Samsung Galaxy S11 असेल ब्रँडचा सर्वात पावरफुल फोन, स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह असेल एक्सनॉस 9830 प्रोसेसर

Samsung Galaxy S सीरीज आधीपासूनच हाईएंड स्पेसिफिकेशन्स असेल्या स्मार्टफोन्स साठी ओळखली जाते. या सीरीज मध्ये लॉन्च होणारे स्मार्टफोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये येतात जे हाई बजेट तर असतात, सोबतच या स्मार्टफोन्स द्वारे Samsung आपली नवीन टेक्नॉलॉजी आणि फीचर्स बाजारात आणते. यावर्षी पण Samsung ने एस सीरीज मध्ये Galaxy S10 आणि Galaxy S10 Plus स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सीरीजच्या आगामी डिवाईस Galaxy S11 संबंधित महत्वाची माहिती पण समोर आली आहे.

Samsung Galaxy S11 बद्दल तसे तर महिनाभर लीक्स समोर येत आहेत ज्यात फोनच्या एंक महत्वाच्या फीचर्स आणि लॉन्च डेटची माहिती पण मिळाली आहे. तसेच आता नवीन लीक मध्ये Galaxy S11 च्या प्रोसेसर आणि चिपसेटचा खुलासा पण झाला आहे. नवीन लीक नुसार Samsung Galaxy S11 कंपनीचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन असेल आणि या फोन मध्ये सॅमसंग आपला सर्वात नवीन आणि दमदार चिपसेट वापरेल. फोनच्या चिपसेटची माहिती मॅक्स वेनबॅच यांनी आपल्या ट्वीट मध्ये दिली आहे.

एक्सनॉस 9830 प्रोसेसर

लीक नुसार Samsung Galaxy S11 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9830 चिपसेट दिला जाईल. विशेष म्हणजे Samsung ने अजूनतरी हा चिपसेट लॉन्च केला नाही. त्यामुळे कदाचित Galaxy S11 मॉडेल्स सोबतच Exynos 9830 टेक बाजारात येऊ शकतो. विशेष म्हणजे Samsung चा सर्वात पावरफुल फोन Galaxy Note 10 एक्सनॉस 9825 चिपसेट वर लॉन्च केला गेला होता. म्हणजे Samsung Galaxy S11 मध्ये दिला जाणारा एक्सनॉस 9830 चिपसेट Galaxy Note 10 मधील एक्सनॉस 9825 चिपसेटचा अपग्रेडेड वर्जन असेल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A80 ची किंमत झाली 8,000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट

Samsung यूजर्सना माहितीय कि कंपनी आपले स्मार्टफोन्स वेगवेगळ्या मार्केटनुसार वेगवेगळ्या प्रोसेसर सह लॉन्च करते. Galaxy S सीरीज सोबत असेच होईल. सॅमसंग ब्रँडचे स्मार्टफोन एक्सनॉस प्रोसेसर सोबतच क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन चिपसेट वर पण लॉन्च केले जातात जे वेगवेगळ्या बाजारांत लॉन्च होतात. या मॉडेल्सच्या किंमती पण बदलतात. Galaxy S11 बद्दल लीक मध्ये हेच सांगण्यात आले आहे कि हा फोन कंपनी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह पण बनवेल आणि ग्लोबल मार्केटच्या काही बाजारांत हा फोन स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर लॉन्च होईल.

पावरफुल कॅमेरा

Samsung Galaxy S11 संबंधित काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आला आहे कि या फोन मध्ये कंपनी सर्वात पावरफुल कॅमेरा देईल. हा फोन कंपनी दमदार झूम सोबत हाई रेजोल्यूशन आणि जास्त अपर्चर ऑप्शन सह सादर करू शकते. चर्चा अशी आहे कि Samsung Galaxy S11 मध्ये लो लाइट फोटोग्राफी साठी ट्रेटासेल टेक्नोलॉजी सह नवीन सेंसर दिले जाऊ शकतात. फोन ट्रिपल अपर्चर लेंस सह सादर केला जाऊ शकतो. कंपनी यात F1.5 आणि F2.4 मध्ये एक नवीन एफ स्टॉप ऍड करू शकते. यासाठी कंपनी कॅमेऱ्यामध्ये नवीन ToF सेंसर सह सुधारित एचडीआर प्रोसेसिंग जोडू शकते.

हे देखील वाचा: Samsung ने आणली दिवाळी भेट, Galaxy S10e वर 3000 रुपयांची सूट आणि Galaxy A70s सोबत 1999 रुपयांचे हेडफोन फ्री

फेब्रुवारी मध्ये होईल लॉन्च

Samsung Galaxy S11 बद्दल लीक समोर येत आहेत कि हा स्मार्टफोन 18 फेब्रुवारी, 2020 ला लॉन्च केला जाऊ शकतो. बोलले जात आहे कि या तारखेला सॅमसंग कंपनी गॅलेक्सी अनपॅक्ड इवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून Galaxy S11 स्मार्टफोन याचे वेगवेगळे मॉडेल्स टेक मंचावर सादर करेल. Galaxy S11 संबंधित सर्व माहिती तोपर्यंत ठोस म्हणता येणार नाही जोपर्यंत स्वतः Samsung कडून अधिकृत माहिती समोर येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here