Samsung Galaxy A42 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 21 Sep 2020 12:14:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy A42 5G https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a42-5g-officially-launched-price-specifications-sale/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a42-5g-officially-launched-price-specifications-sale/#respond Mon, 07 Sep 2020 07:18:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8010 Samsung Galaxy A42 5G डुअल मोड 5जी (SA/NSA) सोबत डुअल 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy A42 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने गेल्याच आठवड्यात आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन जोडत Samsung Galaxy A42 5G ची घोषणा केली होती. कंपनीने हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये सादर केला होता, ज्याचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स सॅमसंग द्वारे ऑफिशियल करण्यात आले होते. पण गॅलेक्सी ए42 5जी फोनच्या किंमतीचा उल्लेख कंपनीने केला नव्हता. आज जवळपास एक आठवडा गेल्यानंतर कंपनीने Samsung Galaxy A42 5G ची किंमत पण सांगितली आहे.

Samsung Galaxy A42 5G ची किंमत सॅमसंग जर्मनी द्वारे ऑफिशियल करण्यात आली आहे. प्रेस रिलीजच्या माध्यमातून सॅमसंगने गॅलेक्सी ए42 स्मार्टफोनच्या किंमतीसह याच्या कलर वेरिएंट्सची पण पण घोषणा केली आहे. सॅमसंगने सांगितले आहे कि गॅलेक्सी ए42 5जी यूरोपियन मार्केट मध्ये नोव्हेंबर मध्ये विक्री साठी उपलब्ध होईल आणि याची किंमत 369 यूरो म्हणजे 32,000 रुपयांच्या आसपास असेल. जर्मनी मध्ये हा फोन सध्या एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे आणि हा Black, White आणि Gray कलर मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A42 5G

सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर सादर केला गेला आहे जो 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीनला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए42 5जी ची स्क्रीन सॅमसंगने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणली आहे.

Samsung चा हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो कंपनीच्या वनयूआई 2.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट देण्यात आला आहे. जर्मनी मध्ये गॅलेक्सी ए42 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A42 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A42 5G डुअल मोड 5जी (SA/NSA) सोबत डुअल 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण आहेत. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Samsung आपला हा फोन भारतात लॉन्च करेल कि नाही याबाबत सध्या काही बोलता येणार नाही.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy A42 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a42-5g-officially-launched-price-specifications-sale/feed/ 0
6.6-इंचाचा डिस्प्ले आणि 5 कॅमेऱ्यासह आला Samsung Galaxy A42 5G, चायनीज फोन्सना मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a42-5g-announced-with-6-6-inch-super-amoled-display-and-quad-camera/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a42-5g-announced-with-6-6-inch-super-amoled-display-and-quad-camera/#respond Wed, 02 Sep 2020 13:51:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7960 Galaxy A42 5G चे नाव, डिजाइन आणि डिस्प्ले व्यतिरिक्त कंपनीने फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही.

The post 6.6-इंचाचा डिस्प्ले आणि 5 कॅमेऱ्यासह आला Samsung Galaxy A42 5G, चायनीज फोन्सना मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आज आपल्या वर्चुअल इवेंट ‘Life Unstoppable’ मध्ये अनेक प्रोडक्ट सादर करत नवीन स्मार्टफोन Galaxy A42 5G ची घोषणा केली आहे. कंपनीने अधिकृतपणे पहिल्यांदा या 5G फोनची घोषणा केली आहे. इवेंट मध्ये फोनचा लुक व डिजाइन दाखवण्यात आली आहे. कंपनी गॅलेक्सी ‘ए’ सीरीज मधील येणारा हा डिवाइस वर्षाच्या शेवटी लॉन्च करेल. Galaxy A42 5G चे नाव, डिजाइन आणि डिस्प्ले व्यतिरिक्त कंपनीने फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही.

डिजाइन

इवेंट मध्ये कंपनीने सांगितले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी 6.6-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले आणि क्वाड कॅमेरा सेटअप सह येईल. इवेंट मध्ये फोनची रियर आणि फ्रंट डिजाइन दाखवण्यात आली आहे. मागील क्वाड कॅमेरा सेटअप चौकोनी आकारात डावीकडे वरच्या बाजूला असेल. फोन मध्ये फ्रंटला मध्यभागी नॉच असेल. नॉच असल्यामुळे फोनच्या टॉपला बारीक बेजल असेल. तसेच दोन्ही बाजूंना पण बेजल्स खूप कमी असतील. पण बॉटमला चिन पार्ट मिळेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी 91mobiles ने गॅलेक्सी ए42 5G चायनाच्या 3सी वेबसाइट वर स्पॉट केला होता. लिस्टिंग वरून समजले आहे कि सॅमसंग ए-सीरीज मधील स्मार्टफोन मध्ये 4860mAh ची बॅटरी असेल. म्हणजे फोन मध्ये टिपिकल बॅटरी कपॅसिटी 5000mAh देण्यात येईल. सॅमसंग आपल्या एम-सीरीज मध्ये 6000mAh बॅटरी देत आहे.

3C लिस्टिंग वरून येणाऱ्या मिड-रेंज 5जी हँडसेट बाबत जास्त माहिती समोर आली नव्हती. पण Sammobile च्या रिपोर्ट मध्ये समजले होते कि सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी मध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल. हा फोन वाइट, ग्रे आणि ब्लॅक कलर मध्ये येईल.

Samsung Galaxy A42 5G कंपनीच्या गॅलेक्सी ए41 चा अपग्रेडेड वर्जन असेल जो यावर्षी मार्च मध्ये 3,500mAh च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला होता. गॅलेक्सी ए42 खास असेल कारण हा फोन बजेट कॅटेगरी मध्ये 5जी सपोर्ट सह सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए41 मध्ये 6.1 इंचाचा फुल-एचडी+ इनफिनिटी यू सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येतो. Samsung Galaxy A41 मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी आहे. हि 15 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A41 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. मागे एक 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग ची जबाबदारी एफ/ 2.2 अपर्चर असलेल्या 25 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यावर आहे.

The post 6.6-इंचाचा डिस्प्ले आणि 5 कॅमेऱ्यासह आला Samsung Galaxy A42 5G, चायनीज फोन्सना मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a42-5g-announced-with-6-6-inch-super-amoled-display-and-quad-camera/feed/ 0