Samsung Galaxy A9 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 22 Oct 2018 13:17:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग गॅलेक्सी ए9एस 24 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9s-to-launch-on-24-october-in-china-with-four-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9s-to-launch-on-24-october-in-china-with-four-rear-camera-in-marathi/#respond Mon, 22 Oct 2018 13:17:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2588 चीन मध्ये लॉन्च होणार गॅलेक्सी ए9एस सॅमसंग द्वारा मलेशिया मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी ए9 चाच दुसरा वर्जन आहे.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9एस 24 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या आठवड्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या टेक्नॉलिजीचा अनोखा नमूना सादर करत जगातील पहिला चार रियर कॅमेरे वाला स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 सादर केला होता. हा स्मार्टफोन सध्या मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे. आता आलेल्या बातमी नुसार सॅमसंग लवकरच आपली ए9 स्मार्टफोन सीरीज चीन मध्ये आणणार आहे. बातमी अशी आहे कि सॅमसंग येत्या 24 ऑक्टोबरला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून गॅलेक्सी ए9एस स्मार्टफोन लॉन्च केला जाईल.

सॅमसंग गॅलेक्सी ए9एस संबंधित एक टीजर ईमेज इंटरनेट वर शेयर केली आहे ज्यात फोनची लॉन्च डेट व टाईमची माहिती देण्यात आली होती. या आॅफिशियल ईमेज नुसार गॅलेक्सी ए9एस येत्या 24 ऑक्टोबरला दुपारी 4:30 वाजता चीनी बाजारात लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे चीन मध्ये लॉन्च होणार गॅलेक्सी ए9एस सॅमसंग द्वारा मलेशिया मध्ये लॉन्च केलेल्या गॅलेक्सी ए9 चाच दुसरा वर्जन आहे. गॅलेक्सी ए9एस रॅम व प्रोसेसर मध्ये मलेशिया मध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी ए9 पेक्षा थोडा वेगळा आहे.

गॅलेक्सी ए9 बद्दल बोलायचे तर फोन मधील 4 कॅमेरा सेंसर वाला रियर कॅमेरा सेटअप याची सर्वात मोठी खासियत आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 24-मेगापिक्सल + 10-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचे चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर 24-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह 1080×2280 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 एंडरॉयड 8.1 ओरियो सह एक्सपीरियंस 8.5 यूआई वर सादर करण्यात आला आहे जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये ग्राफिक्स साठी एड्रीनो 512 जीपीयू देण्यात आला आहे. मलेशिया मध्ये गॅलेक्सी ए9 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल मेमरीला सपोर्ट करतात जी 512जीबी पर्यंत वाढवता येते.

गॅलेक्सी ए9 मध्ये डुअल सिम, एनएफसी आणि सॅमसंग पे सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देनाय्त आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये क्विक चार्ज 2.0 सपोर्ट वाली 3,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए9 मलेशिया मध्ये 512 डॉलर मध्ये लॉन्च झाला आहे जी भारतीय करंसी नुसार 43,000 रुपयांच्या आसपास आहे. पण गॅलेक्सी ए9 च्या इंडिया लॉन्च आणि याच्या किंमतीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post सॅमसंग गॅलेक्सी ए9एस 24 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9s-to-launch-on-24-october-in-china-with-four-rear-camera-in-marathi/feed/ 0
सॅमसंगच्या 4 रियर कॅमेरा वाल्या फोन गॅलेक्सी ए9 चे स्पेसिफिकेशन्स लीक, 11 ऑक्टोबरला होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-quad-camera-4-rear-camera-leaked-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-quad-camera-4-rear-camera-leaked-features-specifications-in-marathi/#respond Fri, 05 Oct 2018 07:04:25 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2373 लीक मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल, म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर देण्यात येतील.

The post सॅमसंगच्या 4 रियर कॅमेरा वाल्या फोन गॅलेक्सी ए9 चे स्पेसिफिकेशन्स लीक, 11 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने गेल्या महिन्यात एक ट्वीट केले होते, ज्यात लिहिण्यात आले होते की कंपनी 11 ऑक्टोबरला खुप मोठी घोषणा करणार आहे. या ट्वीट मध्ये कंपनी ने ‘4एक्स’ लिहिले होते ज्यावरून समजले होते की सॅमसंग चा हा आगामी स्मार्टफोन 4 कॅमेरा सेंसर वाला असेल. सॅमसंग ने सांगितले आहे की कंपनी 11 ऑक्टोबरला आपल्या ‘ए सीरीज’ अंतर्गत फोन लॉन्च करेल आणि हा स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 असेल. काल एका ताज्या लीक मधून सॅमसंग गॅलेक्सी ए9 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए9 संबंधित या नवीन लीक मध्ये फोनच्या कॅमेरा सेटअप ची संपूर्ण माहिती आली होती. लीक मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल, म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर देण्यात येतील. लीक नुसार या फोन मध्ये एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आनी 10-मेगापिक्सलची आॅप्टिकल झूम लेंस देण्यात येईल.

सॅमसंग ने आधीच सांगितले आहे की गॅलेक्सी ए9 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट असेल. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा 6.28-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्यात खुप बारीक बेजल्स देण्यात येतील. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह सादर करू शकते जो 128जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करेल.

रियल पॅनल वर 4 बॅक कॅमेरा सोबत कंपनी सेल्फी साठी हा फोन एफ/1.7 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सह लॉन्च करू शकते. समोर आलेल्या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. तसेच लीक नुसार पावर बॅकअप साठी या फोन मध्ये क्विक चार्ज सपोर्ट वाली 3720एमएएच ची बॅटरी मिळेल. पण फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 11 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post सॅमसंगच्या 4 रियर कॅमेरा वाल्या फोन गॅलेक्सी ए9 चे स्पेसिफिकेशन्स लीक, 11 ऑक्टोबरला होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-quad-camera-4-rear-camera-leaked-features-specifications-in-marathi/feed/ 0
सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/#respond Tue, 18 Sep 2018 07:32:11 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2160 सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने आॅफिशियल घोषणा केली आहे की कंपनी येत्या 11 ऑक्टोबरला एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट मध्ये गॅलेक्सी ए सीरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 प्रो लॉन्च होऊ शकतो. तसेच सॅमसंग आपल्या स्वस्त गॅलेक्सी जे सीरीज मध्ये पण दोन नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्लस आणि गॅलेक्सी जे7 प्लस घेऊन येत आहे. गॅलेक्सी जे सीरीज चे हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट पण झाले आहेत. पण आता अशी बातमी येत आहे की हे दोन्ही फोन गॅलेक्सी जे सीरीज चे शेवटचे फोन असू शकतात. सॅमसंग आपली जे सीरीज बंद करू शकते आणि एक नवीन सीरीज ‘गॅलेक्सी एम’ नावाने आणू शकते.

सॅमसंग संबंधित ही बातमी विदेशी वेबसाइट ईटीन्यूज ने पब्लिश केली आहे. रिपोर्ट नुसार सॅमसंग आपल्या लो बजेट तसेच मीड बजेट सेग्मेंट मध्ये नवीन योजना बनवत आहे. मीड बजेट सेग्मेंट मजबूत करण्यासाठी गॅलेक्सी ए सीरीज ला अजून चांगले व एडवांस करत तिच्यात ताकदवान स्पेसिफिकेशन्स दिले जातील. तसेच लो बजेट सेग्मेंट मधील गॅलेक्सी जे सीरीज कंपनी बंद करून त्याजागी नवीन गॅलेक्सी एम सीरीज आणणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बद्दल बोलायचे झाले तर या सीरीज मध्ये येणारे स्मार्टफोन लो बजट मध्ये असतील ज्यांची अधिकतम किंमत 12,000 रुपयांपर्यंत असू शकते. सॅमसंग या सीरीज मध्ये कमी किंमतीत जास्त चांगले स्पेसिफिकेशन्स देण्याचा प्रयत्न करेन. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की सॅमसंग ची गॅलेक्सी आॅन सीरीज पण गॅलेक्सी एम सीरीज द्वारा रिप्लेस केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे गॅलेक्सी आॅन स्मार्टफोन सीरीज सॅमसंग द्वारा मुख्यत: भारतीय आणि चीनी बाजारात विकली जाते. त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज मधील सर्वात जास्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च होऊ शकतात. तसेच दुसरीकडे असे बोलले जात आहे की भारतात शाओमीच्या लो बजट स्मार्टफोन्स मुळे सॅमसंग ने आपली नंबर वन पॉजिशन गामावली आहे त्यामुळे गॅलेक्सी एम सीरीज ने कंपनी फक्त शाओमी ला टक्कर देणार नाही तर भारतीय टेक बाजारात आपला शेयर पण वाढवेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे नवीन ‘गॅलेक्सी एम’ सीरीज, घेता येईल का शाओमीची नंबर वन ची जागा ? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-bring-new-galaxy-m-series-and-galaxy-j-eliminate-in-marathi/feed/ 0
11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), चालेल स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-pro-2018-snapdragon-710-to-launch-on-11-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-pro-2018-snapdragon-710-to-launch-on-11-october-in-marathi/#respond Mon, 17 Sep 2018 11:41:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2148 आता सॅमसंग ने एका ट्वीट मध्ये यूजरला रिप्लाई करत फोनच्या प्रोसेसर माहिती पण दिली आहे.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), चालेल स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट असेल यात. गेल्या आठवड्यात सॅमसंग ने एक ट्वीट करून सर्वांनाच धक्का दिला होता. सॅमसंग ने आपल्या ट्वीट मध्ये ‘4एक्स’ चा उल्लेख केला होता, त्यामुळे टेक विश्वात चर्चा सुरू झाली की ही कोरियन कंपनी आता 4 कॅमेरा सेंसर वाला स्मार्टफोन घेऊन येणार आहे. सॅमसंग ने ट्वीट सोबतच आॅफिशियल केले होते की हा फोन गॅलेक्सी ए सीरीज मधील असेल आणि येत्या 11 ऑक्टोबरला जगासमोर येईल. ताज्या लीक मध्ये सॅमसंगचा हा आगामी फोन गॅलेक्सी ए9 प्रो नावाने समोर आला आहे आणि त्याचबरोबर याच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

सॅमसंग ने हे आधीच सांगितले होते की कपंनी येत्या 11 ऑक्टोबरला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. बातमी अशी आहे की हा फोन गॅलेक्सी ए9 प्रो (2018) नावाने बाजारात येईल. तसेच आता सॅमसंग ने एका ट्वीट मध्ये यूजरला रिप्लाई करत फोनच्या प्रोसेसर माहिती पण दिली आहे. ट्वीटर वर एका यूजर ने प्रश्न विचारला होता की गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट असेल का. या ट्वीटला रिप्लाई देत सॅमसंग ने लिहिले की फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट असेल.

सॅमसंगच्या या उत्तराने स्पष्ट झाले की गॅलेक्सी ए9 प्रो (2018) क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट सह येईल. विशेष म्हणजे क्वालकॉमचा हा चिपसेट हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन आणि मीडरेंज स्मार्टफोन च्या मधील आहे. म्हणजे कमी किंमतीत हा चिपसेट मर्यादित स्पेसिफिकेशन्स मध्ये फास्ट व लॅगफ्री प्रोसेसिंग करतो.

लीक्स नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018) मध्ये ​इनफिनिटी डिस्प्ले देण्यात येईल जो 18.5:9 आस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत डुअल रियर कॅमेरा सह फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. पण जोपर्यंत सॅमसंग कडून इतर माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत या आगामी फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल काहीच बोलता येणार नाही त्यामुळे 11 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.

The post 11 ऑक्टोबरला लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी ए9 प्रो (2018), चालेल स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट वर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a9-pro-2018-snapdragon-710-to-launch-on-11-october-in-marathi/feed/ 0