Samsung Galaxy F02S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Apr 2021 11:25:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy F02s, यात आहे 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 4जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-launch-at-price-rs-8999-specs-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-launch-at-price-rs-8999-specs-sale-offer/#respond Mon, 05 Apr 2021 11:25:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10495 Samsung Galaxy F02s ची फ्रंट डिजाईन तर गॅलेक्सी एफ12 सारखी आहे पण बॅक पॅनलवर डायमंड कट डिजाईन पॅटर्न बनवण्यात आला आहे.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy F02s, यात आहे 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये धमाल करणारी टेक कंपनी Samsung सध्या लो बजेट सेग्मेंटमध्ये पण खूप आक्रमक झाल्याचे दिसत आहे. कारण भारतात सर्वात जास्त मागणी या सेग्मेंटच्या स्मार्टफोन्सची आहे. स्वस्त स्मार्टफोनची मागणी करणाऱ्या लोकांसाठी सॅमसंगने आज दोन नवीन फोन बाजारात आणले आहेत जे Samsung Galaxy F02s आणि Samsung Galaxy F12 नावाने मार्केटमध्ये आले आहेत. फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेल्या कंपनीच्या Samsung Galaxy F02s ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. (Samsung Galaxy F02s India Launch at Price rs 8999 Specs Sale Offer)

लुक व डिजाईन

Samsung Galaxy F02s ची फ्रंट डिजाईन तर गॅलेक्सी एफ12 सारखी आहे पण बॅक पॅनलवर डायमंड कट डिजाईन पॅटर्न बनवण्यात आला आहे. हा फोन वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर लॉन्च केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजललेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. सॅमसंगने याला इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेचे नाव दिले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर उजवीकडे आयताकृती रियर कॅमेरा सेटअप बनवण्यात आला आहे ज्यात तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेपमध्ये आहेत तर बाजूला फ्लॅश लाईट आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण उजव्या पॅनलवर देण्यात आले आहेत तर डाव्या पॅनलवर सिम स्लॉट आहे.

Samsung Galaxy F12

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F02s 20:9 आस्पेक्ट रेशियोवर सादर केला गेला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी ‘वी’ डिस्प्लेला सपोर्ट करतो. सॅमसंग गॅलेक्सी एफ02एसने अँड्रॉइड 10 ओएस आधारित वन युआय 2.5 सह बाजारात एंट्री घेतली आहे जो 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेटवर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता गॅलेक्सी एफ02एस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy F02s एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy F02s

वेरिएंट व प्राइस

Samsung Galaxy F02s ने दोन वेरिंएट्ससह मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. फोनचा बेस वेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 8,999 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो 4 जीबी रॅमसह 64 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन येत्या 9 एप्रिलपासून Diamond Blue, Diamond White आणि Diamond Black कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy F02s, यात आहे 5,000एमएएच बॅटरी, ट्रिपल कॅमेरा आणि 4जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-launch-at-price-rs-8999-specs-sale-offer/feed/ 0
Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-price-leaks-ahead-of-launch-specification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-price-leaks-ahead-of-launch-specification/#respond Fri, 26 Mar 2021 16:48:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10415 टिप्स्टर Abhishek Yadav नुसार Samsung Galaxy F02s दोन रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला जाईल. या फोनच्या बेस वेरिएंट 3GB RAM आणि 32GB स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आणि 4GB RAM व 64GB स्टोेरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये असेल.

The post Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung आपल्या लेटेस्ट गॅलेक्सी F सीरीजचा पोर्टफोलियो वाढवण्याची तयारी करत आहे. अलीकडेच बातमी समोर आली होती कि कंपनी नवीन 5G स्मार्टफोन Galaxy F52 वर काम करत आहे. तसेच या बातमी नंतर F-सीरीजचा अजून एक नवीन फोन Galaxy F02s गुगल प्ले कंसोल लिस्टिंग सोबतच NBTC, FCCC आणि अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर स्पॉट केला गेला होता. आता इंडियाचे टिप्सटर अभिषेक यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवर Galaxy F02s च्या किंमतीचा खुलासा करत माहिती दिली आहे कि फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. आतापर्यंत कंपनीने याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. (samsung galaxy f02s india price leaks ahead of launch specification)

Samsung Galaxy F02s ची किंमत

टिप्स्टर Abhishek Yadav नुसार Samsung Galaxy F02s दोन रॅम व स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला जाईल. या फोनच्या बेस वेरिएंट 3GB RAM आणि 32GB स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आणि 4GB RAM व 64GB स्टोेरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये असेल. तसेच टिप्सटरने एक इमेज पण शेयर केली आहे, ज्यात फोन मॉडेल नंबर E025FE व E025FF सह दिसत आहे. फोनच्या लॉन्च डेट बद्दल टिप्सटरने कोणतीही माहिती दिली नाही.

हे देखील वाचा : Moto G100 5G फोन लॉन्च, डुअल पंच-होलसह आहे 64MP रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F02s चे स्पेसिफिकेशन

आम्ही तुम्हाला अलीकडेच सांगितले होते कि हा स्मार्टफोन Google Play कंसोलवर लिस्ट झाला होता, ज्यात पुष्टी करण्यात आली होती कि Galaxy F02s क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 प्रोसेसरसह एड्रेनो 506 GPU सह चालेल. तसेच, हँडसेट 1600 x 720 पिक्सलच्या स्क्रीन रिजॉल्यूशन आणि 280ppi च्या पिक्सेल डेंसिटीसह HD + डिस्प्लेवर सादर केला जाईल. लिस्टिंगवरून असे समजले होते कि स्मार्टफोन एंड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल.

Samsung Galaxy F02S ची डिजाइन

गुगल प्ले लिस्टिंगमध्ये समोर आलेल्या फोटोजनुसार फोनमध्ये बारीक बेजलसह वॉटर-ड्रॉप नॉच डिजाइन दिली जाईल आहे. पण अजूनही निश्चितपणे म्हणता येणार नाही कि हा फोन अपकमिंग गॅलेक्सी F02s असेल. बोलले जात आहे कि हा सॅमसंग गॅलेक्सी M02s चा रीब्रँडेड वर्जन असेल.

हे देखील वाचा : ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा…

Samsung Galaxy M02S

फोनमध्ये 6.5 इंचाचा TFT LCD इनफिनिटी-V कट डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसरसाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट, 4जीबी पर्यंत रॅम आणि 64जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी लेंससह दोन 2 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहेत. सेल्फीसाठी यात 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा 5000mAh च्या बॅटरीसह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी एम02एस व्हिडीओ

The post Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f02s-india-price-leaks-ahead-of-launch-specification/feed/ 0