स्मार्टफोन विकत घेताना एक ग्राहक नेहमीच आपला बजेट ध्यानात ठेवतो. आजकाल कंपन्या पण स्वस्त आणि महाग सर्व प्रकारचे मोबाईल बनवत आहेत, ज्यामुळे मोबाईल फोन यूजर कोणत्याही अडचणी विना स्मार्टफोन विकत घेऊ शकतात. आता एक रिपोर्ट मधून समोर आले आहे कि 89 टक्के स्मार्टफोन्स ग्राहकांची पहिली प्राथमिकता चांगला कॅमेरा असते. त्यानंतर 87 टक्के ग्राहक बॅटरी लाइफ, 79 टक्के ग्राहक रॅम आणि 72 टक्के लोक इंटरनल मेमोरीला महत्व देतात. साइबर मीडिया रिसर्च (सीएमआर) च्या एका रिपोर्ट मधून हि माहिती समोर आली आहे.
सीएमआर च्या मोबाईल इंडस्ट्री कंज्यूमर इनसाइट (एमआईसीआई) सर्वे मध्ये सांगण्यात आले आहे “नवीन स्मार्टफोन विकत घेताना ग्राहक ब्रँन्डस सोबत प्रयोग करू शकतात”. रिपोर्ट मधून समोर आले आहे कि सध्या कोणताही मोबाईल यूजर एकाच ब्रँड सोबत राहू इच्छित नाही. सर्वे मध्ये समोर आले आहे कि ओवरऑल प्रॉडक्ट क्वालिटी (92 टक्के), प्रॉडक्ट परफॉर्मेंस (90 टक्के), प्रॉडक्ट ऐस्थेटिक्स (82 टक्के) आणि विश्वासू आफ्टर-सेल सर्विस आणि फास्ट टर्नअराउंड टाइम (76 टक्के) यांचा समावेश आहे.
सोनी घेऊन येत आहे 21:9 डिस्प्ले असलेला नवीन फोन एक्सपीरिया 4, स्पेसिफिकेशन्स आले समोर
सीएमआर चे हेड-यूजर रिसर्च प्रॅक्टिस सत्या मोहंते म्हणले, ‘सीएमआर एसआईसीआई सर्वेच्या रिजल्ट्स वरून समजले आहे कि कस्टमर्स स्मार्टफोन्स मध्ये इन्वेस्ट कारण्याच्याबाबतीत किती जागरूक आहेत.’ उदाहरणार्थ सॅमसंगची आफ्टर सेल सर्विस इतरांच्या तुलनेत यूजर्सना जास्त चांगली वाटते. तसेच 89 टक्के ग्राहकांना ओपो, शाओमी आणि मग रियलमी वर याबाबतीत विश्वास आहे.
यावर्षीच्या सुरवातीला आईडीसी चा एक रिपोर्ट आला होता, ज्यानुसार साल 2018 मध्ये इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये 142.3 मिलियन मोबाईल यूनिटची शिपमेंट झाली होती. हि शिपमेंट साल 2017 पेक्षा 14.5 टक्के अधिक होती. वर्ष 2018 मध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन्सचा सेल तिसऱ्या तिमाहीत झाला होता. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये भारतीयांनी सर्वात जास्त स्मार्टफोन विकत घेतले होते.
लवकरच येत आहे नोकिया 6.2 स्मार्टफोन, किंमत असेल नोकिया 6.1 च्या आसपास
या कंपन्या होत्या टॉपला
गेल्यावर्षी भारतातील स्मार्टफोन बाजारात सर्वात जास्त शाओमीचे स्मार्टफोन्स विकले गेले होते. साल 2018 मध्ये पुढे जात इंडियन स्मार्टफोनचा 28.9 टक्के हिस्सा शाओमी ब्रँडच्या नावे राहीला. यादीत सॅमसंग दुसऱ्या नंबर वर आहे, जिला 22.4 टक्के मार्केट शेयर मिळाला. तसेच 10 टक्के मार्केट शेयर सह वीवो तिसऱ्या आणि 7.2 टक्के मार्केट शेयर सह ओपो चौथ्या नंबर वर आहे. साल 2018 मध्ये शाओमीचे 41.1 मिलियन पेक्षा जास्त स्मार्टफोन विकले गेले होते.