Samsung Galaxy F34 5G लवकरच होऊ शकतो लाँच, वेबसाइटवर सपोर्ट पेज प्रकाशित

Highlights

  • नवीन F-सीरीज स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो.
  • ह्यात क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो.
  • 20 हजारांच्या रेंजमध्ये होऊ शकतो सादर.

दिग्गज टेक कंपनी सॅमसंग लवकरच F-सीरीजमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. डिवाइसची एंट्री Samsung Galaxy F34 5G नावानं होऊ शकते. ह्या फोनची चर्चा पुन्हा रंगली आहे कारण ह्याचं सपोर्ट पेज कंपनीच्या इडियन वेबसाइटवर दिसलं आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन मोबाइल बाबत सविस्तर माहिती.

Samsung Galaxy F34 5G सपोर्ट पेज

सॅमसंगच्या इंडियन वेबसाइटवर सपोर्ट पेज लाइव्ह झालं आहे जिथे स्मार्टफोन SM-E346B/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ह्यात ‘डीएस’ ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी दिसली आहे. वेबसाइट लिस्टिंगमधून इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही परंतु सपोर्ट पेजमुळे एक गोष्ट निश्चित झाली आहे ती म्हणजे Samsung Galaxy F34 5G लवकरच भारतीय बाजारात सादर होऊ शकतो.

तुम्हाला माहित असेल की सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीजचे फोन ऑनलाइन स्टोर फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध होतात. तसेच कंपनी काही निवडक रिटेल स्टोरवर देखील हे सादर करते.

Samsung Galaxy F34 5G चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : फोनचे स्पेसिफिकेशन पाहता ह्यात 6.5 इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 120hz रिफ्रेश रेट आणि 405 पीपीआय पिक्सल डेंसिटी सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : प्रोसेसर पाहता डिवाइस ऑक्टा कोर 2.4Ghz क्लॉक स्पीड असलेल्या प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128GB बेस मॉडेल मिळू शकतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता हा सॅमसंग मोबाइल क्वॉड कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे, ज्यात 64 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 12 मेगापिक्सलची सेकंडरी आणि अन्य दोन 5 मेगापिक्सलच्या कॅमेरा लेन्स दिल्या जाऊ शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंग दिला जाऊ शकतो.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोन अँड्रॉइड 13 सह येऊ शकतो.
  • अन्य : अन्य फीचर्स पाहता फोनमध्ये ड्युअल सिम 5G, ब्लूटूथ, वायफाय, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात.

Samsung Galaxy F34 5G ची किंमत (संभाव्य)

कंपनीनं मात्र अद्याप कोणतीही घोषणा केली नाही परंतु अशी चर्च आहे की हा Samsung Galaxy F34 5G मिड बजेट सेगमेंटमध्ये लाँच होईल. म्हणजे ह्या फोनची किंमत 20 हजारांच्या आसपास असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here