6.6-इंचाचा डिस्प्ले आणि 5 कॅमेऱ्यासह आला Samsung Galaxy A42 5G, चायनीज फोन्सना मिळेल टक्कर

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आज आपल्या वर्चुअल इवेंट ‘Life Unstoppable’ मध्ये अनेक प्रोडक्ट सादर करत नवीन स्मार्टफोन Galaxy A42 5G ची घोषणा केली आहे. कंपनीने अधिकृतपणे पहिल्यांदा या 5G फोनची घोषणा केली आहे. इवेंट मध्ये फोनचा लुक व डिजाइन दाखवण्यात आली आहे. कंपनी गॅलेक्सी ‘ए’ सीरीज मधील येणारा हा डिवाइस वर्षाच्या शेवटी लॉन्च करेल. Galaxy A42 5G चे नाव, डिजाइन आणि डिस्प्ले व्यतिरिक्त कंपनीने फोनच्या कोणत्याही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही.

डिजाइन

इवेंट मध्ये कंपनीने सांगितले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी 6.6-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले आणि क्वाड कॅमेरा सेटअप सह येईल. इवेंट मध्ये फोनची रियर आणि फ्रंट डिजाइन दाखवण्यात आली आहे. मागील क्वाड कॅमेरा सेटअप चौकोनी आकारात डावीकडे वरच्या बाजूला असेल. फोन मध्ये फ्रंटला मध्यभागी नॉच असेल. नॉच असल्यामुळे फोनच्या टॉपला बारीक बेजल असेल. तसेच दोन्ही बाजूंना पण बेजल्स खूप कमी असतील. पण बॉटमला चिन पार्ट मिळेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी 91mobiles ने गॅलेक्सी ए42 5G चायनाच्या 3सी वेबसाइट वर स्पॉट केला होता. लिस्टिंग वरून समजले आहे कि सॅमसंग ए-सीरीज मधील स्मार्टफोन मध्ये 4860mAh ची बॅटरी असेल. म्हणजे फोन मध्ये टिपिकल बॅटरी कपॅसिटी 5000mAh देण्यात येईल. सॅमसंग आपल्या एम-सीरीज मध्ये 6000mAh बॅटरी देत आहे.

3C लिस्टिंग वरून येणाऱ्या मिड-रेंज 5जी हँडसेट बाबत जास्त माहिती समोर आली नव्हती. पण Sammobile च्या रिपोर्ट मध्ये समजले होते कि सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी मध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असेल. हा फोन वाइट, ग्रे आणि ब्लॅक कलर मध्ये येईल.

Samsung Galaxy A42 5G कंपनीच्या गॅलेक्सी ए41 चा अपग्रेडेड वर्जन असेल जो यावर्षी मार्च मध्ये 3,500mAh च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला होता. गॅलेक्सी ए42 खास असेल कारण हा फोन बजेट कॅटेगरी मध्ये 5जी सपोर्ट सह सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Samsung Galaxy A41 चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए41 मध्ये 6.1 इंचाचा फुल-एचडी+ इनफिनिटी यू सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज सह येतो. Samsung Galaxy A41 मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी आहे. हि 15 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A41 मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत. मागे एक 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग ची जबाबदारी एफ/ 2.2 अपर्चर असलेल्या 25 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here