाई वर आधारित असेल तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगचा एक्सनॉस 7885 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 4जीबी रॅम वर लॉन्च होईल.

शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचा दावा केला गेला होता. पण यांनतर अजून एक रिपोर्ट आला ज्यात या फोन मध्ये फक्त एक कॅमेरा सेटअप असेल जो स्लाइड अप आणि स्लाइड डाउन होईल असे सांगण्यात आले आहे. जुन्या रिपोर्टनुसार सॅमसंग गॅलेक्सी ए90 मध्ये एंंडरॉयड पाई आधारित वन यूआई, 6.41-इंचाचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर असेल.

गॅलेक्सी ए सीरीजच्या स्मार्टफोनची भारतीय किंमती
सॅमसंग द्वारा भारतात लॉन्च केल्या गेलेल्या गॅलेक्सी ए सीरीजचे स्मार्टफोन्स पाहता कंपनीने गॅलेक्सी ए10 के 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच गॅलेक्सी ए30 चा 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 16,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. सॅमसंगचा गॅलेक्सी ए50 के 4जीबी व 64जीबी मेमरी वेरिएंट 19,990 रुपये तसेच 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी वेरिएंट 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here