Samsung Galaxy A80 ची किंमत झाली 8,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आपल्या शानदार आणि अनोख्या फोन Galaxy A80 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. अनोखी डिजाइन असलेला हा फोन जुलै 2019 मध्ये भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला गेला होता. लॉन्चच्या वेळी फोनची किंमत 47,990 रुपये होती. आता हि किंमत 8,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

नवीन किंमत

91मोबाईल्सला Samsung Galaxy A80 च्या किंमतीतल्या कपातीची माहिती ऑफलाइन रिटेलर्सकडून मिळाली आहे. फोनच्या किंमतीतील कपात कायम राहणार. फेस्टिव सीजन मध्ये तुम्ही हा फोन 39,990 रुपयांमध्ये ऑफलाइन स्टोर्स वर विकत घेता येईल.

Galaxy A80 स्पेसिफिकेशन्स

सॅमसंगने Galaxy A80 1080 X 2400 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.7-इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला आहे. कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज केला आहे जो स्क्रीनच्या खाली आहे. सॅमसंग गॅलक्सी ए80 एंडरॉयडच्या सर्वात लेटेस्ट ओएस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट क्वालकॉमचा सर्वात नवीन चिपसेट आहे. Galaxy A80 जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट सह लॉन्च झाला आहे. सॅमसंगने हा फोन 8जीबी च्या ताकदवान रॅम वर लॉन्च केला आहे. हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येत.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, या फोनचा रियर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा एकच आहे. फोनच्या रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड एंगल लेंस आहे. Galaxy A80 चा तिसरा कॅमेरा सेंसर 3डी डेफ्थ सेंसिंग टेक्नॉलॉजी सह येतो जो एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलच्या पावरला सपोर्ट करतो.

सॅमसंग Galaxy A80 एक 4जी फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन सुपर फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वाल्या 3,700एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. सॅमसंगने Galaxy A80 घोस्ट वाईट, ऐंजल गोल्ड आणि फँटम ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये टेक मंचा वर सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here