ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा…

घर बसल्या ऑनलाइन शॉपिंग करून वेळ वाचवणे हा सध्याचा एक ट्रेंड आहे. कमी किंमत आणि शानदार ऑफर्स मुळे लोक आपोआप ऑनलाइन शॉपिंग साइट्सकडे आकर्षित होतात. पण, ऑनलाइन शॉपिंगमध्ये होणाऱ्या फसवणुकीककडे दुर्लक्ष करता येत नाही. नेहमीच ऐकायला मिळते कि ऑनलाइन जे सामान मागवले जाते तेचे मिळत नाही. डीलिवर बॉयची चुकी किंवा शॉपिंग साइटच्या चुकीमुळे अनेकदा आपल्या ऑर्डरच्या जागी दुसरे सामान येते. असेच काहीसे थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत झाले आहे. पण इथे चूक ऑर्डर करणाऱ्या तरुणाची होती. चला जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण. (youth orders a cheap iphone online receives a phone shaped coffee table)

ऑर्डर केला होता iPhone 8

ओरिएंटल डेली मलेशियाच्यानुसार, थायलंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने जेव्हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कमी किंमत असलेला iPhone 8 बघितला तेव्हा तो उत्साहित झाला आणि तपासणी न करता त्याने ऑर्डर दिली. त्यानंतर तो iPhone ची आतुरतेने वाट बघू लागला. पण जेव्हा त्याला पॅकेज मिळाले तेव्हा तो iPhone 8 च्या ऐवजी iPhone सारखा दिसणारा मोठा कॉफी टेबल निघाला. मोबाईलच्या जागी टेबल बघून तरुण हैराण झाला.

हे देखील वाचा : 5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च

कुठे झाली चूक

रिपोर्टनुसार यात ई-कॉर्मस साइटची चूक नाही. कारण तरुणाने ऑर्डर करण्याआधी प्रोडक्टबाबत संपूर्ण माहिती बघितली नाही. ई-कॉमर्स वेबसाइटवर कथितरित्या लिहिण्यात आले होते कि हा एक iPhone च्या आकाराचा कॉफी टेबल आहे.

हे देखील वाचा : Moto G100 5G फोन लॉन्च, डुअल पंच-होलसह आहे 64MP रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स

सोशल मीडियावर वायरल होत आहे फोटो

iPhone सह युवकाचे फोटोज आता सोशल मीडियावर वायरल होत आहेत. पण असे वाटते आहे कि तो आपल्या खरेदीमुळे खुश आहे. विशेष म्हणजे कॉफी टेबल अगदी iPhone 6s सारखा दिसतो आणि आकाराने मोठा आहे. यात एक स्क्रीन आहे जी काळ्या रंगाची आहे, एक टच-आयडी आणि एक नकली माइक आहे. खाली सफेद रंगात चार स्टॅन्ड आहेत.

ऍप्पल आयफोन 8 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here