Samsung Galaxy A90s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 31 Oct 2019 10:47:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90s-sm-a907f-4200mah-battery-korean-certification-listing/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90s-sm-a907f-4200mah-battery-korean-certification-listing/#respond Thu, 31 Oct 2019 10:47:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5636 लीक मध्ये Samsung Galaxy A90s चे दोन कलर वेरिएंट पण समोर आले होते ज्यात ब्लॅक आणि व्हाईट कलरचा खुलासा झाला आहे.

The post Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने यावर्षी सप्टेंबर मध्ये आपल्या ‘गॅलेक्सी ए सीरीज’ च्या सर्वात पावरफुल स्मार्टफोन Galaxy A90 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये आला होता जो अजून भारतीय बाजारात आला नाही. Galaxy A90 लॉन्चच्या महिनाभरानंतर आता या सीरीजच्या अजून एका स्मार्टफोन Galaxy A90s ची माहिती पण समोर येत आहे. Galaxy A90s कोरियन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केला गेला आहे ज्यात फोन आणि त्याच्या बॅटरी संबंधित महत्वाचा खुलासा झाला आहे.

Samsung Galaxy A90s कोरियन सर्टिफिकेशन्स साइट सेफ्टीकोरिया वर लिस्ट केला गेला आहे. वेबसाइट वर फोनची लिस्टिंग SM-A907F मॉडेल नंबर सह झाली आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत पण Galaxy A90s च्या बॅटरी पावरची माहिती इथे समोर आली आहे. लिस्टिंगनुसार Samsung Galaxy A90s मध्ये 4200एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. सर्टिफिकेशन्स साइट वर Galaxy A90s च्या बॅटरीचा मॉडेल नंबर EB-BA907ABYL सांगण्यात आला आहे.

Samsung Galaxy A90s

Samsung Galaxy A90s बद्दल अलीकडेच काही लीक्स समोर आले होते ज्यात सांगण्यात आले होते कि हा स्मार्टफोन 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह लॉन्च केला जाईल. कदाचित Galaxy A90s एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. तसेच लीक मध्ये Samsung Galaxy A90s चे दोन कलर वेरिएंट पण समोर आले होते ज्यात ब्लॅक आणि व्हाईट कलरचा खुलासा झाला आहे. पण तरीही Samsung Galaxy A90s च्या ठोस माहितीसाठी सॅमसंगच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy S11 असेल ब्रँडचा सर्वात पावरफुल फोन, स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह असेल एक्सनॉस 9830 प्रोसेसर

Samsung Galaxy A91

अलीकडे सॅमसंगच्या Galaxy A91 की स्पेसिफिकेशन्स पण इंटरनेट वर लीक झाले होते. लीक मध्ये सांगण्यात आले होते कि हा डिवाईस 6.7 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. Samsung Galaxy A91 या रिपोर्ट मध्ये 8 जीबी च्या पावरफुल रॅम सह दाखवण्यात आला आहे. या फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते जी माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते. रिपोर्टनुसार Galaxy A91 एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 सह सादर केला जाईल तसेच प्रोसेसिंग साठी या डिवाईस मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट मिळेल.

Samsung Galaxy A90

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A91 क्वाड रियर कॅमेऱ्यासह येईल. रिपोर्टनुसार या फोन मध्ये 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल जो ओआईएस फीचरसह येईल. हा फोन 8 मेगापिक्सल ते 12 मेगापिक्सल पर्यंतच्या वाइड अँगल लेंसला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. सेल्फी साठी Samsung Galaxy A91 मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A80 ची किंमत झाली 8,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

Samsung Galaxy A91 मध्ये रिपोर्टनुसार ब्लूटूथ 5.0 आणि वाईफाई आहे. तसेच फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह 4500एमएएच ची बॅटरी असू शकते. रिपोर्टनुसार Galaxy A91 ची बॅटरी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A91 चे स्पेसिफिकेशन्स तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाहीत जोपर्यंत Samsung अधिकृत घोषणा करत नाही.

The post Samsung Galaxy A90s सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट, 4200एमएएच बॅटरी सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a90s-sm-a907f-4200mah-battery-korean-certification-listing/feed/ 0