Samsung Galaxy F34 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Jul 2023 12:45:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/#respond Tue, 25 Jul 2023 12:45:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22573 Samsung लवकरच आणखी एक बजेट डिवाइस भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे, जो Samsung Galaxy F34 5G नावाने बाजारात येऊ शकतो. हा डिवाइस फक्त भारतात येईल आणि ह्याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्यात ‘क्रांतिकारी कॅमेरा’ आणि सेगमेंटमधील मोठी बॅटरी असल्याचा दावा कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया कंपनीनं सांगितलेल्या फीचर्सची माहिती. Samsung […]

The post 6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा नवीन डिवाइस पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो.
  • हा डिवाइस फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
  • हा डिवाइस Galaxy M34 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो.

Samsung लवकरच आणखी एक बजेट डिवाइस भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे, जो Samsung Galaxy F34 5G नावाने बाजारात येऊ शकतो. हा डिवाइस फक्त भारतात येईल आणि ह्याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्यात ‘क्रांतिकारी कॅमेरा’ आणि सेगमेंटमधील मोठी बॅटरी असल्याचा दावा कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया कंपनीनं सांगितलेल्या फीचर्सची माहिती.

Samsung Galaxy F34 लाँच

Samsung Galaxy F34 लवकरच भारतात लाँच होणार हे कंपनीनं सांगितलं आहे. परंतु कंपनीनं अचूक लाँच डेट सांगितली नाही. हा फोन ऑगस्टच्या सुरवातीला बाजारात येण्याची शक्यता जास्त आहे.

Samsung Galaxy F34 चे फीचर्स

  • कॅमेरा : सॅमसंगनं सांगितलं आहे की ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. Galaxy F34 5G मधील हा सेन्सर OIS ला सपोर्ट करेल त्यामुळे कमी प्रकाशात आणि मोबाइल हलल्यावर देखील चांगले फोटोज येतील. फोनच्या कॅमेरा अ‍ॅपमध्ये फन मोड मिळेल ज्यात 16 इनबिल्ट लेन्स इफेक्ट मिळतील.
  • डिस्प्ले : Samsung Galaxy F34 मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. जो 1000-निट्झ पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल.
  • बॅटरी : ह्या डिवाइसमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल. जी दोन दिवस चालेल, असा सॅमसंगचा दावा आहे.

कंपनीनं फोनच्या प्रोसेसर किंवा लाँच डेटची अद्याप माहिती दिली नाही. लवकरच ही माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. टीजर इमेजवरून समजलं आहे की हा फोन ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होईल. प्रथमदर्शनी हा फोन अलीकडेच आलेल्या Samsung Galaxy M34 चा मॉडिफाइड व्हर्जन वाटतो ज्याची विक्री अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाते. उपलब्ध माहितीनुसार हा फोन 20 हजारांच्या आत लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे.

The post 6,000mAh च्या बॅटरीसह होऊ शकते Samsung Galaxy F34 ची एंट्री; भारतीय लाँचच्या उंबरठ्यावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-samsung-galaxy-f34-to-launch-in-india-soon/feed/ 0
Samsung Galaxy F34 5G लवकरच होऊ शकतो लाँच, वेबसाइटवर सपोर्ट पेज प्रकाशित https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f34-5g-phone-seen-on-company-support-page/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f34-5g-phone-seen-on-company-support-page/#respond Fri, 30 Jun 2023 09:43:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21836 दिग्गज टेक कंपनी सॅमसंग लवकरच F-सीरीजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. डिवाइसची एंट्री Samsung Galaxy F34 5G नावानं होऊ शकते. ह्या फोनची चर्चा पुन्हा रंगली आहे कारण ह्याचं सपोर्ट पेज कंपनीच्या इडियन वेबसाइटवर दिसलं आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन मोबाइल बाबत सविस्तर माहिती. Samsung Galaxy F34 5G सपोर्ट पेज सॅमसंगच्या इंडियन वेबसाइटवर सपोर्ट […]

The post Samsung Galaxy F34 5G लवकरच होऊ शकतो लाँच, वेबसाइटवर सपोर्ट पेज प्रकाशित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • नवीन F-सीरीज स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो.
  • ह्यात क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
  • 20 हजारांच्या रेंजमध्ये होऊ शकतो सादर.

दिग्गज टेक कंपनी सॅमसंग लवकरच F-सीरीजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. डिवाइसची एंट्री Samsung Galaxy F34 5G नावानं होऊ शकते. ह्या फोनची चर्चा पुन्हा रंगली आहे कारण ह्याचं सपोर्ट पेज कंपनीच्या इडियन वेबसाइटवर दिसलं आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन मोबाइल बाबत सविस्तर माहिती.

Samsung Galaxy F34 5G सपोर्ट पेज

सॅमसंगच्या इंडियन वेबसाइटवर सपोर्ट पेज लाइव्ह झालं आहे जिथे स्मार्टफोन SM-E346B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ह्यात ‘डीएस’ ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी दिसली आहे. वेबसाइट लिस्टिंगमधून इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही परंतु सपोर्ट पेजमुळे एक गोष्ट निश्चित झाली आहे ती म्हणजे Samsung Galaxy F34 5G लवकरच भारतीय बाजारात सादर होऊ शकतो.

तुम्हाला माहित असेल की सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीजचे फोन ऑनलाइन स्टोर फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होतात. तसेच कंपनी काही निवडक रिटेल स्टोरवर देखील हे सादर करते.

Samsung Galaxy F34 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता ह्यात 6.5 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 120hz रिफ्रेश रेट आणि 405 पीपीआय पिक्सल डेंसिटी सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : प्रोसेसर पाहता डिवाइस ऑक्टा कोर 2.4Ghz क्लॉक स्पीड असलेल्या प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128GB बेस मॉडेल मिळू शकतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता हा सॅमसंग मोबाइल क्वॉड कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे, ज्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 12 मेगापिक्सलची सेकंडरी आणि अन्य दोन 5 मेगापिक्सलच्या कॅमेरा लेन्स दिल्या जाऊ शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग दिला जाऊ शकतो.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोन अँड्रॉइड 13 सह येऊ शकतो.
  • अन्य : अन्य फीचर्स पाहता फोनमध्ये ड्युअल सिम 5G, ब्लूटूथ, वायफाय, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

Samsung Galaxy F34 5G ची किंमत (संभाव्य)

कंपनीनं मात्र अद्याप कोणतीही घोषणा केली नाही परंतु अशी चर्च आहे की हा Samsung Galaxy F34 5G मिड बजेट सेगमेंटमध्ये लाँच होईल. म्हणजे ह्या फोनची किंमत 20 हजारांच्या आसपास असू शकते.

The post Samsung Galaxy F34 5G लवकरच होऊ शकतो लाँच, वेबसाइटवर सपोर्ट पेज प्रकाशित first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-f34-5g-phone-seen-on-company-support-page/feed/ 0