Samsung लवकरच आणखी एक बजेट डिवाइस भारतीय बाजारात सादर करण्याची तयारी करत आहे, जो Samsung Galaxy F34 5G नावाने बाजारात येऊ शकतो. हा डिवाइस फक्त भारतात येईल आणि ह्याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्यात ‘क्रांतिकारी कॅमेरा’ आणि सेगमेंटमधील मोठी बॅटरी असल्याचा दावा कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया कंपनीनं सांगितलेल्या फीचर्सची माहिती.
Samsung Galaxy F34 लाँच
Samsung Galaxy F34 लवकरच भारतात लाँच होणार हे कंपनीनं सांगितलं आहे. परंतु कंपनीनं अचूक लाँच डेट सांगितली नाही. हा फोन ऑगस्टच्या सुरवातीला बाजारात येण्याची शक्यता जास्त आहे.
Samsung Galaxy F34 चे फीचर्स
- कॅमेरा : सॅमसंगनं सांगितलं आहे की ह्या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. Galaxy F34 5G मधील हा सेन्सर OIS ला सपोर्ट करेल त्यामुळे कमी प्रकाशात आणि मोबाइल हलल्यावर देखील चांगले फोटोज येतील. फोनच्या कॅमेरा अॅपमध्ये फन मोड मिळेल ज्यात 16 इनबिल्ट लेन्स इफेक्ट मिळतील.
- डिस्प्ले : Samsung Galaxy F34 मध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेटसह अॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. जो 1000-निट्झ पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करेल.
- बॅटरी : ह्या डिवाइसमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाईल. जी दोन दिवस चालेल, असा सॅमसंगचा दावा आहे.
कंपनीनं फोनच्या प्रोसेसर किंवा लाँच डेटची अद्याप माहिती दिली नाही. लवकरच ही माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे. टीजर इमेजवरून समजलं आहे की हा फोन ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होईल. प्रथमदर्शनी हा फोन अलीकडेच आलेल्या Samsung Galaxy M34 चा मॉडिफाइड व्हर्जन वाटतो ज्याची विक्री अॅमेझॉनच्या माध्यमातून केली जाते. उपलब्ध माहितीनुसार हा फोन 20 हजारांच्या आत लाँच केला जाईल अशी अपेक्षा आहे.