Moto G100 5G फोन लॉन्च, डुअल पंच-होलसह आहे 64MP रियर कॅमेरा आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स

Motorola ने आज टेक मार्केटमध्ये आपला 5G फोन पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन मोबाईल फोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन पण ‘जी’ सीरीजमध्ये जोडला गेला आहे आणि हा फोन Moto G100 नावाने लॉन्च केला गेला आहे. मागे मोटोरोलाने Moto G10 आणि Moto G30 स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते तर Moto G100 5G स्मार्टफोन सध्या यूएस आणि यूरोपच्या बाजारांमध्ये आला आहे जो येत्या काही दिवसांत भारतासह जगभरातील इतर मार्केट्स मध्ये एंट्री घेऊन घेऊ शकतो. (Moto G100 5G phone Launched with dual selfie 64mp rear camera Specs Price)

लुक व डिजाईन

Moto G100 5G कंपनीने डुअल पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केला आहे. स्क्रीनच्या दोन्ही साईड बेजल लेस आहेत तर वर आणि खाली बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या डावीकडे दोन होल आहेत जे बॉडी ऐजेजपासून दूर स्क्रीनवर बनवण्यात आले आहेत. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या डावीकडे चौकोनी आकारात आहे.

या कॅमेरा सेटअप मध्ये एक माइक पण आहे जो व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना साउंड परफेक्टली कॅप्चर करतो. फोनच्या बॅक पॅनलवर Motorola चा लोगो आहे. तर उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या साईड पॅनल्सवरच वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन आहेत. ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन Iridescent Sky, Iridescent Ocean आणि Slate Grey कलर वेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Motorola Moto G100 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 2520× 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. मोटो जी100 चा हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो आणि एचडीआर10 सारख्या फीचरला सपोर्ट करतो. हा डुअल पंच-होल डिस्प्ले आहे ज्यावर दोन सेल्फी कॅमेरा सेंसर आहेत. मोटो जी100 अँड्रॉइड 11 ओएसवर लॉन्च केला गेला आहे जो क्चॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 870 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 650 जीपीयू आहे. मोटोरोलाने आपला हा फोन 8 जीबी रॅमवर लॉन्च केला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता पण येते.

हे देखील वाचा : 5G ची पावर, 4400mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला शक्तिशाली फोन iQOO Z3 झाला लॉन्च

फोटोग्राफीसाठी हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक टीओएफ लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर पण दोन कॅमेरा सेंसर आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोटो जी100 स्मार्टफोन 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच फोन स्क्रीनवर बनलेल्या पंच-होलमध्ये 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेल्फी सेंसर देण्यात आला आहे जी एक अल्ट्रा वाइड अँगल लेंस आहे.

Moto G100 5G डुअल सिम फोन आहे जो डुअल मोड 5जी आणि 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सोबतच हा फोन गुगल असिस्टंट बटनला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 20वॉट टर्बोचार्जिंग फीचर असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ग्लोबल मार्केट मध्ये या फोनची किंमत 499.99 यूरो म्हणजे जवळपास 43,500 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात या फोनची किंमत कमी असल्याची शक्यता आहे, पण मोटोरोला आपला फोन भारतात कधी घेऊन येईल हे सांगता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here