सॅमसंग ने गेल्या महिन्यात एक ट्वीट केले होते, ज्यात लिहिण्यात आले होते की कंपनी 11 ऑक्टोबरला खुप मोठी घोषणा करणार आहे. या ट्वीट मध्ये कंपनी ने ‘4एक्स’ लिहिले होते ज्यावरून समजले होते की सॅमसंग चा हा आगामी स्मार्टफोन 4 कॅमेरा सेंसर वाला असेल. सॅमसंग ने सांगितले आहे की कंपनी 11 ऑक्टोबरला आपल्या ‘ए सीरीज’ अंतर्गत फोन लॉन्च करेल आणि हा स्मार्टफोन गॅलेक्सी ए9 असेल. काल एका ताज्या लीक मधून सॅमसंग गॅलेक्सी ए9 चे स्पेसिफिकेशन्स पण समोर आले आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी ए9 संबंधित या नवीन लीक मध्ये फोनच्या कॅमेरा सेटअप ची संपूर्ण माहिती आली होती. लीक मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की सॅमसंग गॅलेक्सी ए9 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह येईल, म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर देण्यात येतील. लीक नुसार या फोन मध्ये एफ/1.7 अपर्चर वाला 24-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा असेल ज्या सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आनी 10-मेगापिक्सलची आॅप्टिकल झूम लेंस देण्यात येईल.
सॅमसंग ने आधीच सांगितले आहे की गॅलेक्सी ए9 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट असेल. फोन चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक नुसार हा 6.28-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो ज्यात खुप बारीक बेजल्स देण्यात येतील. कंपनी ने हा फोन 6जीबी रॅम मेमरी सह सादर करू शकते जो 128जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करेल.
रियल पॅनल वर 4 बॅक कॅमेरा सोबत कंपनी सेल्फी साठी हा फोन एफ/1.7 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सह लॉन्च करू शकते. समोर आलेल्या फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे. तसेच लीक नुसार पावर बॅकअप साठी या फोन मध्ये क्विक चार्ज सपोर्ट वाली 3720एमएएच ची बॅटरी मिळेल. पण फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 11 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल.