5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy A42 5G

Samsung ने गेल्याच आठवड्यात आपल्या ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन जोडत Samsung Galaxy A42 5G ची घोषणा केली होती. कंपनीने हा फोन ग्लोबल मार्केट मध्ये सादर केला होता, ज्याचे फोटो आणि स्पेसिफिकेशन्स सॅमसंग द्वारे ऑफिशियल करण्यात आले होते. पण गॅलेक्सी ए42 5जी फोनच्या किंमतीचा उल्लेख कंपनीने केला नव्हता. आज जवळपास एक आठवडा गेल्यानंतर कंपनीने Samsung Galaxy A42 5G ची किंमत पण सांगितली आहे.

Samsung Galaxy A42 5G ची किंमत सॅमसंग जर्मनी द्वारे ऑफिशियल करण्यात आली आहे. प्रेस रिलीजच्या माध्यमातून सॅमसंगने गॅलेक्सी ए42 स्मार्टफोनच्या किंमतीसह याच्या कलर वेरिएंट्सची पण पण घोषणा केली आहे. सॅमसंगने सांगितले आहे कि गॅलेक्सी ए42 5जी यूरोपियन मार्केट मध्ये नोव्हेंबर मध्ये विक्री साठी उपलब्ध होईल आणि याची किंमत 369 यूरो म्हणजे 32,000 रुपयांच्या आसपास असेल. जर्मनी मध्ये हा फोन सध्या एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे आणि हा Black, White आणि Gray कलर मध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy A42 5G

सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता ड्यूड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन वर सादर केला गेला आहे जो 6.6 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीनला सपोर्ट करतो. फ्रंट पॅनल वर तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. गॅलेक्सी ए42 5जी ची स्क्रीन सॅमसंगने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात आणली आहे.

Samsung चा हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च झाला आहे जो कंपनीच्या वनयूआई 2.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 690 चिपसेट देण्यात आला आहे. जर्मनी मध्ये गॅलेक्सी ए42 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A42 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A42 5G डुअल मोड 5जी (SA/NSA) सोबत डुअल 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स पण आहेत. तसेच पावर बॅकअप साठी सॅमसंग गॅलेक्सी ए42 5जी मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Samsung आपला हा फोन भारतात लॉन्च करेल कि नाही याबाबत सध्या काही बोलता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here